माझ्या महाविद्यालयीन मित्रांसाठी थोडंसं...

Submitted by दिग्विजय बळजी on 25 June, 2020 - 13:17

विध्यार्थी म्हणून आपलं एक वेगळं विश्व असत. प्रथम वर्षांपासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकेपर्यंत अनेक अनुभव आपल्या सोबतीत येतात. चार वर्षाच्या या प्रवासात सबमिशन, अभ्यास , परीक्षा यांसोबत खेळता खेळता विध्यार्थी कला- कौशल्य, खेळ इ. गोष्टींमध्ये सुद्धा आपले कर्तृत्व आजमावतो. आपल्या व्यक्तिमत्वावर निरनिराळे पैलू पाडत असतो. यामध्ये भलेही आपल्याला अनेक संकटाना सामोरे जावं लागत. पण आपण आपली जबाबदारी लीलया पार पाडतो. एवढं करूनही थांबून चालत नाही. कारण महाविद्यालयाच्या बाहेरील विश्वात मोठी स्पर्धा चालू असते. मग चालू होते पुन्हा न थांबणारी धावपळ...
शिवाजी विद्यापीठासमोरील महाराजांचा पुतळा आपल्याला याचीच जाणीव करून देतो...फक्त तलवार सोबत असून चालत नाही तर मनगटात बळ आणून ती चालवता आली पाहिजे .. तसंच, क्षमता असून चालत नाही तर ती आजमावता सुद्धा आली पाहिजे.. पण आपण डगमगत नाही...आपण या स्पर्धेच्या घोडयावर स्वार होतो अन सुरु होते बेताल घोडदौड .. कारण स्पर्धेला तोंड देणं हे जणू आता आपल्या जगण्याचा भाग झालय ...
येणारा प्रत्येक दिवस एक नव आव्हान घेऊन येतो आणि आपण सुद्धा त्याच हसत हसत स्वागत करतो ...
कारण ...

आपण सुशिक्षित आहोत..!!!!

तुमचाच ✍,
दिग्विजय बळजी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults