राजकारण

स्वित्झर्लंड मधल्या एका राज्यात बुरखा बंदी

Submitted by फारएण्ड on 27 September, 2013 - 02:35

स्वित्झर्लंड मधल्या एका "कॅण्टन" (प्रांत/राज्य/परगणा सारखे काहीतरी असेल) मधे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालायला बंदी केलेला कायदा नुकताच पास झाला. याचा मुख्य उद्देश बहुधा मुस्लिम स्त्रियांना बुरखे घालायला बंदी करणे हा असावा.
http://www.swissinfo.ch/eng/swiss_news/Burka_ban_approved_in_Italian-spe...

त्याचे वरकरणी कारण सार्वजनिक सुरक्षा हे दाखवले जाते आहे. बुरखा असेल तर आत कोण आहे हे कळणार नाही वगैरे वगैरे. पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाही असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.

सोडा ना... आपल्याला काय करायचंय?

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 08:08

सोडा ना... आपल्याला काय करायचंय?

तसा वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध फक्त मुंबई मध्ये जमिनीचे भाव काय झाले हे जाणून घेण्याइतकाच. बाकी असतेच काय? २-३ बलात्कार, ५-१० चोऱ्या, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, एखादा घोटाळा जनतेसमोर आणि बाकीच्या जाहिराती. पण त्या दिवशी दाभोळकरांच्या घटनेची बातमी वाचली. खरे सांगू, तर मलाही माहित नव्हते की ते नक्की होते कोण. नंतर थोडे वाचले, तेव्हा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. अजूनही मला पूर्ण माहिती नाहीच पण म्हणून काय झाले? मला अंधश्रद्धा म्हणजे काय ते माहिती आहे. कारण तो माझ्या तुमच्या जीवनाचा एक भाग बनलाय.

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

"सीरिया" प्रश्न

Submitted by उदयन.. on 1 September, 2013 - 04:31

सीरिया छोटासा देश.. दक्षिण - पश्चिम आशिया खंडाचा एक भाग... एका बाजुला समुद्र तर बाकिच्या बाजुंनी रशिया, इस्त्राईल, जॉर्डन, इराक, तुर्की..यांनी विढलेला आहे...म्हणजेच..चोहीबाजुंनी खदखदणार्या भुभागांमधे मधे सँडविच झालेला देश..आधी हा देश फ्रांस च्या ताब्यात होता... १९४६ साली स्वतंत्र झाला आणि नंतर बशर अल हसन यांच्या नेतृत्वाखाली. आला.. परंतु .....देशाची वाटचाल यथातथाच आहे...
मुख्य उत्पादन स्त्रोत तेल.. त्यामुळे देशाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले.. देशाचे ९०% लोक मुस्लिम सामुदायाचे आहेत......

ही झाली या देशाची थोड्क्यात माहीती..:)

विषय: 

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

Submitted by बावरा मन on 25 August, 2013 - 01:43

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

विषय क्र. १. - राममंदिर निर्माण चळवळ

Submitted by limbutimbu on 24 August, 2013 - 07:24

विषय क्र. १. राममंदिर निर्माण चळवळ

पार्श्वभूमि:

विषय क्रमांक २ - प्रसिद्धीपराङ्मुख राजकारणी नेता - त्रिभुवनदास पटेल

Submitted by हर्पेन on 22 August, 2013 - 07:14

कोण बरे हे त्रिभुवनदास पटेल? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल. अगदी बरोबर! मलाही हे कोण आहेत हे माहित नव्हतेच. मलाही हे माहित झाले ते एका लांब, वळणावळणाच्या वाटेनेच.

"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

Pages

Subscribe to RSS - राजकारण