शाळा सुरु- आज मुलांच्या डब्यात काय आहे

Submitted by च्रप्स on 20 August, 2023 - 10:15

फॉल सुरु म्हणजे शाळा सुरु... रोज रोज मुलांना डब्यात काय देताय आणि काय देता येईल हा मोठा प्रश्न पडतोय...
इथे चर्चा करूया? असा मुलांच्या लंच बॉक्स साठी डेडिकेटेड धागा आधीच असेल तर हा उडवूया...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज तर सुट्टी होती.
काल लंचमधे टोमॅटो राईस
स्नैक्स- उकडलेले स्वीटकॉर्न

उद्या लंच डाळमेथी भात
पहिला स्नैक्स ब्रेक, एल्लाकी केळ,अर्धं सफरचंद
दुसरा स्नैक्स ब्रेक, एक खजूर, चार बदाम, तीन काजू.

रोजच्या डब्यात असंच भात भाजी, कधीतरी चपाती भाजी, वरायटि राईस, दहिभात हेच देते मी.
स्नैक्स मधे, एक डबा फळं, एक डबा कोरडा खाऊ-सुका मेवा, कधी फुटाणे कधीतरी बिस्किटे.

काही ठिकाणी शाळा सुरु होत आहेत या सोमवारी. समर कसा जातो कळत नाही.
डब्यासाठी आमच्याकडे सँडविसेस हमखास आवडतात. थंड चांगली लागतील अशी सँडविचेस.
१) चिकन अवोकाडो - सेमोलिना किंवा सावरडो ब्रेड च्या स्लाइस वर रेडीमेड ग्रिन्ड चिकन स्ट्रिप्स मिळतात त्या, त्यावर अमेरिकन चीज चे स्लाइसेस ठेवून टोस्टर मधे थोडे मेल्ट करायचे. मग अवोकाडोच्या चकत्या, त्यावर टॅको सीझनिंग ची पावडर मिळते ती स्प्रिन्कल करायची. ड्राय होऊ नये म्हणून थोडेसे मेयो, आम्ही स्रिराचा मेयो किंवा चिपोटले मेयो मिळते ते वापरतो. सूट होते या कॉम्बो ला, बाकी आयटम्स ऑप्शनल, टोमॅटो, लेट्यूस वगैरे.
२) मेडिटरेनियन - सेमोलिना किंवा सावरडो ब्रेड च्या स्लाइस वर हमस स्प्रेड करायचे. त्यावर काकडीचे पातळ काप, आणि थोडे डिल ( पिकल्ड क्युकंबर) चे काप, आवडत असल्यास पिकल्ड हालापिनो चे स्लाइस, त्यावर ग्रिड चिकन स्ट्रिप्स, फलाफल सॉस, फेटा चीज, मेयो आणि लेट्यूस वगैरे ऑप्शनल.
३) टोमॅटो- मोझारेला - चबाटा किंवा आवडीच्या फर्म ब्रेड वर बेसिल सॉस किंवा पेस्टो सॉस, त्यावर फ्रेश मोझारेला चीज चा जरा थिक स्लाइस, त्यावर टोमॅटोच्या चकत्या, ग्रिल्ड रोस्टेड रेड पेपर्स (तयार पिकल्ड मिळतात) .
असे एखादे सँडविच आणि सोबत एखादे फळ, चिप्स, योगर्ट, क्रॅकर्स वगैरे काहीतरी.
अजून एक म्हणजे कोल्ड पास्ता सॅलड -
ट्राय कलर रोटिनी किंवा शेल पास्ता किंवा हवा तो पास्ता बोईल करून घ्यायचा, दुसरीकडे थोडी आवडिचे व्हेजीज म्हणजे स्वीट पेपर्स, झुकिनी, कॅरट , मश्रूम्स वगैरे तव्यावर ग्रिल करायचे. झटपट होतात. मग शिजलेल्या पास्त्याला थंड पाण्यात गार करून घेऊन त्यात त्या भाज्या, मिरी पावडर, चिली फ्लेक्स, किंवा आवडिचे सीझनिंग, ऑऑ. ( या ऐवजी पेस्टो सॉस किंवा बेसिल सॉस किंवा बल्सामिक व्हिनेगरेट ड्रेसिंग ही मस्त लागते) , आणि फ्रेश मोझारेला चीज चे क्यूब्स घालून टॉस करायचे.
यावर्षी शेंडेफळ कॉलेज ला जात आहे आणि आम्ही वर्क फ्रॉम होम त्यामुळे मला आता डबे करायची वेळ जास्त येणारच नाही यापुढे!! Happy

माझ्या मुलांना आजकाल डबे नको असतात. पण तरी ते दिले कि मला समाधान मिळत.

