तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?

Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10

गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे. अत्यंत आंगावर काटा येणारा अनुभव होता. देवळात सुद्धा स्वछता अजिबात नाही. सर्वत्र कचराच कचरा. पवित्र पणाची कुठे हि निशाणी नाही. भाविकांच्या काही नैसर्गिक गरजा असतात याचे हि कुणाला भान नाही. पिण्याचे पाणी , स्वछता गृह याची काही सोय नाही , जी आहे त्याची अवस्था नरका पेक्षा हि वाईट आहे. एवढ्या प्राचीन मंदिराचा या लोकांनी पार उकिरडा करून टाकला आहे. दक्षिणेतील मंदिराच्या पुढे येथील अवस्था फारच लाजिरवाणी आहे.आपण स्वतः हे बदलण्या साठी काहीच करू शकत नाही याची मात्र लाज वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळीचा मुद्दा

धन्यवाद उपस्थित केल्याबद्दल

मुळात भारतीय संस्कृतीत सॅनिटेशन ही कल्पना मुळात तितकीशी रुजलीच नाही आहे असे माझे मत आहे
'बाकी काही कसेही असो माणसाचे मन निर्मळ असावे स्वच्छ असावे " या संतांच्या वक्तव्याचाचा लोक असाही अर्थ काढतील हे त्या काळात संतसज्जनाना जाणवले नसावे

तुळाजापूर जरातरी बरय आमच्या पंढरपुरात सगळाच उदो उदो आहे

खरयं! देवळात स्वछता नाही , आणि महाद्वाराच्या समोर प्रसादाच्या फुटलेल्या बांगड्यांचा कच पडलेला असतो! आणि फुटलेल्या तेलाच्या पिशव्या...पावसाळ्यात तर भयंकर अवस्था असते.

पर्यटन स्थळ असेल तर चांगल्या सोई सुविधा दिल्या तरच लोक येतात. येथे देवाला श्रद्धेने लोक येतात. येथे गरज भाविकांना आहे हॉटेल वाल्यांना अथवा इतरांना नाही. काहीही झाले सोई सुविधा दिल्या नाही तरी तुम्ही येणारच हे त्यांना माहित आहे म्हणूनच फ़क़्त पैसे काढणे हा येथील धंदा आहे.

त्या तुळजापुरात अनधीक्रुत बांधकामात ते जुने देवुळ कुठे आहे ते शोधावे लागते.. देवुळ कुठले आणि घरे कुठली काही एक कळत नाही..

मला वाटतं कोकणातील देवळं याला अपवाद आहेत. +१११११११११११
कदाचित, तीं अजून तीर्थक्षेत्रं मानली जात नाहीत.-११११११११११ गणपती पुळे , अष्टविनायकांची मंदिरे , लक्ष्मी केशव मंदिरे ई. ई.
खरच कोकणातल्या मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटत.

हो, या बद्दल गेल्या वर्षीच्या लोकप्रभामध्ये पण वाचले होते, वाचुन खूप वाईट वाटले आणी राग पण आला. पण काहीच करु शकत नाही ही खंत पण वाटली.

kabhayk ,
तुम्हाला अनुमोदन.
मागे आम्ही गेलो होतो तेव्हाही मन विषण्ण झालं होतं तुळजापूरची अवस्था बघून.
मला वाटतं कोकणातील देवळं याला अपवाद आहेत. +१
कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ ही छान/स्वच्छ (शहराच्या मध्यवर्ती भागात असूनदेखील) आहे. आणि कोणीही मागे लागत नाही.अगदी गडबड असेल्/गर्दी असेल तर तुम्ही मुख दर्शन ही घेऊ शकता.

खरंय!!
कल्लोळ तीर्थ म्हणुन जे कुंड आहे, तिथे तर पायर्‍यांवर शेवाळे आहे, आणि पाणी पण हिरवटच होते.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी (शिवरायांच्या आराध्यदैवत) तुळजाभवानीच्या मंदिराची अवस्था बघुन खुपच वाईट वाटते.

