राजकारण

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 01:59

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

दोन अश्रू आणि एक सलाम..!

Submitted by अ. अ. जोशी on 14 August, 2014 - 03:05

शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं,
त्यांना कधीच विसरलो आहोत...
त्यांच्या नावानं जे पुढारले,
त्यांच्यावरच विसंबलो आहोत...

15 ऑगस्ट, 26 जानेवारी...
मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील..
सुट्टी जर जोडून आली,
तर फारच बहार आणतील...

तीन-चार दिवस स्वातंत्र्याला,
बघा कसं उधाण येईल..
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले,
त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल...

जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी,
पुन्हा कशाला आठवायच्या..?
असे जर म्हणत असाल,
तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..?

आपण करतो मौज-मजा,
त्यांनी सांडलेल्या रक्तावर..
आपण उपभोगतो स्वातंत्र्य,
त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर...

राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

विषय: 
प्रकार: 

लोकप्रतिनिधी - शैक्षणीक पात्रता आणि खातेवाटप

Submitted by ऋता पटवर्धन on 9 August, 2014 - 05:07

लोकसभा निवडणूकीचे निकाल लागले आणि काँग्रेस प्रणित यूपीएचा पराभव होऊन भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीए सरकारने स्पष्ट बहुमत मिळवलं. खुद्द भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं. १९५१ सालच्या पहिल्या निवडणूकीपासून प्रथमच काँग्रेसेतर पक्षाला स्पष्ट विजय मिळाला होता. या निर्विवाद विजयाचं श्रेयं नरेंद्र मोदींच्या आक्रमक प्रचाराचं होतं, त्याप्रमाणेच काँग्रेसमधील अभूतपूर्व गोंधळ आणि यूपीए सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये गाजलेले घोटाळे हे देखिल तितकेच जबाबदार होते. जनतेला सरकार आणि विशेषतः राजकीय पक्षं म्हणून काँग्रेसविषयी असलेला तिटकारा आणि चीड मतदानातून व्यक्तं झाली असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

विषय: 

भारतीय लोकप्रतिनिधी आणि निवृत्तीचं वय

Submitted by ऋता पटवर्धन on 7 August, 2014 - 18:52

मिझोरामच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांची नुकतीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राज्यपालपदावरुन हकालपट्टी केली. या निर्णयाबद्दल सरकार आणि विरोधक यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास अपेक्षेप्रमाणे सुरवात झालीच. सरकारने कारवाईचे सर्व तांत्रिक निकष पूर्ण केल्याविना राष्ट्रपती राज्यपालांची हकालपट्टी ईनाहीत हे उघड आहे. त्यामुळे हा निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची भाषा अद्याप कोणाकडूनही करण्यात आलेली नाही.

विषय: 

निखिल वागळ्यांचं उत्तम भाषण

Submitted by pkarandikar50 on 23 July, 2014 - 01:23

एक उत्तम भाषण
’साधना’ ने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने आय.बी.एन.- लोकमतचे मुख्य संपादक निखिल वागळे यांनी पुण्यात ’प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावर केलेलं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. वागळे मनापासून आणि मनातलं बोलले. वाहिनीवर बोलताना ते काहीसं कर्कश आणि आक्रस्ताळेपणे बोलतात, पण ’त्या’ भाषणात ’तो’ सूर त्यांनी लावला नाही, तरीही त्यांचं निवेदन पुरेसं आक्रमक आणि एका अर्थी स्फोटक होतं.

विषय: 

हा घेतलेला श्वास तोच काय तो आपला - मलेशियन विमानाची शोकांतिका

Submitted by mansmi18 on 18 July, 2014 - 09:18

नमस्कार,

कालच मलेशियन विमान पाडण्यात आल्याची बातमी आली आहे. त्यात ८४ लहान मुले आणि इतर २१४ प्रवासी मिळुन २९० पेक्षा जास्त लोक मरण पावले.
त्यात चुक कोणाचीही (अतिरेकी, किंवा युक्रेन सैन्यदल..किंवा ... ) असु दे.. निरपराधी जीव मारले गेले. खुप वाईट वाटले. त्या कोणाच्या डोक्यातही आले नसेल की अशी लढाई ज्यात आपला काहीही संबंध नाही त्यात आपण मारले जाउ.

परत एकदा सिद्ध झाले की आपल्या हातात काही नाही. आपण भले कितीही काळजीपुर्वक जगत असु.. वेळ झाली की जावेच लागणार.

गेलेल्या निरपराध जीवांना श्रद्धांजली..

विषय: 

केंद्रीय अर्थसंकल्प २०१४-१५

Submitted by भरत. on 10 July, 2014 - 02:25

Finance Minister asking for a break during the budget speech? Don't remember having seen that before.
Why is inclusion of gender sensitivity lessons in school curriculum part of budget speech?
Isn't there an honourable independent HRD Minister of cabinet rank? Or there isn't one?

http://www.firstpost.com/budget-2014/

शरीयत वर आधारीत कायदा

Submitted by नितीनचंद्र on 8 July, 2014 - 01:52

शरीयतवर आधारीत काझी आणि त्यांचे फैसले याला कायद्याने मान्यता नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. असे निकाल किंवा फतवे मानण्याचे बंधन नाही असा निकालही सुप्रीम कोर्टाने दिला. परंतु अश्या न्यायप्रक्रियेवर मात्र बंदी घालायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

मराठी पेपरातल्या बातम्या किंवा दुरदर्शनवरच्या बातम्या अर्धवट होत्या म्हणुन जेव्हा इंटरनेटवर पाहिले तेव्हा हे वाचुन धक्काच बसला.

http://khabar.ibnlive.in.com/news/123214/1

जनतेला काय हवय ?

Submitted by नितीनचंद्र on 6 July, 2014 - 02:14

काँग्रेस आणि खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात आपली डाळ शिजणे कठीण आहे हे जाणवल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या चाली खेळायला सुरवात केली आहे. त्यातली एक चाल आरक्षणाची होती. न्यायालयात हे टिकणार नाही माहित असताना ज्यांना राजकारणातल काही कळत नाही अश्या सामान्य लोकांच्या समोर आम्ही काहीतरी केल हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. सहानभुती मिळवण्याचा हा प्रयत्न होता.

Pages

Subscribe to RSS - राजकारण