रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

Submitted by पाचपाटील on 25 June, 2020 - 16:11

(आणि हे अर्जुना, मी आता तुला आमच्याकाळचं हे
परमगुह्यज्ञान देतो आहे. )

** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्‍यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.

**कृती:
प्रथमतः पुस्तकांचे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे.
त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील, अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.

दोन्ही शीट्सचे कोपरे तंतोतंत जुळवावे.
त्या शीट्स बरोब्बर एकाखाली एक येतील, अशा पद्धतीने, त्यांना पिन लावून फिट करून टाकावे.

**तत्व: ''बल्बचा उजेड ग्लासमधून आणि दोन्ही शीट्स मधून
आरपार ट्रान्समीट होतो'', ह्या फिजिक्सच्या प्रिन्सिपलचं practical application आता लगेच आपल्या डोळ्यांना दिसेल.

खालच्या कंप्लीट झालेल्या शीटवरचा सगळा कंटेंट, तुम्हाला कोर्‍या शीटवर आपोआप पाझरताना दिसायला लागेल.

मग वरून झुकून कोर्‍या शीटवर लक्षपूर्वक फोकस करावं.
पेन्सिल आणि स्केल घेऊन हळूहळू 'आपल्या कोर्‍या'
शीटवर खालच्या शीटवरच्या ड्रॉइंगच्या बरहुकूम गिरवायला
सुरुवात करावी.

कोर्‍या शीटच्या कुठल्याही एका कोपऱ्यापासून सुरुवात करून, हळूहळू खालची आख्खी शीट जशीच्या तशी कॉपी करावी.
बिल्डींग्जचे प्लान्स, इलेवेशन्स, सेक्शन्स, सगळे डाइमेन्शन्स, सिम्बॉल्स, अॅब्रीवेशन्स... सगळं तल्लीन होऊन कॉपी मारावं.
काही म्हणजे काही सोडू नये.

पण नंतर शीट्स बाजूला घेऊन आपल्या शीटवर 'स्वत:चंंच' नाव आणि रोल नंबर टाकावा..
कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा
तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..!

अजून एक प्रीकॉशन म्हणजे, ट्रेसींग झाल्यावर आपल्या शीटच्या मागच्या बाजूला, काळसर अस्पष्ट असे पेन्सिलचे मार्कींग्ज उमटलेले असतात.
एखादा खवट एक्झामिनर तेवढ्यावरूनच ओळखून तुम्हाला हाकलून देऊ शकतो किंवा चारचौघांत पुरेशी आब्रू काढू शकतो.

म्हणून GT मारल्याचा तेवढा पुरावा न विसरता खोडरबरने नष्ट करून टाकावा.

आणि अशा खूप सार्‍या शीट्सच्या GT मारून, त्यांचं सुबक पंचिंग करून, आपण स्वत:च पूर्ण सेमिस्टरभर कंबरडं
मोडेपर्यंत मेहनत घेऊन काढलेल्या आहेत, अशा
आत्मविश्वासानं डुलत डुलत चेकींगला जावं.

**निष्कर्ष:

अशा रीतीने स्वत: ड्राफ्टर, ड्रॉईंग बोर्ड, रेफरन्सची
डिझाईनची पुस्तकं, सगळी calculations करून करून,
काढायला १५-२० दिवसही पुरले नसते..
त्या शीट्स‌ची भेंडोळी तुम्ही GT च्या मदतीनं अवघ्या
एक-दोन दिवसरात्रीत खतम करू शकता...

Group content visibility: 
Use group defaults

हे केलं नाही तर engineering ग्राह्य धरतात का? Proud
मी कधीच केलं नाही Happy
मजा येत असणारे, नक्कीच

First year इंजिनीरिंग केलंच नाहीये, ds होते आणि poly ला एवढ्या कठीण drawings नव्हत्या, निदान comp / I T ला तरी . वाचले Happy

ग्राफिक्स ला पहिलीच शीट अल्फाबेट्स ची होती... A ,B ,C ,D वगैरे.. मला ती सुद्धा जमत नव्हती... तेंव्हापासून जीटी मारायला सुरु केली ती ग्राफिक्स मध्ये चाळीस मिळाल्यावर संपवली....

