अमेरिकेतील शिक्षण

अमेरिकेतील विद्यार्थी व्हिसा रद्द करुन मायदेशात परत रवानगी

Submitted by अ'निरु'द्ध on 7 July, 2020 - 00:40

करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन प्रशासनाच्या या नविन निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसला आहे.

जी शाळा, काॅलेजेस निदान काही लेक्चर्स प्रत्यक्षरित्या न घेता संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने घेतील त्यामधील परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा रद्द करुन मायदेशी पाठविण्यात येईल असे प्रशासनाने ठरविले आहे.

summer schools/precollage experience in US

Submitted by अश्विनीमामी on 23 February, 2015 - 22:45

जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अकरावीनंतर समर स्कूल/ प्री कॉलेज एक्स्पिरीअन्सची दुनिया उपलब्ध आहे. अकरावी परीक्षा दिल्यानंतर बारावीची धामधूम सुरू होण्या आधीच्या वेळात हे शिक्षण घेता येते. साधारण एक महिन्याचे कोर्सेस आहेत व अनेक विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. मला मुख्य माहिती यूएस/ यूके मधील हवी असली तरीही सिंगापूर/ पॅरीस/ अ‍ॅम्स्टरडॅम/ फिनलँड / उर्वरीत युरोप येथील माहिती असल्यास कृपया द्या.

Subscribe to RSS - अमेरिकेतील शिक्षण