आम्ही पोळी पाहू लोक आहोत त्यामुळे डब्यात पूर्वी फ्रँकी म्हणायचो आता रोल म्हणतात असेच देते.

१. बटाटा - मस्टँग आलू . बटाटे शॅलो फ्राय करायचे. तिखट, मीठ , चाट मसाला. ज्याला हवं त्याला चीज हवा तो सॉस घालून रोल
२. छोले - दोन प्रकारे
१. शिजवलेले छोले , त्यात ताहिनी, हमस , कांदे, पातळ काकडीचे काप, वगैरे घालायचे. पोळीत घालून , तिखट, कोथिंबीर भुरभुरवूंन रोल
२. शिजवलेले छोले, त्यात पुदिना चटणी, भेळ चटणी , कांदा, टोमॅटो, दाणे, चाट मसाला , तिखट घालून मिक्स करायचं. हे घालून रोल
३. ब्लॅक beans / राजमा - परत बीन्स, टोमॅटो, कांदा, साल्सा, रांच , चीज , सिमला मिरची - कांडा परतलेली भाजी ह्यातील सकाळी जे शक्य असेल ते घालून रोल
४. पनीर रोल - पनीर ची ड्राय भाजी करून त्याचा रोल
५. फलाफल रोल - फलाफल ट्रेडर जो कडून आणते. पोळ्यांना , हमस , ताहिनी , कांदा , काकडी, टोमॅटो इतकं. लावून त्याचा रोल

ह्या व्यतिरिक्त डोसा, पास्ता, सँडविच हे इतर काही पदार्थही देते

शेंगदाणा कूट, तिखट, मीठ, हिंग, जीरे, ओवा, चिमूटभर साखर ,बारीक चिरून कोथिंबीर हे सारण भरून पोळी.. तिला थोडे तूप. .. आवडता डब्बा..

शेंगदाणा कूट, तिखट, मीठ, हिंग, जीरे, ओवा, चिमूटभर साखर ,बारीक चिरून कोथिंबीर हे सारण भरून पोळी..
>>>> पराठ्यासारखं करता की वरून लावता पोळीला?

मेतकूट पोळी
गूळ खोबरं भरून गोड पोळी
विविध पराठे -
मेथी, पालक, बीटरूट, कोथिंबीर वगैरे चे
असं देते आहे.
कारण ती पोळीभाजी खात नाही Happy

कारण ती पोळीभाजी खात नाही Happy>>>
बरोबर किल्ली, लहानांना भाजी प्रकार भरवावा लागतो.
माझ्या मुलीचं शाळेनं दिलेले टाईमटेबल आहे पाच दिवसांचं..शाळा अर्धा दिवस असते मग एकच डबा.
सोमवार- फळं
-सुका मेवा
-भाज्या, कच्चे गाजर, काकडी तुकडे करून किंवा परतलेले बीन्स वगैरे
-उसळी, इकडं सुंडल म्हणतात.
-पुन्हा फळं..तेच फॉलो करत असल्याने फार विचार करावा लागत नाही डब्याचा..
चीप्स, बिस्किटे, स्वीट्स, चॉकलेट्स असले काही नाही देत मुलीला डब्यात..
मुलाचा डबा...दुपारचं जेवण भात/चपाती, भाजी, आमट्या वगैरे.. दोन खाऊचे डबे..त्याला शनिवारी फक्त एक जंक फुड डबा..आणि लंच..

