प्रवास

माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - १२ पासेस, ९ लेक्स अर्थात लेह-लडाख.

Submitted by केदार on 31 July, 2013 - 09:35

गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !

प्रवासातला पेशंट

Submitted by डॉ अशोक on 27 July, 2013 - 08:53

प्रवासातला पेशंट

प्रवासात मला पुस्तक वाचत बसणं, किंवा मोबाईलशी खेळत बसणं अजिबात आवडत नाही. मी मनुष्यवेडा माणुस आहे. त्यामुळे मला विमान प्रवासापेक्षा रेल्वे किंवा बस प्रवास आवडतो. एका विमान प्रवासात जलाल आगा माझ्या शेजारच्या सीट्वर होता. (हो, तोच तो! "शोले" मधे त्याच्यावर "मेहेबूबा ओ मेहेबूबा" हे गाणं चित्रीत झालंय !) पण दोन तासाच्या प्रवासात गडी एका वाक्यानंही माझ्याशी बोलला नाही ! मी प्रयत्न करून सुद्धा. त्यामुळे विमान प्रवासात मला मजा येत नाही.

शब्दखुणा: 

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

Submitted by Discoverसह्याद्री on 20 July, 2013 - 12:27

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
MadheUpandya_DiscoverSahyadri_01.jpg

कोण मायबोलीकर स्प्रिंगफिल्ड,इलिनोय इथे आहे का?

Submitted by अप्रतिम on 20 July, 2013 - 09:07

शिक्षणाच्या निमित्ताने मी स्प्रिंगफिल्ड (इलिनोय) येथे जात आहे.कोणी मायबोलीकर येथे रहातात काय?
या शहराविषयी माहिती हवी आहे. १२ ऑगस्टला भारतातून प्रयाण करणार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 7 July, 2013 - 15:02

....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

Shelarkhind1_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' (ओंकार ओक) याचे अभिनंदन...

Submitted by हेम on 7 July, 2013 - 05:30

यंदाच्या गिरीमित्र संमेलनातर्फे घेण्यात आलेल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेचे निकाल जाहिर झाले आहेत.

१) त्यांत मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' ओंकार ओक याच्या ब्लॉगला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे मायबोलीतर्फे हार्दिक अभिनंदन

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..

प्रथम क्रमांक "ट्रेक ओ ग्राफी" – स्वच्छंदयात्री - अमित श्रीपाद कुलकर्णी
द्वितीय क्रमांक "भटकंती अनलिमिटेड" - पंकज झरेकर
तृतीय क्रमांक "सह्याद्रीमित्र" - ओंकार ओक
उत्तेजनार्थ "बंकापुरे" - जितेंद्र बंकापुरे

अजिंठा: भाग १

Submitted by डोंगरवेडा on 3 July, 2013 - 23:13

भारतीय शिल्पकलेतले अत्त्युच्च वैभव पाहायला वेरूळ, अजिंठा इकडे जायची कितीतरी वर्षापासूनची इच्छा होती. शेवटी मित्रांबरोबर ऑक्टोबरमध्ये जायचा बेत नक्की झाला. पण ऐनवेळी टपकलेल्या हापिसच्या कामांमुळे शेवटी एकदाचे डिसेंबरमध्ये निघालो.

तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?

Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10

गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे.

विषय: 

कयाक/एअरफेअर (Kayak.com/Airfare.com) चा अनुभव

Submitted by नात्या on 3 June, 2013 - 08:42

कयाक (kayak.com) वर दिसणार्‍या एअरफेअर (Airfare.com) या तिकीट कंपनीकडुन कोणी तिकीट बुक केले आहे का? अमेरिकेतून भारतात जाण्यासाठी तिकीटे शोधताना कयाकवर दिसणारी सगळी स्वस्त तिकीटे ही एअरफेअर या कंपनीची दिसत आहेत. तिच तिकीटे एक्सपिडीया/ऑर्बिट्झ कमीत कमी १०० ते १५० डॉलर्सनी महाग आहेत. त्यामुळे जरा शंका येत आहे. इंटरनेटवरील या साईटबद्दल बरेचसे वाईट रिव्ह्यु हे तिकीट बदलाबाबत होते. जर एकदा तिकीट विकत घेतल्यावर त्यात फेरफार अपेक्षित नसतील तर ही साईट चांगली आहे का?

विषय: 

लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर

Submitted by अंड्या _ ऋन्मेऽऽष on 2 June, 2013 - 04:41

आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्‍या भिकार्‍याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..

Pages

Subscribe to RSS - प्रवास