अमेरिकेतील विद्यार्थी व्हिसा रद्द करुन मायदेशात परत रवानगी

Submitted by निरु on 7 July, 2020 - 00:40

करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन प्रशासनाच्या या नविन निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसला आहे.

जी शाळा, काॅलेजेस निदान काही लेक्चर्स प्रत्यक्षरित्या न घेता संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने घेतील त्यामधील परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा रद्द करुन मायदेशी पाठविण्यात येईल असे प्रशासनाने ठरविले आहे.

मायदेशी जायचे नसेल तर जी काॅलेजेस संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन घेत असतील त्यातील विद्यार्थ्यांना ज्या काॅलेजमधे प्रत्यक्षरित्या शिकवले जाते अशा ठिकाणी ॲडमिशन घेणे आवश्यक राहिल.

अमेरिकेत नवीन विद्यार्थ्यांनाही संपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यापीठात अशा विद्यार्थी व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही.

कुठल्याही परिस्थितीत काॅलेजेस चालू व्हावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा Outbreak झालेल्या अथवा ज्या ठिकाणी पुढे होईल तिथल्या काॅलेजेस/विद्यापीठांनाही याबाबतीत सूट नसेल.

हा निर्णय जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यानी "डेमोक्रॅटसना शाळा काॅलेजेस आरोग्याच्या कारणासाठी बंद रहायला हवी नसून राजकीय कारणासाठी बंद रहायला हवी आहेत" अशा आशयाचे ट्विट केले आहे.

अशा परिस्थितीत ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला निर्णय आहे... Online आहे तर इथे राहून रेंट, खाणे पिणे याचा खर्च कशाला... भारतात घरी राहून पैसे वाचतील... तेवढेच स्टुडन्ट लोन कमी...हि एक बाजू...

President Trump is singlehandedly destroying the US!
अतिशयच हास्यास्पद निर्णय आहे. सद्यपरिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालणे योग्य ठरले असते जर valid visa असेल आणि जर तुमच्या विद्यापीठाने संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन केला असेल तर. पण जे संशोधन करणारे PhD चे विद्यार्थी आहेत त्यांचे काय? The international students bring lot of money in the form of out of state tuition. This is going to be detrimental for the universities who are already struggling with funding. Students also contribute to the local economy of the town. फारच दुर्दैवी निर्णय आहे. हा लवकर मागे घेतला जावा असे वाटते.

निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल. पण एक सेमिस्टर तापदायक ठरणार हे नक्की कारण इंटरनेट मार्फत वर्ग असतील तरी ते अमेरिकेतील दिवसा असतील. दुपारी २-३.३० वर्ग असेल तर भारतातील विद्यार्थ्याला ते जड जाणार. आता काही विद्यार्थ्यांना अशा वेळा अगदी सोयीच्या वाटल्या तरी त्यांच्या घरच्यांना त्रास होवू शकतो.
बर्‍याच जागी 'एसिंक्रोनस' म्हणजे शिक्षकांनी केलेले ध्वनीमुद्रण ऐकायचे अशा पद्धतीचा वापर होणार आहे पण बर्‍याच क्षेत्रात 'सिंक्रोनस' गरजेचे असल्याने प्राध्यापक मंडळी ध्वनीमुद्रण करत नाहीत.

कपाळावर हात!
आता परत एकदा तात्या निवडून यावा असं वाटू लागलं आहे. तो एकच मार्ग आहे अमेरिकन लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडण्याचा! अक्कल गहाण ठेवलेला निर्णय- वाद - कोर्ट- निर्णयाची फिरवाफिरवी याचा कंटाळा आला आहे.
पुढच्या सेमिस्टर पासून अमेरिकेत येऊ नका. करुन टाका एकादाची अमेरिका ग्रेट अगेन!

