नेहमीसारखीच आज पण मायबोलीकरांची मदत हवी आहे.मला न्यू ऑर्लीन्समधे येऊन एक वर्ष होऊन गेलं. आल्यापासून अॅलर्जीचा त्रास होतो आहे.म्हणजे नाक बंद होतं, कधी नाकातून पाणी येते.घसा खवखवतो.डोकं दुखतं. कधी शिन्का येतात्.ताप आहे असे वाटते, पण थर्मामीटरमधे येत नाही. ह्या सगळ्याचा अगदी अंथरूणावर पडून राहण्याएव्हढा त्रास नाही, पण थकवा येतो.डॉक्टर कडे जाणे वगैरे झाले आहे.त्याच्यामुळे रोज क्लॅरिटीन घ्यावी लागते, आणि नॅसोनेक्स स्प्रे पण. नाहीतर आलर्जी शॉट.
पण मला आता औषधांचा कंटाळा आला आहे.कोणाला काही दुसरे उपाय माहित आहेत का?
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.
गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)
एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.
बदलत्या ऋतु नुसार पायांची काळजी (निगा) कशी घ्यावी यासंबंधी माहिती इथे द्यावी. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी पेडीक्युअर करण्याची पद्धत यावर इथे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
हल्ली see-through kitchen ही एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. पण फारचं कमी अशा restaurant/shops मधे ही पद्धत पहायला मिळते. यामागे उद्देश हा की तिथे तयार होणारे पदार्थ हे मुलभूत स्वच्छता पाळतात. मागिल शुक्रवारी माझ्या एका कलीगचा सख्खा भाऊ अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावला. पुण्यात कुठेतरी त्यानी भेळ खाल्ली आणि घरी येऊन पोट जे दुखायला लागले, उलट्या व्हायल्या लागल्यात की काही तासातचं तो गेला. ती बातमी ऐकून मला जरा काळजी वाटते आहे. कारण हल्ली बरेच जण बाहेरच्या चटकमटक पदार्थाकडे पाहून ते चाखून पाहतात आणि त्याची खूप जाहिरात पण करतात. junk food खाणे, चॅट पदार्थावरचं जगणे यांचे प्रमाण वाढते आहे.
http://epaper.esakal.com/esakal/20100322/5509504158478656796.htm
न्यूयॉर्क - आरोग्य विम्याचे संरक्षण नसलेल्या लाखो अमेरिकी नागरिकांना आरोग्यसेवेच्या छत्राखाली आणत विमा कंपन्यांच्या पिळवणुकीला चाप लावणारे ऐतिहासिक आरोग्यसेवा सुधारणा विधेयक "हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज' ने आज (ता.२२) सकाळी संमत केले. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामांनी आपले अध्यक्षपद पणाला लावले होते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचा दौरा रद्द करत देशांतच थांबणे पसंत केले होते. त्यामुळे हा त्यांच्या राजकीय विजय मानला जात आहे. ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने दशकभर उराशी बाळगलेले ध्येय हे विधेयक संमत झाल्याने पूर्ण झाले आहे.
मनक्यात पाणी कशामुळे होते ? आणि हे पाणी काढण्याशिवाय दुसरा उपाय प्लीज मला या विषयी माहिती हवी आहे