कॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज

Submitted by स्वाती२ on 24 September, 2011 - 11:26

माझ्या नवर्‍याच्या प्लॅन्टमधे काम करणारा एक कामगार शेवटच्या स्टेजचा थायरॉईड कॅन्सर रुग्ण आहे. त्याच्या १४-१६ वयोगटातील मुलांसाठी आणि पत्नीसाठी केअर पॅकेज पाठवायचे आहे. तेव्हा काय गोष्टी द्याव्यात? तसेच रुग्णासाठी काय द्यावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्यांना त्या रुग्णाबरोबर, त्याच्या काळजीत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल, रुग्णाला वा त्यांना आराम / दिलासा देतील अशा गोष्टी?

उदा : त्यांचा वेळ वाचेल अशा सर्व्हिसेस (गाडीत गॅस भरून देणे, गाडीचे सर्विसिंग, घरातील किंवा बाहेरची कोणती कामे करणे इ. इ.)

पिकनिक लंच बास्केट, रेडी-टू-ईट फूड पॅक्स / मिक्सेस

रुग्णासाठी :

फॅमिली + फ्रेंड्सच्या शुभेच्छपत्रांचे कोलाज, त्यांच्या आयुष्यातील हृद्य क्षणांच्या फोटोग्राफ्सचे कोलाज / कॅलेन्डर

लोशन्स व लिपबाम्स

टिश्यूज व वाईप्स

करमणुकीची साधने, उदा आवडत्या चित्रपटांच्या/ गाण्यांच्या / करमणूक कार्यक्रमांच्या डीव्हीडीज

नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन

अरुंधती/स्वाती२
देशविदेशाची मिसळ होतिये प्रश्न अन उत्तरात...
उत्तर विदेशी आहे.
प्रश्न देशी आहे कि नाही माहित नाही.
विदेशी असेल तर ठीकेय, नाही तर..
'प्लँटमधे काम करणारा कामगार..' डिव्हीडीज?? नेटफिक्ल्स चे सबस्क्रिच्प्शन? ते काय असते??? गाडीत गॅस...
पेट्रोल?

अरुंधती,
तुमच्या भावनांची चेष्टा करायचा अजिबात उद्देश नाही, प्लीज, चुकीचा समज करून घेऊ नये, तसे चुकुनही वाटल्यास मनापासून माफी मागतो. फक्त वाचून जे वाटलं ते लिहिलं.

माफ करा इब्लिस. मी जरा सविस्तर लिहायला हवे होते. सदर रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय अमेरिकेत आमच्या शेजारच्या एका छोट्या गावात राहातात. अरुंधतीला मी अमेरिकेत आहे हे माहित असल्याने तिने त्यानुसार सुचना केली.

धन्यवाद अरुंधती. तू सुचवलेले पर्याय छान आहेत.

धन्यवाद तोषवी. रोज लागणार्‍या गोष्टींसाठी रोख रक्कम नक्कीच उपयोगी येइल. रोख रकमेऐवजी ग्रोसरीस्टोअर/फार्मसीचे गिफ्ट कार्ड घेइन.

कोणीतरी त्यांना व्हिजीट करून कपडे धुवून देउ शकेल का? त्या रोग्या जवळ बसल्यास प्रायमरी केअर गिव्हर ला एक तास वागैरे बाहेर जाऊन येता येइल. मुलांना गिफ्ट किंवा होमवर्क असिस्टन्स.
अकु ने बरोबरच लिहीले आहे.