चांगला निर्णय. आमच्या ओळखीची एक मुलगी काही महिने नातेवाईकांच्या घरी राहते आहे. कारण तिच्या युनिने मार्च मध्ये कॅम्पस सोडायला लावलं. मार्चपासून ती दूरच्या नातेवाईकांकडे राहतेय.
जर युनिने कल्पना दिली की ऑनलाइन आहे तर ती भारतात जाऊ शकेल. जर क्लासेस ऑफलाईन असतील तर निदान तिला कॅम्पसमध्ये जाता येईल. लोकांकडे किती दिवस राहणार? तिचे नातेवाईक निदान 5 बेडरूमच्या घरात राहतात म्हणून तिची सोय झाली, बाकीच्यांचं काय !
ट्रम्प प्रशासन स्थलांतरितांच्या विरोधात आहेच. त्यामुळे तरीही जे गेल्या 4 वर्षात शिकायला आले त्यांनी या सर्व गोष्टींसाठी मनाची तयारी आधी करून ठेवलीच असेल की आपण एका नॉन-स्टुडन्ट फ्रेंडली, नॉन-ब्राऊन फ्रेंडली देशात जातो आहोत. (तरी हौस असेल तरच अमेरिकेची निवड करावी!)

ज्या विद्यार्थ्यांची फर्स्ट सेमिस्टर ॲडमिशन असेल, ते अजून मायदेशातच असतील आणि दिलेला व्हिसा नाकारला तर एकवेळ ठीक आहे पण ज्यांचे तिसरे सेमिस्टर आहे अशांची खुप अडचण होणार आहे.
काहीजण रेंटवरची जागा बदलत असतील किंवा ह्या सुट्टीत नुकतेच शिफ्ट झाले असतील त्यांचा वेळ, मेहेनत वाया गेली.
अशा कोरोनाच्या परिस्थितीत एवढा प्रवास करुन ते परत आपापल्या देशात परतणार, क्वारंटाईन होणार ही अजून एक बाब. चौथ्या सेमिस्टरला काय निर्णय होणार आणि परत बोलावणार की सगळं शिक्षण ऑनलाईनच ठेवणार हे ही वेळ येईल तेव्हाच कळेल.
अध्यक्षपदाच्या निकालानंतर कदाचित परत नियमात बदल.

वरती च्रप्स म्हणतात तसे काही खर्च वाचतीलही पण त्याचेही, ही ये जा, निर्णयाबाबत असलेली अनिश्चितता यांच्या तुलनेत मुल्यमापन करणे गरजेचे आहे.

>> जे गेल्या 4 वर्षात शिकायला आले त्यांनी या सर्व गोष्टींसाठी मनाची तयारी आधी करून ठेवलीच असेल की आपण एका नॉन-स्टुडन्ट फ्रेंडली, नॉन-ब्राऊन फ्रेंडली देशात जातो आहोत. (तरी हौस असेल तरच अमेरिकेची निवड करावी!) >> असंच वाटतंय. पुढे एचवन भानगडी अजुन आहेतच. लवकर शहाणपण आलं नाही तर कोण काय करणार!
बाकी इनपर्सन क्लासेस आज नाही तर उद्या सुरू होतीलच. एखाद सेमिस्टर देश सोडावा लागेल. एक दोन ऑडिट कोर्स इन पर्सन घेतले की नियमात बसत असेल तर असले जुगाड सुरू होतील लवकरच!

<<<आमच्या ओळखीची एक मुलगी काही महिने नातेवाईकांच्या घरी राहते आहे. कारण तिच्या युनिने मार्च मध्ये कॅम्पस सोडायला लावलं. मार्चपासून ती दूरच्या नातेवाईकांकडे राहतेय.
जर युनिने कल्पना दिली की ऑनलाइन आहे तर ती भारतात जाऊ शकेल. जर क्लासेस ऑफलाईन असतील तर निदान तिला कॅम्पसमध्ये जाता येईल.>>>

जे कँपस कोरोनाचा उद्रेक झालेल्या ठिकाणी असतील तिथे एकवेळ ठीक आहे. पण असे असंख्य कँपस आहेत जिथे कोरोनाचा फैलाव तुलनेने कमी आहे. सरसकट एकच नियम सगळीकडे लावण्यापूर्वी तौलनिक विचार करायला हवा होता.

अजून एक विचार करण्यासारखी बाब म्हणजे वरच्या युनिव्हर्सिटीने त्यांचा विभाग बहुतेक कोरोनाच्या जास्त उद्रेकाच्या ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना कँपस सोडायला लावला असेल.
आता प्रशासन म्हणणार की तुम्ही त्यांना कोरोनाचा उद्रेक असला तरी एकतर कँपस मधेच शिकवा किंवा मायदेशातच पाठवून द्या.... हा प्रशासनाच्या निर्णयातला विरोधाभास वाटतो

मला तर हे सगळे इलेक्शन साठीचे स्टंट वाटतात. गेली ४ वर्षे फक्त इमिग्रेशन च्या नावाने घाबरवून सोडले आणि आता इलेक्शन तोंडावर आल्यावर निर्णय घेणे सुरु झाले आहे. इलेक्शन नंतर सर्व सुरळीत होईल पुन्हा असे वाटते. मग कोणीही येवो. परदेशी विद्यार्थी गमावणे अमेरिकेच्या इकॉनॉमी साठी सहाय्यक नाही याची जाणीव प्रशासनाला आहे.

