प्रवास

आडदांड - नाणदांड

Submitted by Discoverसह्याद्री on 16 April, 2014 - 22:31

खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह

दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...

(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)

घोरवडेश्वर:: प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'

Submitted by Discoverसह्याद्री on 5 April, 2014 - 03:58

… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी!!!

विमानप्रवासाची भिती कशी घालवावी?

Submitted by सातू on 24 March, 2014 - 07:34

मला विमानप्रवासाचा फोबिया आहे. त्यात मलेशियन विमानाचा अपघात झाल्यापासून मला प्रवास करायचे खूप टेन्शन येत आहे . पुढच्याच महिन्यात मला भारत अमेरिका प्रवास करावा लागणार आहे . काय करू म्हणजे टेन्शन जाईल.

विषय: 

आमचेही प्रवासवर्णन...

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 March, 2014 - 06:22

मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो. (आमच्याकडे आजकाल प्रत्येक वळणावर आढळणार्‍या भाजीच्या गाडीला मंडई म्हणण्याची प्रथा आहे. कसं भारदस्त वाटतं). आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. आधी सौ बाहेर पडल्या नंतर मी. (लोक म्हणतात बायकोच्या तालावर नाचतो, पण हा जमाना Woman Empowerment चा आहे याचा कोणी विचारच करत नाही). दाराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या लिफ्टचे बटन दाबले. तशी सौ ने हाक दिली, "अरे, आपले आता नेहमी जिन्यानेच उतरायचे आणि चढायचे ठरलेय ना.

विषय: 

कारण अभ्यास...

Submitted by pankajkoparde on 21 February, 2014 - 09:44

आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं.

सवय

Submitted by विजय देशमुख on 19 February, 2014 - 00:06

"काय घाणेरडी असतात ना माणसं?"
"अं"
"तुझं लक्ष कुठे आहे? बघितलस ना कसे केळाचे सालं फेकले त्या बाईने. काहीच कसं वाटत नाही या लोकांना"
"हम्म"
"आणि आपले घरचे तर अजुनच महान. मी म्हटलं की कचरा वेगवेगळा करुन पॉलिथिन बॅगमध्ये फेका, तर मलाच वेड्यात काढलं. आणि वरुन डोस... तुमचे परदेशातले नियम तुमच्याजवळ ठेवा."
"हं"
"हं, काय? तु का नाही सांगत त्यांना? मीही शेवटी कंटाळून कचर्‍याच्या ढिगातच फेकले रॅपर्स"
"हे मात्र तू बरोबर केलं नाहीस."
"अच्छा, मी केलं ते चुकलं अन ते करत आहेत त्याचं काय?"
"तुला लहानपणी आपल्याला एक गोष्ट होती ती आठवते?"
"कोणती गोष्ट?"

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.

Submitted by निलेश भाऊ on 14 February, 2014 - 03:21

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
DSCN5454.JPG

क्वाला लंपूरबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मृदुला देसाई on 12 February, 2014 - 17:57

नमस्कार मंडळी,
पुढील महिन्यात क्वाला लंपूरला जाण्याचा योग येत आहे. त्यासाठी मला थोडे मार्गदर्शन हवे आहे. मी, माझा नवरा आणि आमचे पिल्लू असे आम्ही तिघेच आहोत. मुलगी पाच वर्षांची असल्यामुळे थोडी काळजी वाटत आहे.
जालावर शोध घेतलं तेव्हा बाटू गुहा, पेट्रोनास टॉवर, लांगकावी, लेगोसिटी, गेंटिंग हायलंड, बर्ड पार्क, जालान अलोरबद्दल या पर्यटन स्थळांबद्दल माहिती मिळाली. तिकडे खाण्या पिण्याची एकंदर रेलचेल आहे असे लक्षात येते. काय खावे ते सगळेच सांगत आहेत पण काय खाउ नये, खाण्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याबद्दल कुठेच उल्लेख नाही.

विषय: 

सिध्देश्वर यात्रा - सोलापूर

Submitted by रंगासेठ on 31 January, 2014 - 23:42

दरवर्षी संक्रांतीला सोलापूरला ग्रामदैवत 'श्री सिध्देश्वरा'ची यात्रा भरते. यंदा पहिल्यांदाच ही यात्रा अनुभवायची संधी मिळाली. या यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असतं.

सह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड

Submitted by Discoverसह्याद्री on 8 January, 2014 - 08:48

(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)

...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,

Pages

Subscribe to RSS - प्रवास