अजून एक सुचवू का? त्यांचे घराचे स्टेट्स काय आहे? आजार पणात त्या वैनींना ते चेक करायला वेळ झाला नसेल. मॉर्गेज पेमेंट्स ड्यू आहेत का. वगैरे चा एक स्टेटस रिपोर्ट बनवून त्यांना दिल्यास त्यांना
पती गेल्यावर धावपळ करावी लागणार नाही. व बेघर व्हावे लागणार नाही.
बँक ऑफिसरला भेटणे, इन्श्युअरन्स संबंधी कागद पत्रे तयार ठेवणे. मेडिकल इन्स्युअरन्स आहे का? एलिजिबिलेटी इत्यादी बघून ठेवणे. बर्‍याच वेळा एका संकटातून बाहेर पडल्यावर लगेच दुसरे समोर उभे राहते त्यासाठी आपन तयार नसतो म्हणून ह्या दुसर्‍या संकटांची लिस्ट तयार ठेवणे. कार रिपेअर्स व मेंटेनन्स करून घेण्यासाठी मदत करणे. फेसबुक वर सिंगल पेरेंट ग्रुप आहे. पण ते सर्व नंतर. पहिले त्यांना ग्रीफ काउन्सेलिन्ग पण लागेल.

शी हॅज अ बिग बॅटल ऑन हर हँड्स.

अमा+१.

स्वाती२ | 25 September, 2011 - 03:24
>> मी जरा सविस्तर लिहायला हवे होते. >>

छे छे.. तसं काही नाही. माझंच चुकलं मधे बोललो.. तुम्ही ते चुकीच्या अर्थाने घेतलं नाहीत म्हणून धन्यवाद!

स्वाती२,
काही वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या शाळेतल्या एका बाईंना कॅन्सर झाला असता, मुले त्यांना भेटायला जाऊ शकत नव्हती, त्यांनी एक व्हिडिओ फिल्म बनवून त्यांच्या नवर्‍याला दिली होती. हॉस्पिटलने पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून भेटायला परवानगी फक्त जवळच्या नातेवाईकांनाच दिली होती.
शाळेतल्या मुलांनी पाठवलेल्या आणखी भेटी, त्यांचा विचार करावा:
१. गॅस कार्ड
२. घरी कुटुंबियांसाठी जेवण
३. घरचे लॉन कापण्याची सोय
४. कपडे धुवून देण्याची सोय
५. बाईंच्या मुलांना शाळेत पोचवण्याची जवाबदारी
६. शाळेत पालक शिक्षकांनी रक्तदान शिबिर भरवले - बाईंना रक्त जवळजवळ दर आठवड्याला द्यावे लागत होते

धन्यवाद स्वाती.

चर्च मेंबर्सनी रोजच्या कामांची बरीचशी जबाबदारी उचललेय. त्यामुळे प्रेयर कार्ड आणि जोडीला गॅस, फार्मसी, ग्रोसरी यासाठी कार्ड असे आज नवरा घेऊन गेला. रुग्णाच्या पत्नीशी प्रत्यक्ष बोलून बाकी स्टेटस कळले की त्याप्रमाणे पावले उचलता येतील. ऑफिसबडीज बरोबर नॉर्मल गप्पा/गॉसिप वगैरे झाल्या की मूड चांगला रहातो म्हणुन वेळ मिळेल तसे रोज कुणी ना कुणी अर्धा-पाऊण तास जाऊन येतात. रविवारी एक मित्र चर्चला घेऊन गेला होता. त्यांचा पॅस्टर खूप चांगला आहे. त्यामुळे शरीर थकले असले तरी He is in good spirit! मुलांना पुढील वाटचालीत मेंटर म्हणुन शक्य ती मदत करुच.

स्वाती२,
तुम्ही करताय ती मदत फार मोलाची आहे. त्यामुळे वहिनी आणि मुलांनाही कळेल, पुढे गरज पडेल तेव्हा कोणाला मदत मागावी.

I love American people for their sharing and caring practical approach. : ) she and family is in my prayers. Happy

क्लीनिंग सर्व्हिस, स्कूल बस नसेल तर मुलाला शाळेत ने आण करायला मदत , होमवर्क ला मदत,
लॉंड्री / ग्रोसरी / ड्राय क्लीनिंग ला मदत. लॉन कापणे, कुत्र्याला फिरवून आणणे , पेट्सची काळजी घ्यायला मदत