अवांतर
India's got latent - चला निषेध नोंदवूया.
लाभले आम्हास भाग्य…
"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला!" ही बातमी आणि त्यावरील प्रतिक्रियांचा पूर बघून मन अगदी उचंबळून आलं.
मीही मग प्रेमभराने लगेच लाभले आम्हास भाग्य, गर्जा महाराष्ट्र (original) अशी पूर्ण playlist ऐकली . तशी ती एरव्ही वर्षातून एकदा मी एकतेच.. म भा गौ दि ला, अहो म्हणजे मराठी लँग्वेज डे ला. यानिमित्तानं यावर्षी दोनदा ऐकली गेली.
"अमृतातेहि पैजा जिंके... " असं सुमारे आठेकशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ज्ञानोबांच्या मराठीला अखेर सरकार दरबारी शिक्का मिळाला.
आता जगभरातील मराठीजन आनंदोत्सव साजरा करतील... एखादं संमेलन वगैरे...
लगेच चित्रच तरळल डोळ्यांसमोर.
विमसं२०२५ मध्ये पुस्तक आदान-प्रदान
विश्व मराठी संमेलन २०२५ फर्ग्युसन कॉलेजच्या क्रीडांगणावर चालू आहे. आज रवि २ फेब्रुवारी रोजी इथल्या पुस्तक प्रदर्शनाअंतर्गत पै लायब्ररी डोंबिवली आयोजित पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमास भेट देऊन आलो.
कल्पना चांगली वाटली. एक पुस्तक द्या, एक पुस्तक घ्या. वर दहा रुपये प्रती पुस्तक हे नाममात्र शुल्क.
कालच कुठली पुस्तकं द्यावीत यावर थोडा विचार केला होता.
'हिंदी चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम' - V & C - जुन्या मायबोलीतील एक रत्न.
आत्ताच माझ्या एका फोल्डर मध्ये सापडलेले हे जुन्या मायबोलीतील एक रत्न.
मुळ मजकूर Rahulphatak ह्या आयडी ने Wednesday, March 01, 2006 - 2:23 am ला पोस्ट केला होता.
---------
मायबोलीवर एक C&V होते.. म्हणजे C for ‘चर्चा’ व V for ‘विचारप्रदर्शन’ ! विषय असतो :
'हिंदी चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम'
लॉस एंजेलीस मधली भिषण आग- जानेवारी २०२५
लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. त्या भागात राहाणार्या सगळ्यांनीच काळजी घ्या.
PG म्हणून राहण्यासाठी फ्लॅट शोधत आहे.
नमस्कार
निगडी प्राधिकरण किंवा भोसरी च्या जवळपास मुलासाठी PG साठी फ्लॅट शोधत आहे.
आत्त्ता घरापासून ऑफीस त्याला फारच लांब पडतंय.
नेटवरचे ऑप्शन फार काही चांगले नाहीत.
कोणाच्या माहितीत असेल तर please सांगा.
३१ डिसेंबर...

अर्धवट वय
लहान मुलांना सुरक्षित कसे ठेवावे?
घरात पावणे दोन वर्षाचे लहान मूल आहे. जरा जास्तच द्वाड, अवखळ, ऍक्टिव्ह आहे. दार उघडले की बाहेर पळत जातो आणि उतरत्या जिन्याच्या तोंडाशी उभा राहतो. परवा त्याचा अंदाज चुकला आणि पहिल्या पायरीवर पडला. तोंडाला थोडेसे लागले पण नशिबाने गडगडत गेला नाही.
घरात सतत कोणी ना कोणी त्याच्यामागे असतेच. कधी कधी तर एकापेक्षा जास्त माणसे असतात. घर छोटे आहे आणि सामान बरेच आहे त्यामुळे इजा होण्याची भीती वाटते.