कलावती देवींची मंदीरं पण अतिशय स्वच्छ असतात. स्वच्छतेचे काम भावीक स्वतः करतात सेवा म्हणून. मन खरच प्रसन्न होते.

गाणगापुरला भीमा-अमरजा संगमावर तर आजुबाजुला प्रातःविधी करुन ठेवले होते. कशीबशी कोरडे कपडे ई. सामान ठेवायला जागा मिळवली.

देवळात तर पुजारी अभिषेकासाठी अक्षरशः गिर्‍हाईक शोधत होते. दर्शन घेऊन बाहेर आलो, नारळ अख्खाच होता. एकीकडे नारळ फोडायची जागा अशी पाटी दिसली. तिथे एक पुजारीच नारळ फोडून देत होता. त्याला नारळ फोडायला दिला, तर प्रसादाची कवड दक्षिणा दिल्याशिवाय परतच देईना. Sad

पिण्याच्या पाण्याची, स्वच्छ हॉटेलांची तर बोंबच होती.

अक्कलकोट्-गाणगापुर रोड जो महाराष्ट्रातून गाणगापुरला जायचा एकमेव मार्ग आहे, अतिशय भयानक आहे. फुटभर खोलीचे खड्डे आहेत.

या ठिकाणी जरी ट्रस्ट्,संस्थाने असली तरी ती विशिष्ट घराण्यांच्या मालकीचीच असतात.
ही घराणी मंदिर हे आपले दुकान, आणि येणारे लोक ही गिर्‍हाईके याच दृष्टीकोनातून पाहात असतात.

पाणी, स्वच्छता असो वा नसो, लोक येत राहणार हे त्यांना माहिती आहे.

खूप पूर्वी कधीतरी तुळजापुराला गेले होते देवळात. तेव्हाही अवस्था स्वच्छ नव्हतीच! स्थानिक पातळीवर स्वच्छता, आरोग्य अभियान, स्थानिक लोकांमध्ये त्याबद्दल जागृती व स्वच्छतेचे काटेकोर नियम करून त्यांचे पालन न केल्यास त्यानुसार दंड याखेरीज काही उपाय दिसत नाही. बरं, तिथे स्वच्छता असो अगर नसो, तुम्ही जायचे थांबवणार आहात का? अमक्या तमक्या पातळीवर देवस्थान, परिसर व गाव स्वच्छ झाल्याशिवाय, तिथे पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने मूलभूत सोयीसुविधा झाल्याशिवाय आम्ही तिथे जाणार नाही, असे ठरविणारे व ते पाळणारे, तो संदेश त्या त्या संबंधित प्रशासनाच्या कानांवर घालणारे कितीजण असतील? कितीजण किमान पत्राद्वारे तरी स्वच्छता व इतर गैरसोयींबद्दलची तीव्र नापसंती व त्यावर करता येण्यासारखे उपाय तेथील प्रशासनाला कळवतात? ह्या देवळांची व परिसराची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होते का? तेथील उघड्यावर विकायला ठेवले जाणारे अन्न, कचरा यांबद्दल स्थानिक प्रशासन काय करते? असे अनेक प्रश्न आहेत. आळंदी घाटाचा परिसर ज्याप्रमाणे एका संस्थेला स्वच्छता करण्यास देऊन तिथे काही प्रमाणात सुधारणा व स्वच्छता झाली तशी सुधारणा येथेही करता येईल.

यावर्षी तुळजापूर गाणगापूर आणि अक्कलकोट करण्याचा विचार होता पण हे वर्णन वाचून सावध झालो .आम्ही फार भाविक नाही फक्त आपली श्रध्दास्थाने कशी आहेत हे पाहाण्याची उत्सुकता .कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ ठीक आहे पण भोवतीच्या सर्व ओवऱ्या इतर देवांनी(हल्लीची भर) अथवा पेढे फुले विकणाऱ्यांनी अडवल्या आहेत .

तुळजापूरला जाणार असालच तर सोबत पुरेसे पाणी आणि खाण्याचे पदार्थ ठेवा. चुकुनही तिथे पाणी पिणे आणि हॉटेल मध्ये काही खाण्याचे धाडस करू नका नाही तर आजारी पडणार हे नक्की. जेवणासाठी शक्य असल्यास पुजार्या च्या घरी सोय होते का ते पहा पण पाणी स्वतः कढचेच वापरा. राहण्या साठी ७००-८०० रु मध्ये बर्यापैकी हॉटेल मिळेल.

राहण्या साठी ७००-८०० रु मध्ये बर्यापैकी हॉटेल मिळेल.>>>> सोलापूरला राहून तुळजापूरला जाणे करावं. ४५ मिनीटांचा रस्ता आहे. तिथे गेल्यावर (केवळ तिथले भटजी/बडवे सांगतात म्हणून) नमस्काराशिवाय सोपस्कार करू नयेत. भरपूर फसवणूक चालते. देवीचे श्रीखंडानं सिंहासन भरणे वगैरे प्रकारांमुळे गाभाराही अस्वच्छ होतो, गाभार्‍यात कुबट वास भरून राहतो. मूर्तीला हानी पोचते ते वेगळंच. ओटी/साडी वगैरे दिलीत, तर तीच साडी परत बाहेर विकायला येते. देवस्थानाला भरपूर पैसा मिळतो पण गाव सुधारण्यासाठी उपयोग केला जात नाही. काही वर्षांपूर्वी 'चित्रलेखा' मध्ये भ्रष्टाचाराची भरपूर प्रकरणं बाहेर आली होती. चित्रलेखावर किती विश्वास ठेवायचा म्हटलं तरी काही प्रमाणात तथ्य असण्याची शक्यता आहे. तरी सध्या कुंकवाचे सडे, देवळात नारळ फोडणे वगैरे प्रकार बंद केले आहेत. अपंग, वयस्कर लोकांना रांगेत उभं न राहता वेगळ्या वाटेने ताबडतोब दर्शन मिळते. देवीच्या मूर्तीची झीज होत असल्याने सिंहासन भरायचं बंद करणे, दिवसातून एकच अभिषेक करणे वगैरे उपाय योजनांचा विचार चालला होता, त्या सुरू केल्या आहेत का नाही माहित नाही.
देऊळ प्राचीन आहे, पण दुर्दैवानं त्याची बांधणी / इतिहास वगैरे याला काहीही महत्व दिलेलं नाही. खेड्यापाड्यातली जनता येते, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयी वगैरे त्रासदायक वाटतात.

सोलापूरला राहून तुळजापूर करून येण्याचे अंतरात आहे असे मला कळले .शिवाय सोलापूर स्टेशनची रेल्वेची एसी रिटायरिंग रूम चोवीस तासाला पाचशे रु (साधी अडिचशेत )असे फेब्रुपर्यत भाडे होते .आता वाढले असेल .रूमचे आरक्षणसुध्दा नेटवरून होते असे कळले .पण आता जाणार नाही .देवदर्शनाचाच विषय निघाला आहे तर केदारनाथयात्रेला गेलेल्या भाविकांच्या दु:खात सहभागी आहे .

देव दर्शनाचे समाधान मिळणार नसेल तर जाण्यात काय अर्थ आहे? आपण मानसिक समाधान मिळण्यासाठी जातो. या वेळी प्रवासासाठी ५८०० रु , पूजा आणि नैवेद्य २५०० रु , ८०० रु राहण्यासाठी हॉटेल आणि इतर किरकोळ १००० रु असा साधारण १०००० रु खर्च केला पण समाधान काहीच मिळाले नाही पण मानसिक त्रास फार झाला. हेच पैसे गरजू मुलांना शालेय सामान घेण्या साठी दिले असते तर २० मुलांना उपयोग झाला असता. आणि मिळालेले समाधान वेगळेच.

मी मागच्या वर्शी च तुळजापुरला गेले होते, हॉटेल मधे खाण्याचा मला तरी फार इशु वाटला नाही (आम्ही २दा नास्टा केला`जेवण नेहमीच पुजार्‍याकडे असते) शहराशी तुलना कराल तर आवडणार नाहिच, पाणी मात्र पॅक वॉटर पिले पण ते आम्ही ऊसगाव वाल्या.न्नी बाकी घरच्या.न्नी तिथले पाणी (पुजार्‍याच्या घरी जेवताना) पिले पण तसा इषु नव्हता.

बाकी गल्लि-बोळात घाण्,बकाली,म.न्दिरात कचरा ह्याबाबत सहमत! तिथल्या गल्ल्यात फिरताना कधी पाय गटारित जाइल सा.न्गता येत नाही.खरतर यशाच दान मागायला या माऊली कडे महाराष्ट्रातले अनेक नेते जातात मग हे त्या.न्ना दिसत नसेल का?

(तुळजापुरला राहायच नसेल तर अक्क्लकोट जवळ आहे,तिथल्या म.न्दिरात भक्त-निवासात सोय होते,स्वछता उत्तम आहे)
स्वछता,राहण्याची उत्तम सोय यासाठी शेगाव ईतक स्वच्छ म.न्दिर मला तरी दिसल नाही.

खरतर यशाच दान मागायला या माऊली कडे महाराष्ट्रातले अनेक नेते जातात मग हे त्या.न्ना दिसत नसेल का?>>>> स्थानिक राजकारण, मतं, बडव्यांचे हितसंबध अशी बरीच गुंतागुंत आहे.

स्थानिक राजकारण, मतं, बडव्यांचे हितसंबध अशी बरीच गुंतागुंत आहे.>> ती कुठे नाहिये भारतात? सगळिकडेच मग काय प्र्श्न सुटणार्च नाहित का? कदाचित तसच असाव हे!

ती कुठे नाहिये भारतात? सगळिकडेच मग काय प्र्श्न सुटणार्च नाहित का? कदाचित तसच असाव हे!>>> कळलं नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. राजकिय इच्छाशक्तीचा अभाव असला तर लवकर प्रश्न सुटणार नाहीत, सुटत नाहीत ही वस्तुस्थिती संपूर्ण भारतभर आहे.

पण स्वच्छता झाली, चांगली सोय झाली, त्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकही येऊ लागले तर ते सर्वांच्याच हिताचं नाही का?

तिथे स्वच्छता असो अगर नसो, तुम्ही जायचे थांबवणार आहात का? >> मी आधी गेले नाहीये आणि अता हे वाचून अजीबातच जाणार नाही. अर्थात , माझ्या एकटीच्या न जाण्याने काय होतेय , पण आपले सांगितले.

कळलं नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. राजकिय इच्छाशक्तीचा अभाव असला तर लवकर प्रश्न सुटणार नाहीत, सुटत नाहीत ही वस्तुस्थिती संपूर्ण भारतभर आहे.>> तुझ्याशी सहम्त आहे मी! पण राजकारण करणारे कुठवर फायद्याच राजकारण करणार्?आणी हे सगळ बदलेल कधी?

पण स्वच्छता झाली, चांगली सोय झाली, त्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकही येऊ लागले तर ते सर्वांच्याच हिताचं नाही का>>> हो आहे. पण त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. कोण करणार? आणि कुठला करणार? देवस्थानाला भरपूर पैसा मिळतो. पण तो खर्च केला तर स्वतःच्या तुंबड्या कशा भरता येतील? शिवाय जनजागृती झाली तर तो ताप वेगळाच. सत्ता कायम टिकून रहात नाही, मग ती जास्तीत जास्त काळ स्वतःकडे कशी राहिल, (जनहिताची नाहीत तरी देवाधर्माची कामं करण्याऐवजी) जास्तीत जास्त खाबूगिरी कशी करता येईल इकडंच लक्ष असतं. महाराष्ट्राच्या बर्‍याच मुख्यमंत्र्यांचं तुळजाभवानी हे कुलदैवत होतं. काय केलं त्यांनी सत्तेवर असताना?

Pages