महाराष्ट्र - त्रिभाषा धोरण - (पहिलीपासून हिंदी सक्ती?)
या शैक्षणिक वर्षाच्या आरंभी महाराष्ट्र शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून जनक्षोभ उडाल्यानंतर तो स्थगित केला. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला. या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षणतज्ञ डॉ. मधुश्री सावजी आणि बालमानसतज्ञ डॉ.