केटरींग

बादशाही ऑम्लेट

Submitted by कवठीचाफा on 22 December, 2012 - 13:00

बादशाही ऑम्लेट :

साहित्य

अंडी - २
कांदे - १ मध्यम आकाराचा
आलंलसूण पेस्ट - १ चमचा
मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या
सोया सॉस - १ चमचा
चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा
तेल - गरजेनुसार
जिरं - चिमूटभर
मोहरी - चिमुटभर
मीठ - चवीपुरते

कॄती :
प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत
त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये )
मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा

विषय: 

पुणे : मंगलकार्यासाठी खानपानाची व्यवस्था (outdoor caterers) बद्दल माहीती हवी आहे.

Submitted by माधवी. on 13 April, 2012 - 06:22

पुणे येथे मंगलकार्यासाठी ( वास्तुशांत / मुंज ) खानपानाची व्यवस्था पुरवणार्‍या caterers बद्दल माहीती हवी आहे. चांगला महाराष्ट्रीयन मेनु serve करणारे कोणी caterers कोणास माहीत आहेत का?
तसेच मंगलकार्याच्या आदल्या दिवशी व दुसर्‍या दिवशी घरपोच घरगुती जेवाणाच्या डब्यांची सोय होऊ शकते का?
कॄपया कोणास माहीत असल्यास कळवणे.

रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.

विषय: 

निकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 September, 2010 - 09:45

''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते!!

वन डिश मील

Submitted by शर्मिला फडके on 14 March, 2010 - 23:54

वेळ वाचवणारे, हेल्दी आणि चवदार असे काही 'वन डिश मील' मेनू इथे लिहूयात. नव्या व जुन्या मायबोलीवरील आहारशास्त्राच्या ग्रूपमधे अन्यत्र लिहिले गेलेले असे पदार्थ एकत्र रहावेत हाच उद्देश आहे. पदार्थ आधी लिहिला न गेलेला असेल तर पाककृती लिहूयात नाहीतर शक्य असेल तिथे लिन्क देऊयात.

विषय: 

वाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने

Submitted by मनःस्विनी on 16 December, 2009 - 01:12

एक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्‍यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.
खूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत? नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात?

कुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.

मला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - केटरींग