करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन प्रशासनाच्या या नविन निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसला आहे.
जी शाळा, काॅलेजेस निदान काही लेक्चर्स प्रत्यक्षरित्या न घेता संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने घेतील त्यामधील परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा रद्द करुन मायदेशी पाठविण्यात येईल असे प्रशासनाने ठरविले आहे.
(आणि हे अर्जुना, मी आता तुला आमच्याकाळचं हे
परमगुह्यज्ञान देतो आहे. )
** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.
**कृती:
प्रथमतः पुस्तकांचे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे.
त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील, अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.
विध्यार्थी म्हणून आपलं एक वेगळं विश्व असत. प्रथम वर्षांपासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकेपर्यंत अनेक अनुभव आपल्या सोबतीत येतात. चार वर्षाच्या या प्रवासात सबमिशन, अभ्यास , परीक्षा यांसोबत खेळता खेळता विध्यार्थी कला- कौशल्य, खेळ इ. गोष्टींमध्ये सुद्धा आपले कर्तृत्व आजमावतो. आपल्या व्यक्तिमत्वावर निरनिराळे पैलू पाडत असतो. यामध्ये भलेही आपल्याला अनेक संकटाना सामोरे जावं लागत. पण आपण आपली जबाबदारी लीलया पार पाडतो. एवढं करूनही थांबून चालत नाही. कारण महाविद्यालयाच्या बाहेरील विश्वात मोठी स्पर्धा चालू असते. मग चालू होते पुन्हा न थांबणारी धावपळ...
आज बर्याच दिवसांनी कॉलेजला गेलो होतो. तिथल्या स्टाफची मिटींग चालू होती म्हणून मी जरा बाहेर उभा राहिलो.
मार्च महिना असल्यामुळे रणरणतं ऊन होतं. मी आपला एका झाडाखाली सावलीत मोबाईल बघत उभा होतो. तेवढ्यात अचानक पाठीवर कुणीतरी धक्का दिल्यासारखा वाटला. मी मागे वळून बघितलं तर एका मुलीचा चुकून धक्का लागला होता. तिच्या बॅगमधले काही पुस्तकं खाली पडले होते. ती बहुतेक गडबडीत होती. मी तिचे पुस्तकं गोळा केले आणि तिला देऊ लागलो. परंतु तिचं त्याकडे लक्षच नव्हतं पळत आल्यामुळे तिला धाप लागली होती. मग मी तिला शेजारच्या एका बाकड्यावर बसायला सांगितलं आणि तिचं पुस्तक घेऊन मीही तिच्या शेजारीच बसलो.
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात सापडून निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसंतरी करून, रडत खडत पुढच्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढायची शासनाची पॉलिसी असायची.
ज्याप्रमाणे नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.
आज कालची तरुण Attraction लाच प्रेम समजत आहेत, त्यांना खरे प्रेम समजावे म्हणुच हा धागा पेश करत आहे.
बंध मैत्रीचे..
मैत्रीच्या ऊक्त्या असतात महान,
अनूभवाची शिदोरी मात्र होती लहान..
तो एक दिवस आला खास,
मिळेल मित्र मैत्रीणी दिलखुलास..
आपला मित्र परिवार आहे कुटुंब समान,
वेळ प्रसंगी कोणी नाही पण मित्रच देतील आधार..
अशीच राहो मैत्री आपली,
एकमेकांना जपणारी...
घेऊ आज वचन सारे,
या बंधातून नाही जाऊ देणार वारे..