राजकारण

डॉ.नरेन्द्र दाभोळकरांची निर्घृण हत्या

Submitted by pkarandikar50 on 21 August, 2013 - 04:12

डॉ.नरेन्द्र दाभोळलरांची निर्घृण हत्या

विषय: 
शब्दखुणा: 

गुजरात, बिहार इ. राज्यांचा विकास : खरे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 15 August, 2013 - 13:57

राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).

ए बी पी न्यूज- प्रधानमंत्री

Submitted by श्रीकांत on 21 July, 2013 - 12:12

नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.

म्हणे राजकारण करू नका.

Submitted by मी-भास्कर on 18 July, 2013 - 04:55

म्हणे राजकारण करू नका.
निव्वळ बकवास!
"आम्ही या प्रश्नावर राजकारण करीत नाही तुम्ही पण राजकारण करू नका." असे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बजावत प्रछन्न राजकारण करीत असतात.
अरे तुम्ही राजकारण करण्यासाठीच राजनीतीमध्ये उतरलात ना? मग "ताकाला जाऊन भांडे का लपवता"? आणि राजकारण करणे हेच जर गैर असेल तर गेलात कशाला कडमडायला तिथे? महानंदासारख्या जुलमी राजाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी चाणक्याने जे राजकारण केले त्या राजनीतीने या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तसे राजकारण कराच.

विषय: 

सरकार आणि न्यायपालिका

Submitted by विजय देशमुख on 10 July, 2013 - 09:37

मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.

आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही. Happy

निवडणुका नि राममंदिर

Submitted by गणपतराव on 6 July, 2013 - 11:46

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यात कॉंग्रेस ने अन्नसुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढलाय. कॉंग्रेस ला याचा राजकीय लाभ होवू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपने पुन्हा राम मंदिराचा विषय काढला आहे.

फक्त मोदींच्या करिष्म्यावर निवडणुका जिंकू शकतो ह्याबद्दल भाजपाला शंका असावी . परंतु एक मात्र नक्की कि भाजपला निवडणुका आल्या कीच राम आठवतो. सत्तेवर आल्यावर भाजपा राम मंदिर बांधेल का ? कि हा मुद्दा फक्त ते निवडणुकी करता वापरतायत?

विषय: 

केंद्रसरकारचे अभिनंदन

Submitted by सचिन पगारे on 4 July, 2013 - 01:26

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपिए आघाडीने मानवतावादी निर्णय घेतला आहे अत्यंत जबरदस्त पाऊल उचलले असून जितके अभिनंदन करावे ते थोडेच ठरेल.
अन्नसुरक्षेची हमी देणारा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठविण्यात आला आहे.विरोधकांनी ह्या विधेयाकाविषयी जी आडमुठी भूमिका घेतली त्यामुळे सरकारला हा अध्यादेश आणावा लागला.

जगात अन्नसुरक्षेची हमी देणारे फारच थोडे देश आहेत त्यात आता भारत सामील झाला आहे ह्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा.

विषय: 

तार कायमची बंद होणार

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 17 June, 2013 - 01:39

सुरुवातीच्या काळात एक जलद संदेश पोहोचविण्याचे माध्यम आणि जे ईस्ट ईंडीया कंपनी सोबात भारतात दाखल झाले ती आल्याने कित्येकाच्या उरात धडकी भरायची अशी तार १५ जुलै पासुन बंद करण्याचे शासनाने ठरविले आहे.
आजच्या ईमेल फोन च्या काळात तिचा वापर अतिदुर्गम भागातही होत असेल याची खात्री नाही परंतु काही प्रमाणात शुभेच्छा संदेश तात्काळ देण्यासाठी आजही तारे द्वारे पाठविणारे काही लोक आहेत. पुर्वी तार आली की कोणीतरी गेले अशीच भीती रहायची. लौकर निघ, निघ असे तोकडे संदेशान समजणारा समजुन घ्यायचा आणि मिळेल त्या वाहणानी नियोजित ठिकाणी पोहोचायचा.

लागेल थोडे तेल धगास आता

Submitted by डॉ. बंडोपंत on 18 May, 2013 - 05:58

वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता

पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता

ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता

मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता

गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता

चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता

(मार्गदर्शन अपेक्षीत)

एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!

Submitted by sudhirkale42 on 10 May, 2013 - 01:55

एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (सध्या अमेरिकाभेटीवर)
sbkay@hotmail.com

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण