कयाक/एअरफेअर (Kayak.com/Airfare.com) चा अनुभव

Submitted by नात्या on 3 June, 2013 - 08:42

कयाक (kayak.com) वर दिसणार्‍या एअरफेअर (Airfare.com) या तिकीट कंपनीकडुन कोणी तिकीट बुक केले आहे का? अमेरिकेतून भारतात जाण्यासाठी तिकीटे शोधताना कयाकवर दिसणारी सगळी स्वस्त तिकीटे ही एअरफेअर या कंपनीची दिसत आहेत. तिच तिकीटे एक्सपिडीया/ऑर्बिट्झ कमीत कमी १०० ते १५० डॉलर्सनी महाग आहेत. त्यामुळे जरा शंका येत आहे. इंटरनेटवरील या साईटबद्दल बरेचसे वाईट रिव्ह्यु हे तिकीट बदलाबाबत होते. जर एकदा तिकीट विकत घेतल्यावर त्यात फेरफार अपेक्षित नसतील तर ही साईट चांगली आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नात्या एअरफेअर पासुन दुर रहा.अगदि ५०० डॉलरने स्वस्त मिळत असेल तरिहि. माझ्या भाचीला अगदि वाईट अनुभव आहे.
तिने ३ महिन्यांपुर्वि एक तिकिट बुक केले होते. २ तासात ईमेल येइल असे वेब्साईट्वर लिहिले असताना दुसर्‍या दिवशि मेल आलि तिकिटाचि आणि तिसर्‍या दिवशी तिकिट व्हाईड झाल्याची. आणि क्रेडिट कार्ड वर चार्ज पण आला. भाचि ने एअरफेअरवाल्यांना कॉल केले ५-६ वेळा तिकिटासाठि पण अगदी खराब सर्व्हिस.कुठल्याहि एजंटने मॅनेजरशि बोलु दिले नाहि. मग शेवटि तिने क्रेडिट कार्ड कंपनि ला कॉल करुन पेमेंट स्टॉप केले तर एअरफेअर वाल्यांचे पेमेंट्साठि कॉल वर कॉल यायला सुरुवात झालि तिकिट व्हॉईड झालेले असुनहि.

माझ्या माहितीत एकीने केले होते कयाक वरून बूकींग ३-४ वर्षांपुर्वी .. काहिही प्रॉब्लेम आला नाही ..

मी मागच्या वेळी बुकींग करताना कयाक वरच सर्च केलं आणि हवं त्या डील वर क्लिक केल्यानंतर मात्र एअरलाईनच्या साईटवर रीडायरेक्ट झाले ..

धन्यवाद, प्रिया आणी सशल.

तसा आम्हाला प्रवासाला वेळ आहे पण हे लोक (Airfare.com) बेसिक रिझर्वेशन कींवा क्रेडीट कार्ड बद्दल घोळ घालणार असतील तर त्यांचा नाद सोडलेला बरा. पैसे ही जातील आणी आयत्यावेळी गोंधळ.

सशल, एअरफेअर सोडून बाकी साईटींचा अनुभव चांगला आहे पण हे एअरफेअर वाले कयाक च्या साईटवरच सगळे पेमेंट इत्यादी घेतात, सीट सिलेक्शन करायलाही वाव दिसला नाही.

http://matrix.itasoftware.com/ ही अत्युत्कृष्ट साईट आहे.
त्यावरून थेट बूक करता येत नसलं तरी प्रत्येक तिकिटाची पूर्ण फोड करुन दाखवली जाते, आणि तुमच्या (कोणत्याही) एजंट कडून मग ते तिकीट बूक करता येतं.

जबरी आहे साईट.. Clean interface, great filtering options, price breakup. Permutations/Combinations करण्यासाठी एकदम मस्त. Time Bars प्रकार फारच आवडला. धन्यवाद!!

मस्त आहे ती साईट Happy
रच्याकने भारतामध्ये डोमेस्टीक फ्लाईट बुकींग करता मी www.cleartrip.com वापरायचो एक्दम क्लीन इंटर्फेस आणि काही लपवालपवी नाही. Happy

एअरफेअरचा अनुभव नाही. मी ऑरबिट्झ वापरलंय ३,४ दा आणि अनुभव चांगला आहे. हल्ली बर्‍याचदा एअरलाईनच्या साईटवरुनच बुक करतो.

मी बर्‍याचदा TRIPADVISOR वापरतो , आतापर्यंत चांगल्या डिल मिळाल्या आहेत.