आमचे बाप्पा : स्टार्ट टू एंड

Submitted by रॉय on 29 August, 2025 - 10:07

Night2.jpg
.
.
.
Night3.jpg
.
.
.

IMG_20250809_214543.jpg
.
.
.
IMG_20250809_225438.jpg
.
.
.
IMG_20250810_200519.jpg

.
.
.
IMG_20250811_211125.jpg
.
.
.
IMG_20250824_224252.jpg
.
.
.
IMG_20250822_175647.jpg
.
.
.
IMG_20250823_145714.jpg
.
.
.
IMG_20250824_080235.jpg
.
.
.
IMG_20250824_182030.jpg
.
.
.
IMG_20250826_123224.jpg
.
.
.
IMG_20250826_204915.jpg
.
.
.
IMG_20250826_223626.jpg
.
.
.
IMG_20250827_210051.jpg
.
.
.
IMG_20250827_211446.jpg
.
.
.
IMG_20250828_102515.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह एक नंबर..
आराससह गणपती सुद्धा घरच्या घरी .. कमाल!

Happy फारच भारी आहे सगळेच. खूप आवडले. प्रत्यक्ष झाड, वर झोका खाली झुडपं सगळी कल्पना अगदी पर्फेक्ट उतरवली आहे. प्रमाणबद्ध व सुरेख. बाप्पाही गोड आणि प्रसन्न. बसण्याची पद्धत स्वामी समर्थांसारखी वाटली. एकदम नैसर्गिक वाटतं आहे. फांद्या कशा चिकटवल्या? खऱ्या वाटत आहेत.

फांद्या खऱ्याच आहेत. शेजारचे एक झाड वादळात उन्मळून पडले होते त्याच्या मालकाला विचारून काढून आणल्या दोन तीन. बॅकयार्ड ला मोरपंखी झाडाचे कुंपण आहे त्याची छटणी करत होते त्याची पाने इथे बांधली.

आवर्जून काही तोडले नाही. उन्हाळ्याचा रेग्युलर जो मेंटेनंस असतो त्यातल्या छाटण्या वापरल्यात

डेकोरेशनची कल्पना आणि कार्यवाही दोन्हीही भारी!! फार सुंदर झालंय झाड आणि झोपाळा!
गणपती चतुर्भुज नाही वाटतं तुमचा? Happy

झाड ,पाळणा ,गणपतीची ची प्रसन्न मूर्ती सारं सुरेख. सगळं हाताने घरी केलंय त्यामुळे विशेष कौतुक. मेहनत दिसतेय फोटोतून ,झाड तर एकदम खरंखुरं वाटतंय.

हो, मेक्स सेन्स. छान निवांत मागे किंचित रेलून बसलेली पोज आवडली. डोळेही छान आहेत - ते निस्तेज दिसले तर मजा जाते मूर्तीची! Happy

वाह..
मस्तच
आरास आणि मूर्ती दोन्ही सुरेख.

कलाकार आहात एक नंबर. __/\__
जोडीला भक्तीभाव , कल्पकता , सजावट, शिल्पाची सुबकता सगळं सगळं खूप्प आवडलं.
डोळ्यात भरतंय. झाड, झाडाची पानं देखणं झालंय सगळं.
टप्प्याटप्प्याने फोटो काढल्याने मेहनतीची कल्पना आली.
कसला भारी छंद जोपासलाय. उत्सव झाल्यावर अजून काही केलं तर नक्की येऊ द्या माबोवर !!

वॉव ! खूपच छान देखावा आणि गणपती मूर्ती झालेय . परफेक्ट आणि प्रमाणबद्ध .
गणपतीचे डिटेलिंग खूपच सुरेख . कान परफेक्ट जमले आहेत रिलॅक्स मूड मधले .

मी माझ्या अनेक आप्तांचे गणपती पाहतो. गेली काही वर्षे गणपतीवर फेटे अंगावर मलमलच्या कपड्यांचा प्रचंड मारा केला जात आहे. त्यावर पुन्हा इतके दागिने असतात की मूर्ती इतकी गजबजीत करून टाकतात ते करायचं नव्हतं. शिवाय प्लास्टिकची फुले, खूप लायटिंग इत्यादींचा सुद्धा भडिमार करायचा नव्हता म्हणून जसं सुचत गेलं तसं करत गेलो.

आधी गणपती केला मग त्याला साजेसे म्हणून झोपाळा करायचे मनात आले. परंतु झाड उभे करायचे कसे यावर काहीच ठरत नव्हते.

शेजारच्या एका माणसाने एक तीन पायांचा एका लाकडी बर्ड फिडर फेकून दिला होता तो आणला आणि वरचे घर काढून टाकले.

मग बाकीचे सुचत गेले.

वा!
यात जास्तीत जास्त रिसायकल्ड मटेरियल वापरलेलं दिसतंय.
मस्तक लागायच्या आधीची मूर्ती पाहून कसंसंच वाटलं. पण मग आठवलं, गणपतीची गोष्टही अशीच आहे की !

होय.

यातले काळे कागद सोडल्यास बाकीचे कागद, टिश्यू कापडे हे एकतर packages वगैरे साठवून घेतले आहेत. टिश्यू कापडाचा एक Box कुणीतर to give away म्हणून ठेवला होता. त्या कापडांना बांधून चाळलेली माती + डिंक+ थोडा रंग फासून अंथरले.

हे बेस्ट केले

<<<<< गणपतीवर फेटे अंगावर मलमलच्या कपड्यांचा प्रचंड मारा केला जात आहे. त्यावर पुन्हा इतके दागिने असतात की मूर्ती इतकी गजबजीत करून टाकतात ते करायचं नव्हतं. शिवाय प्लास्टिकची फुले, खूप लायटिंग इत्यादींचा सुद्धा भडिमार करायचा नव्हता>>>>>

यामुळेच बघायला देखील बरे वाटले.

सुंदर!

खूप मेहनत घेऊन अतिशय सुरेख बनवलाय देखावा आणि मूर्तीही!

_/\_

खूपच सुंदर..
मेहेनतही घेतलीय आणि पर्यावरण पूरकही आहे..
छानच..

Pages