कार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.

'गणपती' हे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कित्येकांचे आराध्य दैवत आहे.
संगितकार - श्री. म. ना. कुलकर्णी
गीतकार - सौ. आश्लेषा महाजन
कलाकार - मो
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||
गायिका - मो
काराओके स्त्रोत - इंटरनेट
मूळ गायिका: सुमन कल्याणपुर
मूळ संगीतकार: कमलाकर भागवत
गीतकार: संत तुकाराम
मुलांनो, आता आपण ऐकूया गणपती बाप्पाची एक गोष्ट.
कलाकार - हेमांगी वाडेकर

महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-
तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-
नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-

जय हेरंब!
मंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेल्या वर्षी, श्री गणरायाच्या कृपेने, कु. प्रीति ला प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांनी शिष्या म्हणून स्वीकारले!
वीणाताईंनी शिकवलेली ही संस्कृत गणेश वंदना मायबोली गणेशोत्सवात आपणा सर्व रसिक भक्तांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
आमने-सामने - खुमासदार चर्चा

या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.
नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.