पीटरहोफ
सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची झारकालीन राजधानी असल्यामुळे अनेक सुंदर, आकर्षक राजवाडे, उद्याने, कारंजे, कॅथेड्रल्स, पुतळे, निवा (нева / न्येवा) नदीवरचे आकर्षक पूल अशा वास्तूवैविध्यांनी सजलेली आहे. या सर्वांमुळे जगातील सुंदर शहरांपैकी एक अशी या शहराची ओळख झाली आहे. सेंट पीटर्सबर्गच्या उपनगरात पीटरहोफ हे आकर्षक राजसंकुल स्थित आहे. याची उभारणी 1709 पासून पुढची अनेक वर्षे होत राहिली. पीटर द ग्रेटची एक छोटेखानी निवासस्थान म्हणून उभारणी झालेल्या मुख्य वास्तूचे Grand Palace मध्ये रुपांतर झाले 1717 ते 1728 दरम्यान.