जि, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती तशी गुंतागुंतीची आहे. कुठल्या ग्रँटवर संशोधन चालू आहे, ती ग्रँट अजून आहे का (कंपनीमार्फत ग्रँट असेल तर काही कंपन्यांनी हात आखडते घेतले आहेत), संशोधनासाठी 'ह्युमन सब्जेक्टस' लागतात का किंवा संशोधन चालणार्‍या इतर साईटस जसे नॅशनल पार्क्स चालू आहेत का ह्यावर उत्तर अवलंबून असेल. अनेक जागी ह्युमन सब्जेक्टस वर चालणारे संशोधन बंद आहे.
ऑगस्ट ३ पासून यु एस सी आय एस १/३ बळाने काम करणार आहे. २/३ कर्मचारी ९० दिवसांसाठी फर्लो (सक्तीची रजा) होवू शकतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना व्हिसासंबंधी सेवा वेळेवर मिळणे अवघड आहे. उदा: ओपीटी साठी अर्ज, एफ-१ वरून अन्य व्हिसा घेणे इ. एकूण परिस्थिती जरा अवघड आहे त्यामुळे मला चटकन योग्य का अयोग्य म्हणता येत नाहीये. नागरिक किंवा पालक किंवा विद्यार्थी ज्या त्या भूमिकेतून विचार केला की उत्तर बदलते आहे.

मुलांनी फिया शिक्षक/मार्गदर्शकांचा थेट अप्रोच, युनिव्हर्सिटीच्या सर्व फॅसिलिटीज , सांस्कृतिक अनुभव, पुढे ओपीटी तुन मिळणारी कामाची संधी ह्या सगळ्यासाठी भरल्या आहेत.... ह्या ओव्हरऑल अनुभवात आता काटछाट झाल्याने युनिव्हर्सिटी प्रोरेटेड बेसिस वर फिया रिफंड करणार आहेत का?
नसल्यास संबंधितांनी ह्यासाठी कोर्टात केस टाकून ...देशात परत जावे ह्या निर्णयाला शह द्यावा असे वाटते.

कुठला हि सारासार विचार न करता घेतलेला अजून एक निर्णय .... याने केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर अमेरिकेचे पण नुकसान आहे. युनिव्हर्सिटीच्या आर्थिक व्यवहाराची वाट लागेल. ते या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पैस्यावर बऱ्यापैकी अवलंबून असतात.

सी, बरोबर आहे. संशोधन क्षेत्रातील अनेक गोष्टी या केस बाय केस बेसिसवर बघायला लागतील. कॅन्सर रिसर्च सारख्या गोष्टी इसेंशिअल सेवांमध्ये घेतल्याने काही लॅब्स चालू झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यापीठ हे त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतीलच. सरसकट व्हिसाचे नियम बदलण्याची काय गरज आहे?
हाब, बरोबर आहे. संपूर्ण शैक्षणिक अनुभव मिळत नसेल तर लोकांनी तेवढे पैसे भरावे का हा प्रश्न आहेच.

परदेशी विद्यार्थी गमावणे अमेरिकेच्या इकॉनॉमी साठी सहाय्यक नाही याची जाणीव प्रशासनाला आहे. ///

तसं नाहीये. उलट आपण कितीही हिडीस फिडीस केलं तरी परदेशी नॉन व्हाईट लोक दारात उभे राहणार याची प्रशासनाला जाणीव आहे. थोडक्यात , आपण आपल्या देशात येणाऱ्या स्टुडन्ट किंवा फॉरेन वर्कर्सना कसंही वागवलं तरी ते आपल्यासमोर हात जोडत राहणार. हे सत्य दिसतंय त्यामुळे तात्या त्याचा पूरेपूर फायदा घेणार!

