नवीन रेस्टॉरंट साठी कल्पना सुचवा

Submitted by चंपक on 18 August, 2016 - 21:38

नमस्कार!

अहमदनगर - औरंगाबाद राज्य महामार्ग क्र ६० वर अहमदनगर पासुन अंदाजे ६० किमी वर श्री क्षेत्र देवगड हे गांव आहे. तेथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.

तेथे मला ३७,००० स्क्वेअर फुट रोड्लगत जागेवर एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सदर जागा नेवासा, श्री क्षेत्र शिंगणापुर, औरंगाबाद आणि आदर्श गांव गोगलगांव यांपासुन १० ते ५० किमी अंतरावर आहे.

माझ्या कल्पनेनुसार - एक डायनिंग हॉल, एक कॉन्फरंस रुम (१०० क्षमता), एक १५-२०,००० स्क्वे. फुट. लॉन, ५ रुम्स/व्हिलाज (लॉज), अशी योजना करतो आहे.

त्याबाबत आपली मदत अपेक्षित आहे.

१) त्यासाठी सुंदर नाव सुचवावे. सदर नावाने पुढे किमान १० रेस्टॉरंट सुरु करता येतील असे "युनिव्हर्सल" नाव असावे.
२) रेस्टॉरंट डिजाईन संबंधी सुचना कराव्यात. उपलब्ध डिजाईन असल्यास पाठवावे.
३) मेन्यु कार्ड सुचवावे.
४) पर्यटक्-प्रवासी म्हणुन आपल्या सोयी--सुविधांसंबंधी अपेक्षा आवर्जुन सांगाव्यात.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'Ellora' he naav kasa vaaTel?
Kashyaa prakaarache khaadyapadaartha asaNaar? Tyaanusaar menu (kaay khaayalaa aavaDel) te saangataa yeil.

ParyaTak / pravaasi mhaNoon sagaLyaat mahattvaachi vaaTaNaara suvidhaa mhaNaje atyant swachchha prasaadhan gruha! Toilets , bathrooms chakachakeet swachchha asaNyaacha pravaasaatala sookh aapalyaakaDe durmiL!

Hotelaatalyaa taajyaa, chavadaar , uttam prateechyaa padaarthaanbarovar sabhovataalachaa swachchha parisar aaNi swachchha bathrooms jaasta graahak aakarShit karoo shakataat asa vaaTata.

navyaa prakalpaalaa mana:poorvak shubhechchhaa!

Roman leepit lihaava laagatay tyaabaddal maaf karaa.

अहो तुम्हाला रेस्टॉरंट सुरु करायचे आहे का रिसॉर्ट - सेमी रिसॉर्ट पद्धतीने मोठे प्रकरण उघडायचे आहे चंपकजी?? रेस्टॉरंट एका गाळ्यात असले तरी चालते, कारण तिथे फक्त पदार्थांची चव ताजेपणा इत्यादी दर्जा राखलेला पुरेसा असतो.
तुम्ही म्हणता आहात त्या संकल्पनेचे सेटप पुणे- अहमदनगर- औरंगाबाद रस्त्यावर बरेच आहेत असे वाटते, सर्वात सुप्रसिद्ध म्हणजे "स्माईल स्टोन" आहे/असावे असे वाटते मला तरी, त्यांचे सेटप, पुरवलेल्या सुविधा, खाद्यप्रकार अन ह्या सगळ्यात राहिलेली कमी, सुधारणा करायचा वाव, हे सगळे मिळून तुमच्या गरजेनुसार एक केस स्टडी/ फिजिबिलटी स्टडी नक्की पूर्ण होईल असे वाटते

पुढील उपक्रमांस भरभरून शुभेच्छा

(लाऊंज बिझनेस मध्ये घुसणार इच्छूक) बाप्या

फंडिंग कोण करणार? त्यावर कन्सेप्ट किती मोठी व एलॅ बोरेट आहे ते लिहिता येइल.
लँड ओनरशिप लीजिन्ग किंवा कन्स्ट्रक्षनची कॉस्ट धरली आहे का?
लीगल , म्युनि सिपल व इतर कोणत्या परवानग्यांची गरज आहे त्याची माहिती करून घेतली आहे का?

व्हेज की नॉनव्हेज धाबा कि थाली रेस्टॉ. का रिझॉर्ट ? ते नक्की सांगा.

सुविधां मध्ये एसी हॉल स्वच्छ टॉयलेट्स, विथ टिशू पेपर्स, वाय फाय सुविधा, गॅजेट चार्जिंगची सुविधा. उपल ब्ध झाली तर मस्त. हार्दिक शुभेच्छा.

Don't rush into any partnerships.

मीं एक आग्रहाची सूचना करूं इच्छितो - मीं पूर्वीं अनेक वेळ या पुणे- औरंगाबाद राज्य महामार्गावरून प्रवास केला आहे. वायुदूतच्या 'डॉर्निअर' या छोट्या व कमी उंचीवरून जाणार्‍या विमानातूनही माझं या महामार्गाचं निरिक्षण झालंय. दुतर्फा बव्हंशीं रखरखीतपणा असलेल्या या मार्गावरचा प्रवासी हिरवळीसाठी तहानलेला असतो. आपल्या रेस्टाँरंटच्या सभोंवतींच्या झाडं व हिरवळ यांच्या प्लानींगला अग्रक्रम द्या. त्यालाच साजेसं 'हिरवळ', ',हिरवाई', 'वनश्री' असं कांहींतरी नांवही द्यावं.[ 'ओअ‍ॅसिस' , सुचवत नाही कारण आसमंतावरची ती वाईट टीपणी होईल.]
प्रकल्पासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

स्कायलार्क ग्रुप,
विश्रांती,
शाईनिंग स्टार
हॉटेल बेधडक
निवांत
मनभावन
अ‍ॅट युअर सर्व्हिस
रॉयल ..असंख्य नावं सुचवता येतील. तुम्ही आधी लाईन व थीम पक्की करा.

छान! या तुमच्या नवीन उपक्रमाला भरघोस शुभेच्छा!

१. हिरवागार परिसर, झाडांखाली किंवा मांडवांखाली बसायला बाक / खुर्च्या, गझिबो, फळे-फुले-भाज्यांची परिसरात सेमी अर्बन शेती. (टेरेस, रूफटॉप, व्हर्टिकल गार्डनिंग? जिथे पाहुणे / कस्टमर्स येऊन पाहणी करू शकतात अशा प्रकारची व्यवस्था? ग्रीन हाऊस? हर्बल गार्डन? )
जे ठरवाल त्या अनुशंगाने नाव देता येईल. उदा. वनश्री / निसर्ग / विसावा / नंदनवन ....
ग्रीन टेरेस, ग्रीन रूफ.... विशिष्ट फुलांचे ताटवे / बगीचे करून त्यानुसार नाव.
अथवा, 'सुमधुर', 'सुग्रास', 'स्वाद', 'प्रसाद' अशा धर्तीचे नाव.

२. गावरान मेनू हवाच! सोबत अमराठी माणसालाही आवडेल, रुचेल, पसंत पडेल अशा मेनूची जोड.
उपवासाचे पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ, शीतपेये, आईसक्रीम्स, फळांचे रस, मिल्कशेक्स हे प्रकारही असावेत.

३. स्वच्छ व सुटसुटीत स्वच्छतागृहे, पाण्याचे सुनियोजन व सुव्यवस्थापन.

४. शेतकी बाजार - ताजी फळे, भाज्या वगैरे उत्पादने आणि स्थानिक कलाकृतीच्या वस्तू, भांडी इ. यांचे प्रदर्शन व विक्री?

५. मोबाईल रिचार्जिंग, वाय-फाय लाऊंज वगैरेंचाही जरुर विचार करावा.

वनश्री नाव मस्त आहे. आवडलं

एक कार सर्विसिंग रिपेअर सेटप जर शेजारी आला तर खूप मदत होईल प्रवाशांना. आणि अगदी प्राथमिक का होईना पण हेल्थ सुरक्षा टाइप सेटप. बेबी नर्सिंग स्टेशन डायपर चेंजींग रूम नक्की ठेवा. हे सर्व आत्ता फार जास्त अपेक्षा वाटेल पण मी जर कारने प्रवास करत असेन फॅमिली बरोबर तर मला हे सर्व आवडेल.

संपूर्ण पणे इकॉलॉजिकली सस्टेनिंग असा रिझॉर्ट बनवता येइल का ते बघून घ्या. तुमची विचार धारा तशी आहे म्हणून लिहीले.

संपूर्ण पणे इकॉलॉजिकली सस्टेनिंग असा रिझॉर्ट बनवता येइल का ते बघून घ्या. तुमची विचार धारा तशी आहे म्हणून लिहीले. + १

भाऊ तसेच अरुंधतीच्या प्रतीसादा ला प्रचंड अनुमोदन. क्या बात है अकु! मन की बात छीन ली.
चंपक तुम्हाला स्वतःला शेती व ऑर्गॅनीकचा भरपूर अनूभव आहेच. तुम्ही तुमची व इतर शेतकर्‍यांची ताजी शेती उत्पादने तिथे विक्रीस ठेऊ शकता. तसेच हिवाळ्यात हुरडा पार्टीसारखे अस्सल गावरान अनूभव पण देऊ शकता. तुम्हाला खूप शुभेच्छा!

चंपक नवीन प्रकल्पासाठी शुभेच्छा... आणि प्रकल्प सुरु झाला की कळव.

मायबोली ग्रुपचं मोठ्ठं गटग करुया तुझ्या रेस्टॉरंटमध्ये... Happy

चंपक तुम्हाला शुभेच्छा !