आजचा मेन्यू-
रवा इडली आणि नारळाची चटणी
2 अंडा बॉईल
Apple तुकडे

स्नॅक्स-
ब्रेड जॅम

>>>>>शेंगदाणा कूट, तिखट, मीठ, हिंग, जीरे, ओवा, चिमूटभर साखर ,बारीक चिरून कोथिंबीर हे सारण भरून पोळी..
कूटामुळे पोळी फुटत नाही का? बाकी आयडीया मस्त आहे.

आमच्याकडे एकेक वर्षीचे फेवरेट पदार्थ असतात. मुलगा प्राथमिक शाळेत होता तेव्हा छोले राइस आणि शिरा आवडीनं न्यायचा. मग मध्ये एक भारतीय पदार्थ डब्यात न नेण्याची एक फेज आली. गेली २-३ वर्ष हातात घेऊन खाता येतील असे पदार्थ हवे असतात. काटा, चमचा लागणार नाही असं. चिकन केसडिया, ग्रिल्ड चिकन सँडविच, चिकन मंचुरियन/पनीर/चिकन रोल/रॅप्स, स्ट्फ्ड पराठे हे सगळं रिपीट मोडवर होतं गेल्या वर्षी.

बाकी स्कुल लंचवर हा मीम फार आवडतो. दर वेळी हसायला येतं.

9aad1bb97bbf55f773c46c83df961794.jpg

गेली २-३ वर्ष हातात घेऊन खाता येतील असे पदार्थ हवे असतात. काटा, चमचा लागणार नाही असं>>> हो त्यांना डबा खाण्यात वेळ न घालवता खेलायच असतं. त्यामुळे पटापट खता येण्यासारखे आणि पोटभरू रोल हे आमच्याकडे त्यातल्या त्यात आवडत आहे.

सिंडरेला Lol
सगळे डबे छान.
मी बेन्टोबॉक्स वापरते लंचला.सकाळी साडेसहाला हे खणं भरताना डोकं फिरतं कधीमधी.डबे म्हटलं की काटाच येतो अंगावर आणि स्वयंपाकाचा मूडच जातो. लेक ओसिडी असल्यासारखे सगळे खण भरायला सांगते आणि रिपीट करायचं नाही म्हणते. सारखं वेगवेगळे काय करणार!!!
IMG-20230821-WA0001.jpg*
IMG-20230821-WA0004.jpg*
IMG-20230821-WA0005.jpg

बरेचदा एक मेन कोर्स(salad, pasta, noodles, chicken nuggets)एक भाजी, एक प्रोटीन, एक गंमत खाऊ आणि एक ओढूनताणून भरते. बरेचदा एक खण तसाच परत येतो.

<<<शेंगदाणा कूट, तिखट, मीठ, हिंग, जीरे, ओवा, चिमूटभर साखर ,बारीक चिरून कोथिंबीर हे सारण भरून पोळी..
>>>> पराठ्यासारखं करता की वरून लावता पोळीला?

नवीन Submitted by MazeMan >>
पराठ्यासारखंच... आत भरून

<<कूटामुळे पोळी फुटत नाही का? बाकी आयडीया मस्त आहे.

नवीन Submitted by सामो >>
नाही फुटत.. कूट बारीक हवे मात्र..

अस्मिता,

काय सर्वांगसुंदर डब्बे आहेत. लाभार्थी कितवीत आहे ? Proud

अस्मिता मस्त आहेत डब्बे , आम्हाला सलाड खूप आवडतं, पण ती पानं डब्यात सादळत नाहीत का? क्रंची सलाड आवडतं.

वा वा छान ऑप्शन, तसे लेकाचे फार नखरे नसतात, रिपिट मेन्यु चालतो फक्त इन्डीयन असेल तर गरमच आवडत ते कस जमवायच ते बघाव लागेल.

