'मायबोली गणेशोत्सव 2025

शशक २ – सवत तिची मायबोली (ऑल ईन वन शशक) – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2025 - 18:00

"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”

मी मोबाईलमध्ये खुपसलेले डोके वर काढून विस्मयचकित नजरेने तिच्याकडे पाहिले.

"सारखे तिच्यासोबत गुलूगुलू बोलणे काय, गालातल्या गालात हसणे काय...
हल्ली दिवसरात्र तेच चालू असते.
इतकेच असेल तर जा तिच्याकडेच राहायला..."

"कोण ती??" मी घाबरलो!

चुकून दुसरे नाव घ्यायचो आणि ते भांडे सुद्धा फुटायचे.

"तीच ती...
तुझी मायबोली!"

अरे देवा...

इतक्या स्पर्धा, इतके उपक्रम..
किती लिहायचे, केवढे वाचायचे..
हे संयोजक जरा अतिच करतात.
अश्याने घर तोडतील आमचे.

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  2025