कथाकथी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. Wink )
नंतर सहज विचार करत होतो की अश्या मायबोलीवरच्या कथा आठवायच्या ठरवलं तर कोणत्या कोणत्या कथा पटकन आठवतायत ? त्यांची यादी करून त्या शोधून परत वाचल्या. आता लिंका शोधल्याच आहेत तर इथे टाकतो. जेणेकरून अजून कोणाला वाचायच्या असतील तर वाचता येतील. मायबोलीवरच्या बाकीच्या कथा आवडल्या नाहीत असं अजिबात नाही.. पण ह्या अगदी लक्षात राहिल्या..

दिसामाजिं काहीतरी : http://vishesh.maayboli.com/node/95
ही कथा पहिल्यांदा वाचताना मला अगदी भिती वाटली होती. श्र ची मला वाटलेली बेस्ट !!

सांवरा रे : http://vishesh.maayboli.com/diwali-2009/659
खास शोनू टच.. अजून काय लिहिणार ? Happy

सुखात्मे : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/546.html
ही वाचताना खूप अंगावर आली. मी अंकाच्या प्रतिक्रियेत पण लिहिलं होतं.. ह्यावर पुरुषोत्तम मध्ये छान एकांकिका बसवता येईल..

राजामणी : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118160.html?1161287924
शोनूच्या ह्या कथेची पार्श्वभूमी बाकी कथांपेक्षा एकदम वेगळी आहे ! त्यामुळे खूप लक्षात राहिली.

नीरजाची 'एका हरण्यची गोष्ट' : http://www.maayboli.com/node/21285
सह्ही आहे एकदम.. !

एक दिवस : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/597.html
संघमित्राचं साहित्य या कथेआधी फारसं वाचलं नव्हतं. छान वाटली ही एकदम !

जुन्या मायबोलीवर एक एलिझाबेथ की कोणीतरी लेखिका होती. तिने एका सायकिअ‍ॅस्ट्रीस्टबद्दल गोष्ट लिहिली होती. मला कथा पूर्ण आठवते आहे. पण नाव आठवत नाहिये आणि लिंक सापडत नाहिये. कोणाला माहीत असेल तर सांगा.

तीन पत्त्यांचा तमाशा : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/570.html
टिपीकल टण्या ! ही पण कथा खूप अंगावर आली...

पुन्हां एकदा शब्द : http://www.maayboli.com/node/17033
नंदिनीची ही कथा योग्य दिवसांमध्ये वाचली आणि आवडली.. Proud

इन्व्हाइट : http://www.maayboli.com/node/13608
द ग्रेट साजिरादा...! ह्या कथेतला दिवसातल्या काही घटना दुरुस्त करायचा फंडा खूप आवडला. खास साजिरा शैली आहेच.

ग्रुप - ३ : नांगराचा फंडा : http://www.maayboli.com/node/2697
आधीच्या ग्रुप कथानकात नांगराचा फंडा दादने मस्त गोवला आहे.

चमनची ती दोन मित्रांच्या संवादाची एक कथा होती. ती त्याच्या पाऊलखुणामध्ये सापडत नाहिये !!

आणि http://vishesh.maayboli.com/node/906 इथल्या सगळ्याच कथा एकसे एक आहेत !!! अनेकदा वाचल्या आत्तापर्यंत. Happy

त.टी.: शोनूने ती 'वर्षाची गोष्ट' पूर्ण केली तर ती पण ह्या यादीत अ‍ॅड करायचा विचार आहे !!

-------------------------------------------------------------------------------------------------------
अगो आणि पूनमने सांगितलेल्या

नीरजाची एक होती वैदेही :
http://www.maayboli.com/node/21291

-------------------------------------------------------------------------------------------------------

फारेंडाने दिलेल्या काही लिंक्स :

दाद ची मला अत्यंत आवडलेली, "साधी माणसं"
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125611.html?1178875632

संघमित्रा ने लिहीलेल्या (पण अजून ज्याचे पुढचे भाग टाकलेले नाहीत अशा) सॉफ्टकथा

क्र.१
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119939.html?1164860791

क्र.२
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125257.html?1177725825

आणि पूनम ची होम मिनिस्टर
http://www.maayboli.com/node/5897

--------------------------------------------------------------------------------------------------
सिंडरेलाने दिलेली एक लिंक :

स्वातीची कथा 'उत्तर' : http://www.maayboli.com/node/5306

---------------------------------------------------------------------------------------------------
रैना आणि रूनी ने सुचवलेल्या काही :

कौतूकची : दे कॉल मी इ. झेड : http://www.maayboli.com/node/13598 (ह्यातच पुढच्या दोन भागांच्या लिंक आहेत)
साजिर्‍याची : गावशीव : http://www.maayboli.com/node/5438

विषय: 
प्रकार: 

अरे वा, हे छान केलंस ! खूप कथा वाचायला मिळतील फारसे कष्ट न घेता Happy
दिसामाजिं काहीतरी ... ही कथा वाचतावाचता अक्षरशः थक्क झाले होते मी. काहीकाही कथा वाचताना त्या कथेतल्या स्थळकाळात इतकं गुंगून जायला होतं की आसपासच्या खर्‍या जगाचा संपूर्णपणे विसर पडतो. ही कथा त्यांपैकी एक. 'सांवरा रे' ही तशीच. अजूनही आठवल्या की इथे लिंक देते.
रच्याकने, 'सती' ही दहा-बारा भागांतली कथा श्र ( श्रद्धा ? )चीच होती का ? ती तिच्या ब्लॉगवर वाचली होती आणि बहुतेक वाचून तिला विपूही केली होती. ती कथा
तिच्या ब्लॉगला त्यानंतर भेटच दिली नव्हती. आता वाचते राहिलेलं. धन्यवाद पराग Happy

रुनी.. "एक होती वैदेही" दुसरी.. ही ती नव्हे.. Happy
सायो.. आयडी सापडला.. पण कथा सापडत नाहिये जुन्या मायबोलीत.. आणि तिथे पाऊलखुणा पण नव्हत्या ना?
चमनच्या कुठल्याच कथा त्याच्या पाऊलखुणांमध्ये दिसत नाहियेत.. त्याने आयडी बदलला होता का मधे ?

