महानुभव पंथाविषयी माहिती हवी आहे.
चक्रधरस्वामींच्या महानुभव पंथाविषयी थोडी माहिती पाहिजे आहे.
आमच्या गावी (मु.पो.फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा) महानुभव पंथाचे "श्रीकृष्णाचे" एक अतिशय सुंदर मंदिर आहे. मी एक-दोनदा तेथे गेलो होतो, त्यावेळी तेथे मला काळ्या साड्या परीधान केलेल्या महिला त्या मंदिराची देखभाल करताना दिसल्या. याचे काहि खास कारण आहे का? असे ऐकले अहे कि, हा पंथ मानणारे पहाटे ३-६ च्या दरम्यान नामस्मरण करतात आणि अमावस्येच्या रात्री दर्शन घेणे पवित्र मानतात (चुभुद्याघ्या). याचे काहि खास कारण आहे का? हा पंथ मानणार्या लोकांविषयी आणि या पंथाविषयी थोडी माहिती हवी आहे.