सगळ्यांचे डब्बे मस्त! इथे ५ तारखेपासून शाळा सुरू होईल तेव्हा हा धागा आठवेल. किती वेगवेगळे पदार्थ द्यावेलागतात डब्यात!
माझी सकाळची शाळा होती तेव्हा डब्यात शीरा, पोहे, उपीट, फोडणीचा भात, तूप-साखर/जाम चपाती यापेक्षा वेगळे काही नसायचे. ९.४५ ला म.सुट्टीत डबा खाल्ला कि दुपारी १ ला घरी भाजी पोळी. तसेच दुपारची शाळा होती तेव्हा डब्यात फक्त भाजी-पोळी. काही चमचमीत खावेसे वाटले तर चिंचा, बोरे, कैऱ्या, पेरू, आवळे असे काहीबाही खायला आई १-२ रूपये द्यायची. कधीतरी वडापाव खाल्ला जायचा.

काल पुलाव केला होता. दोन्ही मेंबरांना पुलाव लंचला नेता येईल या हिशोबाने केला होता. पण अंदाज चुकून कमी उरला. पुलाव केल्यामुळे वरण उरले होते त्यात कणिक, हळद, तिखट, मीठ, धणा जिरा पावडर, तीळ व पुदीना घालून दाल पराठ्याचे पीठ भिजवून ठेवले. छोट्या मेंबरला पुलाव व नवर्याला दाल पराठा. स्नॅक म्हणून संत्रे

सकाळची शाळा होती तेव्हा डब्यात शीरा, पोहे, उपीट, फोडणीचा भात, तूप-साखर/जाम चपाती यापेक्षा वेगळे काही नसायचे. ९.४५ ला म.सुट्टीत डबा खाल्ला कि दुपारी १ ला घरी भाजी पोळी. तसेच दुपारची शाळा होती तेव्हा डब्यात फक्त भाजी-पोळी. काही चमचमीत खावेसे वाटले तर चिंचा, बोरे, कैऱ्या, पेरू, आवळे असे काहीबाही खायला आई १-२ रूपये द्यायची. कधीतरी वडापाव खाल्ला जायचा.>>>अगदी आमच्याकडेही.
वडापाव 50पैसे

माझी लेक १.३० ला घरी येऊन पोळी भाजी, वरण भात खाते त्यामुळे तिला डब्यात भारतिय (चपाती/राईस) आयटम अगदीच नको असतात. Sad
हातात घेऊन खाण्यासारखे हवे त्यामुळे नूडल्स पण बाद.
ब्रेड जाम, ब्रेड बटर/ अंडे उकडून/ पॅटीज, सॉसेज हॉट्डॉग, घरचा बर्गर, इडली हेच ऑप्शन मान्य होतात. फ्रुट ब्रेक चा डबा वेगळा.

मी बेन्टोबॉक्स वापरते लंचला.सकाळी साडेसहाला हे खणं भरताना डोकं फिरतं कधीमधी.
>>>>> अगदी अगदी.
मी पण सुरूवातीला फार प्रयत्न केला होता एक फळ, एक सॅलड, मेन कोर्स व एक ट्रीट असा. पण डोक्याचा भुगा व्हायला लागला.
शिवाय तू एवढा जास्त डबा देतेस मग मला खेळायला वेळ मिळत नाही म्हणून फ्रुट व मेन कोर्स संपायचा नाही. निमुटपणे २/३ खणावर येऊन थांबले. मेन कोर्स, फळ देतेच, सुका मेवा आवडीचा असेल तर.
बाकी शाळेत एक स्नॅक असते. आणि ते व्यवस्थित इडली/भेळ/पराठा सब्जी/भाताचे प्रकार/ढोकळा/सॅंडविच असे मुलांच्या आवडीचे असते.
शिवाय शाळेत स्वीटस् चालत नाहीत. अगदी डब्यात दिले तरी घरी जाऊन खायला सांगतात.
जंक फूड फक्त शुक्रवारी त्यामुळे बराच त्रास वाचतो.

सगळे डबे एकदम टेस्टी .
मी हि ऑनलाईन बेंटोबॉक्स मागवलेला पण त्याचे मटेरिअल polypropylene होते सो रिटर्न केला. स्टील चे bentobox नाही मिळत का ?