जबरी काम केलस पराग!
साजिर्‍याची कथा मी मिसली होती.. आता वाचते.

चमन ने पूर्वी बो विश म्हणून लिखाण केलय ना?

देवी वाली म्हणजे 'एका हरण्याची गोष्ट'
ती मधे डोकं फिरलं तेव्हा मी बरचसं उडवलं त्यात उडाली. Happy
http://www.maayboli.com/node/21285 ही घे परत टाकली आता.

वैदेही पण टाकू का परत?

मस्त धागा.
मला आवडणार्‍या अजून काही
- शोनूची एका गणपतीतली आरोहीची गोष्टं आणि ती बेनझिर वाली
- आशूची गणित
- पूनमची ती होममिनिस्टरवाली
- अगो/ मेघना भुस्कुटे आणि सुमॉची मागच्या दिवाळीअंकातली
- रुनीला अनुमोदन - चमनची ती शेक्सपियरवाली आणि एक अपूर्ण आणि साजिर्‍याची गावशीव हवीच.
- कौतुकची एबोलावरची (?)
- नीधपची वैदेही

पूनमची क्लिक.
रचना बर्वे च्या जुन्या काही कथा.
चमनची शेक्स्पियरवाली आठवत नाहीये. आता वाचते.
शोनूच्या सगळ्याच गोष्टी
२ वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवात ती कॉलनी वाली सिरीज होती ते पण शोनूचंच ना?

ए चमनची लहान मुलाच्या नजरेतून लिहिलेली गोष्ट? मस्त होती.
नीरजाची एक होती वैदेहीही
येस, श्रची 'दिसामाजि..' आणि 'सती..'

पराग, आम्हीही इथे लिंक्स दिल्या तर चालतील का?

धन्यवाद पराग....आता आम्हांलाही या गोष्टींचा लाभ घेता येईल.

अरे वा सहीच, ह्यातल्या बर्‍याच मी वाचल्या नाहीत. लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद. स्वातीची 'उत्तर' होती ना ? ती पण खूप आवडलेली.

बाकी, चमन हा खरच चमन आहे. त्याने डिलीट केल्यात कथा. कारण त्यालाच विचारा.

कौतुकची 'झोका'- आत्तापर्यंतच्या त्याच्या कथांमध्ये सर्वात आवडलेली.
नंदिनीची ओरिजिनल 'शब्द'

अजून काही आठवत आहेत.. सुमॉची दोन वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवामधली
ललिताची- गावाच्या बाहेरून पूल बांधताना गावात झालेले बदल- दोन स्थानिक लहान मुलींच्या नजरेमधून
स्वातीची २००८च्या दिवाळी अंकातली
रैनाची लेटेस्ट
(मला नावं एक आठवत नाहीत पटापटा :अओ:)
दादची 'रूबिक क्यूब आणि कृष्ण'
साजिराची गावशीव आणि इन्व्हाईट
टण्याची 'दंडोबा'

पराग्याने परवानगी दिली तर लिंका देता येतील.

जुन्या मायबोलीवर शोनूची 'बेनझिर काय म्हणेल' ही कथा मस्त होती. शिवाय दाद आणि सुपरमॉमच्या काही कथा मनात रेंगाळतील अश्या होत्या.

पराग, लिंका पाठवू का? तुला हेडरमध्ये टाकता येतील.

जबरी धागा.. यातल्या काही मिस केलेल्या कथा आता वाचुन काढणार.. जुन्या मायबोलीवर काही शोधणं अवघड जातं. हे बाकी भारी काम झालंय.
आवडत्या १० त. Happy

वोके नीरजा. वर पग्याने भलाथोरला हेडर लिहिलाय, पण 'तुम्हाला आवडल्या असतील, तर तुम्हीही लिंका द्या' असे काही म्हटले नाहीये, शिवाय हे त्याचे रंगीबेरंगी पान! परवानगी घेतलेली बरी असते, काय? Wink Light 1

अरे बापरे, हे रंगीबेरंगीचं माझ्या लक्षातच येत नाही. मी परस्पर लिंक देऊनही टाकली Sad
पूनम, झोका नाही 'झुला'. कौतुकची ही कथाही अशीच आजूबाजूचं भान विसरायला लावणारी. पूनमच्या ब्लॉगवर ही कथांचा खजिना आहे. सिंडरेलाची 'क्षणभर' ( हेच होते का नाव ? ) मला आवडली होती.
दिवाळी अंकातल्या कथा प्रत्यक्ष जाऊन शोधणे सोपे आहे पण गणेशोत्सव, गुलमोहर किंवा जुन्या हितगुजमधील कथांच्या मात्र आवर्जून लिंक्स ( लवकरात लवकर ) द्याव्या Happy

जुन्या मायबोलीवर मला शोनूची 'एक वर्षाची गोष्ट' (जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही) आणि रैनाची 'अनवाणी गेन' ह्या आवडल्या होत्या. म्हणजे सुरुवात आवडली होती. चमन्/बो विशची 'दुस्तर' ही ह्याच कॅटेगरीतली Happy

Pages