सरसकट व्हिसाचे नियम बदलले असे नाही तर "असलेल्या नियमांची अंमलबजावणी माणूसकीला धरून होते आहे का" हे विचारणे गरजेचे आहे. कोव्हिड पूर्वीही ऑन-लाईन एज्युकेशनला व्हिसा मिळत नसे. उदा: हार्वर्ड मध्ये ऑन-लाईन सर्टीफिकेशन कोर्स घेतले तर एफ-१ मिळणार नाही. आता ही अमेरिकेत वर्ग नसतील, ऑन-लाईन एज्युकेशन असेल तर मायदेशी जा असेच आहे. पण प्राप्त परिस्थितीत हे माणूसकीला धरून आहे का? हा विचार हवा. एखादा सेमेस्टर नियमाला अपवाद केला तर काय झाले असते, कुठल्या खात्यावर किती बोजा पडेल ह्याचा प्रशासन पातळीवर उहापोह हवा....

आपण आपल्या देशात येणाऱ्या स्टुडन्ट किंवा फॉरेन वर्कर्सना कसंही वागवलं तरी ते आपल्यासमोर हात जोडत राहणार >>>> आतातर परवानगीच नाकारत आहेत तर यापुढे तीही शक्यता राहणार नाही.
तरीही तात्या आल्यापासून येणारे लोक ४ वेळा विचार करूनच येत आहेत. काही जण लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इथेही पर्याय म्हणून जात आहेत.

बादवे, जसे एच१बी डिसेंबर पर्यंत बंद आहे तसे ह्या निर्णयाला काही वेळेचे बंधन घातले आहे का? असेल तर त्या वेळेनंतर सुरळीत होईल असे वाटते.

ऑनलाईन म्हणजे आता सगळेच डिस्टन्स लर्निंग झाले आहे... डिस्टन्स लर्निंग ला कधीच एफ वन मिळत नव्हता.

यावर मार्ग म्हणून बरीच विद्यापीठे हायब्रिड मॉडेल राबवतील - काही दिवस्/काही विद्यार्थी वर्गात व उरलेले ऑनलाइन वगैरे. त्याला सूट आहे यातून.

या निर्णयात थेट ट्रम्पचा हात किती आहे माहीत नाही. त्याचे ट्विट शाळांबद्दल आहे. हा निर्णय ICE ने घेतलेला आहे. दोन्ही एकाच वेळी आले हे खरे.

सूट ऑलरेडी दिलेली होती ती अजून ६-८ महिने वाढवायला हरकत नव्हती. विद्यापीठांचे उत्पन्नही बुडेल यातून.

मला कोणी थोडे समजावून सांगेल का?
माझी एक नातेवाईक मागील ऑगस्टमध्ये ॲस्टोनॉटीकल इंजिनीअरिंग च्या पहिल्या वर्षासाठी अमेरीकेत गेली. बहूतेक कन्सास युनिव्हर्सिटी. करोनाच्या सुरवातीच्या काळात शक्य झाल्याने ती परत आली आहे. सध्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत.
तीचा व्हिसा आता रद्द होणार? असे असेल तर पुढील शिक्षण कसे होईल? याचे आर्थिक नुकसान किती? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

सर्व क्लासेस ऑन-लाईन राहिले तर व्हिसा रद्द होणार. ऑन-लाईन शिक्षण चालू ठेवायचे म्हणजे अभ्यासक्रमात नोंदणी (एनरोलमेंट) राहिल. पुन्हा वर्ग सुरू झाले की पुन्हा व्हिसासाठी अर्ज करायचा. आर्थिक नुकसान घडणार पण ते सापेक्ष आहे कारण जितकी फी आजवर भरली तेवढे शिक्षण घेतले. ते "क्रेडीटस" इतर युनिव्हर्सिटीत मोजले जातात. उदा: पुढच्या वर्षी सिंगापूरमधील वा भारतातील एखाद्या विद्यापीठात अभ्यासक्रम पूर्ण करायला जायचे ठरवले तर आजवर मिळालेले मार्क्/क्रेडीट्स उपयोगी ठरतील.
पण एकूणच करोनाजनित अस्थिर परिस्थितीने मनःस्ताप होणार, सुरळीत एकमार्गी शिक्षण करायच्या वयात विवंचना मागे लागणार. Sad आपल्या नातेवाईकास खूप शुभेच्छा. होईलही सगळं सुरळीत पण पेशंस्/चिकाटी खूप लागणार...