आमच्याकडे रोज वेगळा ब्रेफा लागतो सगळ्यांना. पोहे, उपमा, इडली वगैरे. मग यातलंच थोडंसं शॉर्ट ब्रेकला देते मी मुलीला कारण ती 8:40 ला शाळेत जायच्या आधी काही खात नाही. पोळी भाजी लंच. भाज्या रोज 2 किंवा 1 भाजी आणि 1 कोशिंबीर/ 1 उसळ/1 पातळ पालेभाजी.
संध्याकाळी ग्राउंडवर जायच्या आधी फळ/ सुकामेवा/ दूध हे तिच्या मूडप्रमाणे साबा देतात. दूध कंपल्सरी. पूर्वी सगळंच आवडीने/ मुकाट्याने खाणं असे. आता इन जनरल नखरे वाढलेत. आवडो नाहीतर नावडो, खुसपटखोरी वाढलीये.

थँक्स.

(अवांतरः सध्या तिच्या डोक्यात भयंकर कोंडा होतोय. रोज घामटून येते बास्केटबॉल खेळून. कमरेपर्यंत लांब आहेत केस त्यामुळे रात्री ७:३० ला आल्यावर नुसते पाण्याने खंगाळून धुतले तरी सकाळी ८ पर्यंत वाळत नाहीत. तेल लावलंच पाहिजे असा माझाच नियम आहे. त्यामुळे रात्री झोपण्याआधी रोज नीट जरा जास्त वेळ विंचरून वेण्या घालून सकाळी पुन्हा २ वेण्या असा कार्यक्रम चालू आहे. माझी दमछाक होते, पण सध्या इलाज नाही. त्यात तिने खा-प्यायच्या नसत्या चत्राया लावल्या की माझी चिडचिड होते. Uhoh आज तिला छोटा टिफिन म्हणून बटाटाकीसचिवडा हवा होता, मी पालक पराठा दिलाय म्हणून रुसून गेलिये :डोक्याला हात: )

(अवांतरः सध्या तिच्या डोक्यात भयंकर कोंडा होतोय. रोज घामटून येते बास्केटबॉल खेळून. कमरेपर्यंत लांब आहेत केस त्यामुळे रात्री ७:३० ला आल्यावर नुसते पाण्याने खंगाळून धुतले तरी सकाळी ८ पर्यंत वाळत नाहीत. तेल लावलंच पाहिजे असा माझाच नियम आहे. त्यामुळे रात्री झोपण्याआधी रोज नीट जरा जास्त वेळ विंचरून वेण्या घालून सकाळी पुन्हा २ वेण्या असा कार्यक्रम चालू आहे.>> बॉय कट करुन टाका. केस दहा मिनिटात वाळतात. रोज रोज तेल काहीच गरज नाही. वीकांताला लावले तरी चालेल. जास्त तेलाने पण कोंडा होतो. पण प्रोपर ट्रीटमेंट घ्या.

अमा, जास्त नाही, १ रुपयाच्या नाण्याएवढंच लावते, नाहीतर वेणी वळता येत नाही, केस भुरभुरतात तिचे खूप. पण ट्रीटमेंट चालू आहे. बॉय कट नकोय, लांब केस हवे आहेत हीच तर गंमत आहे. असो. खूप अवांतर होईल आता. :पळा:

आज माझ्या डब्यात एग पोटा टो सलाड, दोन पाव बटर लावुन आणि नंतर खायला किट केट. मी मघई पानाचा मुखवास पण आणते आणि मल्टिग्रेन लाह्या मध्येच खायला.

एग पोटॅटो सलाडची रेसिपी लिहा.>> एकदमच सोपी आहे. एक उकडलेले अंडे, साधारण त्याच आकाराचा एक मध्यम बटाटा उकडून.
व्हीबा किंवा कोणतेही सँडविच स्प्रेड भारतात फन फूड्स चे मिळते ते मी आणते. हे दोन मोठे चमचे डब्यातच घ्यायचे. त्यात एक छोटा चमचा केचप. अगदी चवी पुरते मीठ. व एक छोटा चमचा मिरेपूड. आव्डत असल्यास एक लसूण पाकळी ठेचून व थोडी कोथिंबीर. ( मेरा प्रिय मित्र)
हे सर्व मिसळून घ्यायचे. त्यात अंड्याचे व बटाट्याचे सुरीने तुकडे करुन घालायचे. चमच्याने हलक्या हाताने मिसळून घ्यायचे. झाले.