शेवटी सिनिऑरिटीचा आणी अनुभवाचा असा एक शेवटचा टक्का (इक लोहारकी) असतो, तो सांगतो Wink

जीटी मारून झाली, शीटची मागची बाजू उत्तम प्रतीच्या खोडरबरानं (इथे कंजुसी करू नये, चांगल्या खोडरबरात इन्व्हेस्टमेंट करावी. हा सल्ला न मानणार्यास सेमिस्टरभर सचोटीचा मार्ग अनुसरावा लागेल.) खोडून झाली, की डायग्रॅम च्या एजेस ना पुसटशा एक्स्टेंशन लाईन्स काढायला विसरू नये. तसंच आपल्या ड्रॉईंगमधे दोन-चार ठिकाणी खाडाखोड करावी.
असं करणार्याची जीटी कधीही पकडली जात नाही. क्वचित प्रसंगी एखादा खडूस मास्तर आपलं शीट घेऊन ओरिजिनल ड्रॉईंग काढणार्यालाच चार बोल ऐकवतो. अशा वेळी साळसूदपणे तिथून सटकावं. बाहेर पडल्यावर जखमी भिडूला कट्ट्यावर चहा (ई.) पाजावं. Happy

हे कधीच केलं नाही, फक्त ऐकून आहे.
पण असंही ऐकलंय (वर फेरफटका यांनी त्याचंपण सोल्युशन दिलेलं दिसतंय Wink ) की जाणते प्रोफेसर ओळखतात, जीटी मारलीय की स्वतः काढलंय.
अर्थात फर्स्ट इयरनंतर शीट्स वगैरे प्रकाराशी काही संबंध आला नाही. पण फर्स्ट इयरला जे काय ड्रॉइंग केलं ग्राफिक्स आणि मेकॅनिक्सला ते आवडलं होतं. पुढे पुढे चारही वर्षे करायचं असेल तर कंटाळा येत असेल.

@ फेरफटका <<खोडून झाली, की डायग्रॅमच्या एजेसना पुसटशा एक्स्टेंशन लाईन्स काढायला विसरू नये. तसंच आपल्या ड्रॉईंगमधे दोन-चार ठिकाणी खाडाखोड करावी.>>>
तुम्ही तर फारच मुरलेले ..! Lol .. अगदी crucial, सफाईदार आणि साळसूद 'फिनीशिंग' करून टाकलंत. Wink _/\_

आमच्या फार्मसी मध्ये anatomy and physiology साठी एखादा tissue वगैरे काढावा लागत असे.. पहिल्याच वर्षी दस्तुरखुद्दांनी आपले असले नसलेले कौशल्य पणाला लावून काढलेली डायग्राम मास्तरांनी नापास केली. मग आम्हीदेखील जिटीचा संच उभारलेला

ड्राॅईंगची आवड असल्याने कधी जीटी मारली नाही. सगळ्या शीट्स हौसेने स्वत:च केल्या.

पण लोकं यासाठी नाईट्स मारायची. तो एक अभ्यास कम सोशल इवेंट असायचा. आणि त्यात भाग न घेतल्यामुळे वेगळं पडल्याची भावना निर्माण व्हायची.

दुसर्या सेमिस्टरला ड्राॅईंगमध्ये गती नसलेल्या मैत्रिणीची शिकवणी घेतली होती. तिला एक्झाममधे ६८ मिळाले आणि मला ४८. Uhoh
माझ्यापेक्षा तिलाच आश्चर्य वाटले होते.
आता तिच्याकडून जेवण वसूल केलं पाहिजे. Wink

हाॅस्टेलची खुssप आठवण आली. आम्ही बल्ब साठी बादली वापरायचो. बादली वर काच आणि मग GT सुरू. पण आमचे सर ओळखायचे.कधी त्यांचा मूड नसेल तर सगळ्यांची कत्तल. कारण काच हि कठीण असल्याने आपण जीटी केली की शिटच्या मागे रेषा थोड्या उपसून येतात. म्हणून आम्ही ड्राईंगचे फक्त पाॅईंट काॅपी करायचो.त्याला आम्ही PT म्हणायचो. खुप आठवण आली.

हाॅस्टेलची खुssप आठवण आली. आम्ही बल्ब साठी बादली वापरायचो. बादली वर काच आणि मग GT सुरू. पण आमचे सर ओळखायचे.कधी त्यांचा मूड नसेल तर सगळ्यांची कत्तल. कारण काच हि कठीण असल्याने आपण जीटी केली की शिटच्या मागे रेषा थोड्या उपसून येतात. म्हणून आम्ही ड्राईंगचे फक्त पाॅईंट काॅपी करायचो.त्याला आम्ही PT म्हणायचो. खुप आठवण आली.

सबमिशनच्या आदल्या रात्री केलेली GT च भारी असते बरं. ते करुन देणारे "मायबाप सोशल वर्कर्स" दंडवत घालण्यासारखे असतात. सगळ्यांनाच कुठे जमणार ते.

मला आर्किटेक्चरला असताना ह्या कलेशी परिचय झाला. मी काही हॉस्टेलला राहातं नव्हते आणि मुळात सिन्सियर असल्याने इमानदारीत ड्रॉइंग करायचे. बाकी वर्गमित्रांची जी.टी. सर ओळखतात कशी? हे आधी कळायचं नाही. नंतर तेही कळायला लागलं.
ह्या जी.टी. प्रकरणाशी संबंधीत एक किस्सा आमच्या बॅचला झाला होता.
आमच्या वर्गात एक एकदम हुशार, पहिली येणारी, नाकचढी मुलगी होती. तिला कोणीतरी जी.टी.ची कृती सांगितली. काच, खाली बल्ब, दोन्ही ड्रॉइंगज्, मधे ट्रेसिंग टाकला की रेषा मागे उमटत नाहीत वगैरे वगैरे.
त्या मुलीने सगळं अरेंज केलं आणि आता आपोआप वरच्या कागदावर खालचं ड्रॉइंग उमटणार, ह्या अपेक्षेने वाट बघत बसली. अर्थातच तसं काही होईना. मग मैत्रिणीला फोन. ' जैसा तूने बताया वैसा सब किया. बीस मिनीट हो गये, कुछ हो नहीं ंं रहा है.' समोरचीला हसू‌ आवरेना. ' अरे होता कुछ नहीं है, सिर्फ दिखता है. बाकीका काम तुझेही करना पडेगा'
अत्यंत हुशार मुलीचा असा किस्सा झाल्यामुळे तिखटमीठ लावून तो वर्षानुवर्षे प्रसिद्ध झाला, हे सांगायला नकोच.

सही
मी माझ्या ईंजिनीअरींगच्या (डिप्लोमा + डिग्री) करीअरमध्ये कदाचित एखादीच शीट स्वत: केली असेल अन्यथा फर्स्ट ईयरपासून जीटी एके जीटी. थोडक्यात ९९ टक्के जीटीवरच माझी ईंजिनीअरींग झाली.

मी बादली वापारायचो. माझी स्वत:ची एक खिडकीची फ्रेमवाली मोठाली काच होती. त्या काचेचा फायदा असा की तापायची नाही. जे जीटी मारायचे त्यांना कल्पना असेल की ग्लास तापली की शीट लूज पडते आणि काळीही होते. मग ब्रेक ब्रेक घेत थांबावेही लागते.

अशीच एक काच माझ्या मित्राच्याकडेही होती. किंबहुना त्यानेच जुगाड करून तीन काचा मिळवल्या होत्या. तिसरी काच आम्ही हॉस्टेल रूमवर ठेवली होती. तिथे गरीब सिन्सिअर पोरं नंबर लावून जीटी मारायचे. आम्ही दर्यादिल त्या चष्मीश पोरांची मारून झाल्यावर मग शानसे नाईट मारून जीटी मारायचो. सोबत पत्ते कुटायचा कार्यक्रम चालायचा. धमाल दिवस होते ते.

एकदा एका सरांनी अर्जंटली दोन दिवसात १६ शीटचे सबमिशन मागितले. शीट सुद्धा मोठ्या ए-वन साईज. आणि माझ्याकडे शून्य तयार. मग घरीच दोन नाईट मारून रपारप्प त्या जीटी मारून एक रेकॉर्ड केला जो पोरे आजवर आठवण काढतात. विशेष म्हणजे आजवर माझी एकही जीटी पकडली गेली नव्हती.

डिग्रीला एका वर्षासाठी वालचंदला होतो. तेव्हा जीटीची तीच काच खास मुंबईवरून घेऊन गेलेलो. तिकडेही त्या काचेला तसाच डिमांड होता Happy

@ अनया< आता आपोआप वरच्या कागदावर खालचं ड्रॉइंग उमटणार, ह्या अपेक्षेने वाट बघत बसली>> हे भारी होतं Lol

@ ऋन्मेष<< धमाल दिवस होते ते...तिकडेही त्या काचेला तसाच डिमांड होता >> Lol +११
आमच्याकडे सिनीअर्सकडून वारसाहक्कानं यायची ग्लास.. तशी नाही मिळाली तर एखाद्या रूममधून कट करून ढापावी लागायची ( एरव्ही सेमिस्टरभर धूळ खात पडलेली असायची पण सबमिशनची चाहूल लागली की शोधाशोध सुरू व्हायची)

जर बल्ब चांगल्या वॅटेजचा वापरला तर दोन ड्राॅईंगशीटस् च्या मधे ट्रेसिंग पेपर ठेवला तर वरच्या शीटच्या मागे लाईन्स येत नाहीत.
पूर्वी फार मोठ्या काचेच्या खिडक्या आपल्या इथे नसायच्या पण हल्लीच्या फ्रेंच विंडोज आणि संपूर्णपणे काचेची दारं यामुळे हल्लीची मुलं त्या दारा-खिडक्यांवरच शीट चिकटवून उभ्याने ड्राॅईंग (खरं तर ट्रेसिंग) करतानाही पाहिली आहेत..

यामुळे हल्लीची मुलं त्या दारा-खिडक्यांवरच शीट चिकटवून उभ्याने ड्राॅईंग (खरं तर ट्रेसिंग) करतानाही पाहिली आहेत..
>>>>

प्रॅक्टीकलचे जर्नल आम्ही असे मारायचो. पातळ पेपर. वजन नाही. आणि थोड्याच वेळात होणारे काम. जास्त वेळ पकडायचा त्रस नाही.

मुख्य म्हणजे वीजबचत. सुर्याच्या प्रकाशवर काम व्हायचे. Happy

हा लेखपण मस्त!

कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा
तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..! >>> Lol

माझा मुलगा शाळेत होता तेव्हा बायलॉजीच्या फिगर्स काढताना वैतागायचा. ड्रॉइंग फार वाईट आहे त्याचं. मग आम्ही कुठल्यातरी अॉड स्केलला फोटो कॉपी काढून आणायचो. ती खिडकीला चिकटवायची. त्यांच्यावर जर्नल ठेवून आउटलाईन काढायची. डिटेल्स भरता येतात. शाळेतल्या बाई जी.टी. तज्ञ नसल्याने‌ कधीही पकडलं नाही.

<<<कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा
तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..! >>>

दोन ड्राॅईंग शीट मधे चिरडल्या गेलेल्या माशीचंही मन लावून ट्रेसिंग करणाऱ्या अशा प्रतिभावंतांना संबंधित जिटी जमातीत Fly Tracer अशी संज्ञा आहे.. Biggrin

जबरदस्त... इंजिनिअरिंगच्या आठवणींमध्ये जी.टी. आणि सबमिशन्सच्या किस्स्यांना मरण नाही.

जर्नल कॉपी करताना चुका पॉईंट आऊट करणे हे महापाप!! ९ भागिले २ च उत्तर कुणी १.८ लिहिलं असेल, तरी ते "तसंच" कॉपी करायचं. नो क्वेश्चन्स टू बी आस्कड... "हे काय लिहिलंय?" या प्रश्नाला "जे समजतंय ते लिहि नाहीतर चित्र काढ" हे उत्तर ठरलेलं Happy

आम्हाला शाळेतच इंजिनियरिंग ड्रॉइंग ८ वी ते १० वी शिकवले होते, त्यामुळे आयसोमेट्रिक व्यू काढणे सुद्धा अगदी डाव्या हाताचा मळ होता.
अजून टिप्सः
काच पातळ असेल आणि जास्त वेळ दिवा चालू राहिला तर पेपर पिवळा पडतो, म्हणून काळजी घ्यावी.
महत्वाचे म्हणजे जी.टी. पकडली जाऊ नये म्हणून लाईन्स कॉर्नरच्या बिंदूत जुळलेल्या हव्यात. जर रेषांमध्ये अंतर राहिले असेल आणि त्या एकाच बिंदूमधून निघत नसतील तर जी.टी. पकडली जाण्याची दाट शक्यता असते.

<<किंवा हे काय लिहिलंय?" या प्रश्नाला... " कन्फ्यूज झालास काय? मग ते कन्फ्यूजन थोडं पाणी घालून तसंच पुढं पास कर ना येड्याss " असंही ... Lol

चित्र काढ" हे उत्तर ठरलेलं Lol ..

चु##तिया लिहायचे तर लिही नाहीतर जा घरी... हे एक सॉफ्ट टपोरी वर्जन Proud

बिल्डींगमधील आजूबाजूच्या नॉन ईंजिनीअर पोरांना जीटीचा बादली लाईट काच त्यावर ड्रॉईंग शीट असा सेटअप बघून मी नासातला ईंजिनीअर असल्यासारखे वाटायचे Proud

>> चु##तिया लिहायचे तर लिही नाहीतर जा घरी...

रात्रीचे १-२ वाजलेत, एका ओळीत ७-८ सबमिशन योद्धे बसलेत, ३ मिनिटात एक पान या वेगाने हाणामारी चालू आहे, सकाळी सबमिशन आहे आणि अशा वेळी जर एखाद्याने चुका काढणे, प्रश्न विचारणे असलं पाप केलं, तर मग हा उद्धार होतो..

यात मूळ १५ पानी असाईनमेंटची ८ व्या योद्ध्याची कॉपी ८-९ पानांची कशी होते हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे Happy

Pages