संस्कृती

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2020 - 00:42

ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.

आज ह्या निमित्ताने मला आमचे शाई पेनाचे दिवस आठवले. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली . असो.

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - साधना

Submitted by साधना on 24 August, 2020 - 09:43

|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|

ब गट : पाल्य.

IMG-20200824-WA0037.jpg

आठवणीतला गणेशोत्सव

Submitted by वावे on 23 August, 2020 - 14:16

लहानपणी मी दरवर्षी गणपतीसाठी आईबरोबर आजोळी मुरुडला जायचे. मुरुड म्हणजे जंजिरा-मुरुड. आमच्या गावाहून आधी एसटीने किंवा कधी बाबाही सोबत असतील तर मोटरसायकलवर, दिघीला जायचं. तिथे लॉंचच्या धक्क्यावर पोचलं, की ’आगरदांडा की राजपुरी’ असा एक पर्याय असायचा. राजपुरीला जाताना लॉंच जास्त हलायची, कारण ते खुल्या समुद्राच्या जास्त जवळ आहे. अर्थात अगदी लहानपणापासून हा प्रवास अनेकदा केल्यामुळे लॉंच कितीही डुचमळली, तरी मला कधीच भीती वाटली नाही. लॉंच चालवणारी माणसं तर लीलया मोटरसायकली, स्कूटर्स लॉंचच्या टपावर वगैरे चढवायची.

झब्बू - तुझी माझी जोडी जमली रे - (लाल-हिरवा)

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 19:36

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

प्रथम तुला वंदितो

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:27

मंडळी, पुढे तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरून तुम्हाला गणपतीच्या जागा/नावे ओळखायची आहेत. पाहा बरं श्री गणेशाच्या कृपेने किती ओळखू शकता .. गूगल, याहू, बिंग, सिरी, अ‍ॅलेक्सा, कोर्टाना ने करू शकता Happy

आरती सप्रेम ... (खेळ)

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:25

खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा.

उदा. प दी प धु = धूपदीप

मुंबई माझी मानाची

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 13:21

मंडळी ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. भारताच्या आर्थिक राजधानीबद्दल २१ प्रश्न दिले आहेत. तुम्ही त्यांची उत्तरे ओळखून (शक्यतो गूगल न करता) पोस्ट करायचे आहे. तुम्हाला माहीत असतील तेव्हढ्या प्रश्नांची उत्तरे द्या.

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 16:21

नमस्कार मायबोलीकर,

बाप्पाच्या स्वागताची तयारी सगळीकडे जोरात चालू असेल. यावर्षी बाप्पाला आणि माहेरवाशीण येणाऱ्या गौरीला नैवेद्य काय बनवायचा याचे ही प्लॅनिंग सुरू झाले असेलच! यावर्षी आम्ही तुमच्यासाठी नैवेद्य थाळी ही स्पर्धा घेऊन येतोय. स्पर्धा अतिशय सोपी आहे. भाग घेण्यासाठी गणपती बाप्पा, गौराई यांच्यासाठी बनवलेल्या नैवेद्याच्या पानाचा/ थाळीचा छानसा फोटो काढून आम्हाला पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.

Pages

Subscribe to RSS - संस्कृती