ब्रेड च्या स्लाइस मध्ये घातले तर जेवायच्या वेळे परेन्त ब्रेड सॉगी होईल. म्हणून ब्रेड बटर वेगळे आणायचे. जेवताना दोन तुक ड्यात सलाड घालुन सँडविच बनवाय्चा. मी पाव / ब्रेड काय असेल ते टिशूत गुंडाळून झिप लॉक मधून आणते.

ह्यात उकडलेले चिकनचे तुकडे सुद्धा घालता येतात.

आमची बस 7.20 ला येते - लास्ट स्टॉप आहे ... त्यामुळे थोडा निवांत असते सगळे...
बाकी इकडे बस रूट्स मस्त प्लॅन करतात नाही? पिकअप लास्ट आहे आणि ड्रॉप पण लास्ट...

आज चा मेन्यू-
पोहे
ग्रेप्स
काकडी
ऍप्पल ज्युस

स्नॅक्स- ब्रेड नुतेला

माझ्या मोठ्या मुलीच्या वर्गात एक मुलगा होता. तो आमच्या इथेच राहायचा आणि रोज सोसायटीच्या बिनमध्ये डब्यातले अन्न टाकायचा. तेंव्हापासुन मुलींना विचारून डबा द्यायचा हे नक्की केलं, खाल्ला नाहीत तर घरी घेऊन या, ओरडा मिळणार नाही हे आश्वासन दिले आणि अन्न खराब झाले नसल्यास फेकु नये हे पण शिकवले. मुलींशी बोलून / विचारून गेल्या काही वर्षांपासुन मी हा पॅटर्न सेट केला आहे. मूड आणि उपलब्धतेनुसार ह्यातला एक पदार्थ (मेन कोर्स ), पण मूळ साचा तोच!
एक दिवस सँडविच - अवाकाडो पेस्टो, ट्युना मेयो, चिकन मेयो, हॅम / सलामी / सॉसेज /व्हेज आलू-टिक्की बर्गर
एक दिवस भाताचा प्रकार - टोमॅटो राईस, पनीर बिर्यानी, फ्राईड राईस, मशरूम राईस, मेक्सिकन राईस विथ बिन्स / हाक्का  नूडल्स, झारु सोबा, ओनिगिरी (जपानी पदार्थ)
एक दिवस पराठा  - मेथी, रताळे, बटाटा, पालक, ति मी पुऱ्या, पालक पुरी
एक दिवस रॅप - मिक्स व्हेज, ड्राय राजमा, हमस बेबी स्पिनॅच, चिकन / पनीर टिक्का रॅप, केसडीआ 
एक दिवस पास्ता - व्हाईट सॉस, टोमॅटो सॉस, पेस्टो
ह्यात भरपुर व्हरायटी असल्याने लगेच रिपीट होत नाही किंवा कंटाळा येत नाही. बाकी मग जरुरीप्रमाणे सजवायचे डबे, उदा. राईस बरोबर नगेट्स किंवा फिश फ्राय, पराठे असेल तर सलाड / दही इत्यादी. आता डबा नेणारा लाभार्थी एकच असल्याने फार स्ट्रेस येत नाही. शिवाय आता इथे येणारे पदार्थ पण ऍड होतील, उदा - सँडविचचे प्रकार वगैरे 
सोम - गुरु रात्री आणि शनिवारी सकाळ पोळी भाजी, आमटी, भात, कोशिंबीर असा मेनू असल्याने भारतीय जेवणाची सवय पण आहे. 
पेस्तो, हमस, रॅप, पास्ता सॉस, ब्रेड घरी केलेले असतात. 
मला जास्त स्ट्रेस छोट्या डब्याचा येतो कारण फार सारखे पॅकेज्ड स्नॅक्स नको वाटतात, लाडु / वड्या डब्यात आवडत नाही, फळ म्हणजे फक्त स्ट्रॉबेरी, ग्रेप्स आणि ब्लूबेरी डब्यात चालतात, नट्स फार पोटभर होत नाहीत त्यामुळे त्या डब्याला हेल्दी ऑप्शन शोधणे सदैव चालु असते. आणि आफ्टर स्कूल स्नॅक्स - अरे देवा तो एक वेगळाच मुद्दा आहे. 
पण हा धागा उघडल्याबद्दल, आणि ह्यात भर घालणाऱ्या सर्वांना पोटभर मोदक. कधी कधी फार कंटाळा येतो डबा  / स्वैपाक काय करायचा ह्या विचाराचा. त्यापेक्षा कोणी टाइम टेबल करून दिले तर मी आनंदाने डबा / स्वैपाक करेन. (स्वप्नरंजन) 

मी चिकन डब्यात द्यायचे/ देत नाही कारण असं ऐकलंय कि ते ठराविक टेम्प ला ठेवावे लागते, थंड किंवा गरम. पण मग डब्यात ते कस सांभाळणार ?

इकडे बरेच लोक चिकन डब्यात देतात असं कळलं, म्हणून विचारते की ते खराब होत नाही का ? तुम्ही काय स्पेशल ट्रीट करता का त्याला?

कोल्ड चिकन सँडविच देतो... ते थंडच असते आणि शाळेत एसी असतो त्यामुळे नॉर्मल टेम्प राहते.. जास्त गरम होत नाही...

करेक्ट, शाळेत एसी आहे. सो खराब होत नाही. चिकन छान शिजवुन गार करून मग वापरायचं (प्रेप) असेल तर. वेळ असेल तर फ्रेश शिजवुन मग वापरायचं. तसही 6:30 वाजता केलेला डबा मुलं 12 पर्यंत खातात. सो ठीक आहे.

इकडे बरेच लोक चिकन डब्यात देतात असं कळलं, म्हणून विचारते की ते खराब होत नाही का ? तुम्ही काय स्पेशल ट्रीट करता का त्याला?>> उकडलेले किंवा चांगले फ्राय केलेले चिकन मस्त राहते. ऑफिसात तरी मायक्रो करुन घेता येते. आमच्या इथे भांडुप मध्ये एक फूडवेज म्हणून आहे. तिथून ऑर्डर केले की शेजवान फ्राइड चिकन व राइस भरपूरच येतो. मी त्यातील एक हेल्पिन्ग डब्यात घेउन येते. एसी रूम आहे व दुपारी एक वाजता गरम करुन घेते.

तंदुरी असेल तर त्याचे ही तुकडे करून( पुल्ड फॅशन) ते मेयोनीज किंवा स्प्रेड मध्ये घालून नेक्स्ट डे चिकन सेंडविच बनवता येते.

इथे गोदरेजन/ वेंकी/ झोराबिअन चे चिकन नगेट, शीग कबाब पटेटो फ्राइज चीज कॉर्न बॉल्स बर्गर पॅटीफ फ्राइज सर्व फ्रोझन मिळते.
ते ही देता येते.

चिकन शीग कबाब कांदा घालून परतायचे व वरून मसाला, आमचूर चाट मसाला अशी सुखी भाजीच बनवायची. बरोबर दोन पोळी. काम होते.

आज डब्यात पोळी, आलू मटर सात्विक भाजी. नो कांदा लसूण. ताक, दोन साखर लावलेले गुला ब जांबु. मघई पान मुखवास. आत्ता खायला लाह्या पाकीट आहेच.

Submitted by छन्दिफन्दि on 22 August, 2023 - 21:11>>
लंच सोबत द्यायला छोटे हार्ड आईस पॅक मिळतात. रात्री फ्रीजरमधे एक छोटा पॅक ठेवायचा, सकाळी लंच कुलरमधे गार पॅक ठेवला की सॅंडविच , फळं वगैरे गार रहाते. अन्न गरम ठेवायचे असल्यास अन्न गार/ गरम रहाणारे उभे स्टीलचे इन्सुलेटेड डबे वापरायचे. त्यात वेगवेगळे भात, उपमा, चिली, सूप वगैरे छान गरम रहाते. आमच्या इथल्या वालमार्टात कँपिंगची भांडीकुंडी असतात तिथे या दोन्ही गोष्टी माफक किमतीत असतात. टार्गेटमधेही मिळतील.

Pages