>>चांगला निर्णय आहे...<< +१
१०-१५ वर्षांपुर्वि सारखी परिस्थिती आता राहिलेली नाहि. आत्ताच्या विद्यार्थ्यांचा नेमका एंड गोल काय आहे? गेट ए टॉप क्लास अमेरिकन एजुकेशन ऑर टेक ए नंबर टु फॉलो पाथवे टु अमेरिकन लाइफस्टाइल? या दोन्हित क्लॅरिटि असेल, देन इदर इट्स ए नानइशु ऑर अ‍ॅन इंसल्ट, डिपेंडिंग ऑन हौ दे लुक अ‍ॅट इट...

बाय्दवे, पब्लिक युनिवर्सिटित ट्युशन इज जस्ट वन रेवेन्यु स्ट्रीम. मोर दॅन ६०-७०% ऑफ दि टोटल रेवेन्यु कम फ्रॉम स्टेट्/लोकल गवर्नमेंट्स, एंडॉवमेंट्स्/गिफ्ट्स एट्सेट्रा...

बेसिकलीच हा विद्द्यार्थी , इमिग्रेशन इशू नसून फक्त शाळा कॉलेजे सुरू करून उसगावात करोना वगैरे काही नाही सगळं सुरळीत सुरू आहे हे दाखवण्याकरता आहे. ते आपल्याकडे म्हणायचे ना "चुनावी जुमला" वगैरे तसे काही तरी Lol

नंदेचा मुलगा क्लेमसनला आहे तो इथेच होता करोनामुळे भारतात गेला नाही. त्यांच्या college ने हायब्रीड ...काही online काही in person करण्याचा पर्याय दिला आहे.
Colleges वर पण अवलंबून आहे बहुतेक. भाचीचे नुकतेच संपले तिचे बरेचसे फ्रेन्डस नाराज आहेत या निर्णयामुळे.
I just don't understand why they are worried about this stuff when they have bigger problems!!
माझ्या मुलांच्या शाळेने दोन पर्याय दिले आहेत online or inschool...आम्हाला ठरवावे लागणार आहे 15 July पर्यंत.. कळत नाही काय करावे. Texas has 10000 new cases today. Sad

ह्या असल्या निर्णयामागचं लॉजिक काय आहे?
मधल्या मध्ये, विद्यार्थी मारले जाणार असे नाहितर तसे दादांच्या पॉलिटिक्स मारामारीत..
एक तर एव्याकुशन फ्लॅईट्स खर्च करणार, परत इतका स्त्रेस ...

(स्वगतः अमेरीका सोडली बरं झालं का..)

अमेरिकेत शिकत असलेल्या काही मुलाशी, पालकाशी बोलणे झाले यात काही भारतीय आहेत काही दुसर्या देशात ...

सगळ्या. रेप्युटेड कॉलेज नी हायब्रीड चा. पर्याय दिला आहे त्यामुळे जे अमेरिकेत आहेत ते हायब्रीड पर्याय घेउन राहु शकतात पण त्याना काही क्लास साठी कॉलेज मध्ये जावे लागेल.
जे परदेशी नागरिक अमेरिका मध्ये राहुन online चा पर्याय घेतला आहे त्याना घरी जावे लागेल.

जे आपल्या देशात परत गेले त्याना online पर्याय घ्यावा लागेल आणि online असल्यामुळे विसा रद्द होईल आणि सगळे सुरळीत होईल तेव्हा कदाचिन पुन्हा विसा घ्यावा लागेल.

(स्वगतः अमेरीका सोडली बरं झालं का..+२ यात मी आणि माझा मुलगा )

माझ्या मुलीची मैत्रीण ऑस्टिन मध्ये शिकते आहे तिला हायब्रीड मिळाले नाही तर परत यावे लागेल. सर्व ऑनलाइन गेल्या मुळे. एक शाळू सोबती आताच शिक्षण संपवून नोकरीस लागला त्यामुळॅ तो राहू शकतो. आमचा नेक्स्ट इअर फॉल चाच अ‍ॅडमिशनचा प्लॅन आहे त्यामुळे सध्या बघू काय होते ते मोड मध्ये आहे. तात्या परत आले तर इट्स अ नो गो. फक्त उच्च शिक्षणाचा चा प्लान आहे. राहायचा नाही. रोज परिस्थिती वाचून फेफरे येते. # कारेन # पॉटस # पोलीस.

Pages