फक्त एकच सुचवेन साफ आणि प्रशस्त टॉयलेट ठेवा आणि त्याचीही जाहीरात करा. आपल्याकडे माणसांना नाही पण बायकांची नक्कीच कुचंबणा होते. त्यामुळे ही सोय असेल आणि टॉयलेट खरंच साफ राहत असतील तर नक्कीच लोकांचा राबता वाढेल. आणि वर्ड ऑफ माऊथ नी पण बरीच पब्लिसिटी होईल.

हे असले धागे लै बघितले माबोवर,शेवटी धागाकर्ता मनाचेच करतो सगळे .>>> So what? Atleast we get good ideas. He many not use them but somebody else will!

Good Luck Champak.

My top 3:-
-Clean toilets + beds.
-Charging stations + AC + water
-Quality Food available from early morning till late night. Considering this is on a highway, people may want to eat a good breakfast and hit the road early. Similarly, there maybe people who reach late and are hungry.

टार्गेट कस्टमर कोण आहे?
जर ट्रॅवल,वॉल्वो बसेस वगैरे असतील आणि त्या ब्रेकफास्ट,डिनर, स्नॅक्स आणि डिनरला थांबणार असतील तर ५०-७५ च्या वर दरडोई खर्च करणारे फार कमी असतील. अश्यांना फारश्या पॉश सुविधा नको असतात फक्त सोय हवी असते.
तुम्ही मिलिअन डॉलर्स टाकून सोई बनवल्या तरी वर्षभरात त्याची वाट लागलेली असेल. कारण दुर्दैवाने त्या वापरण्यासाठी आणि आहेत तश्या ठेवण्यासाठी लागणारी समज आणि सौजन्य बहुतांश लोकांकडे नाही. मेंटेनन्स चा कायम खर्च भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणतो.
जर ट्रॅवल आणि वोल्वो गाड्या थांबणार असतील तर प्रायवेट गाडीतून जाणारा जो माणशी १०० पेक्षा खर्च करू शकतो तो गर्दीमुळे सहसा येत नाही. रिपिट कस्टमर किती असणार आहेत? ते कळाले तरंच क्वालिटी वर किती खर्च करायचा ते ठरवू शकाल.
देवदर्शनाला येणारं पब्लिक टार्गेट करत असाल तर प्राईस पॉईंट फारंच कंपिटिटिव ठेवावा लागेल आणि क्ल्वालिटी साठी जास्तीचा पैसा सढळ हाताने सोडणार्‍या कस्टमरला गमवावं लागेल.
म्हणून म्हणतो टार्गेट कस्टर अ‍ॅनालिसिस हे फार पहिल्या स्टेज ला करावं लागणार आहे आणि तुम्ही नक्कीच त्याचा विचार केला असेलच.
कॉन्फरन्स रूम कोण वापरणार आहे? तिकडे आजूबाजूला मोठ्या कंपन्या, ईंडस्ट्री वगैरे आहेत का?
छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये ज्यंना तुमच्या किंमती वाजवी वाटतील अश्या ईन्कम ग्रूपची जनता आहे का?

माझ्या मते रिसॉर्ट टाईप सगळा डोलारा सुरूवातीलाच ऊभा करण्या ऐवजी फक्त रेस्टॉरंटने (हाय क्वालिटी पेक्षाही आसपास ऊपलब्ध पेक्षा बेअटर क्वालिटी ने) सुरूवात करावी.

हायझेन+१
सुरुवात उत्तम चवीचे जेवण (जमल्यास काहितरी निराळे आजूबाजूच्या हॉटेलांपेक्षा) देऊन करा. स्वच्छ प्रसाधनगृहे टिकवणे हे एक अवघड कसरत आहे. ते जर जमवता आले तर अनेक समंजस लोकांचा तुम्हाला दुवा लाभेल. शुभेच्छा!

अरे योकु, मिस्टेक काही नव्हती तो फक्त एक तेवढा रेफरंस. बाकी तुम्ही अगदी बरोबरंच लिहिलं होतं, ऊगीच पोस्ट काढलीत.

माझ्या मते रिसॉर्ट टाईप सगळा डोलारा सुरूवातीलाच ऊभा करण्या ऐवजी फक्त रेस्टॉरंटने (हाय क्वालिटी पेक्षाही आसपास ऊपलब्ध पेक्षा बेअटर क्वालिटी ने) सुरूवात करावी. >> +१ हायझेनबर्ग यांची पोस्ट पूर्ण पटली.
खूप शुभेच्छा.

मस्त उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा.

श्रीरामपूरला असताना देवगड दत्तमंदिरात जाणे व्हायचं. छान आहे तो देऊळ परिसर.

तुमच्या प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा।
आणि रेस्टॉरंट चालू झाल्यावर नक्की कळवा।
नेहमीचा रूट असल्याने एकदातरी नक्की भेट देईन।

Pages