"मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था : गणेशोत्सवानिमीत्त उपक्रम

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 August, 2011 - 02:38
ठिकाण/पत्ता: 
महाराष्ट्र

प्रिय मायबोलीकर,

"मैत्र जिवांचे"या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन झाल्याला बराचसा अवधी उलटला आहे. संस्थेच्या पुढील उपक्रमाबद्दल विचारणा करण्यासाठी आम्हाला अनेक उत्साही मायबोलीकरांचे दुरध्वनी येत असतात. अनेक जण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने संस्थेच्या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करताहेत.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आपल्या कार्याचे दुसरे पाऊल उचलायचे निश्चित केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अनौपचारिक बैठकीत एक कल्पना पुढे आली. यंदा गणेशोत्सवाच्या निमीत्ताने जिथे जिथे आपल्याला शक्य आहे अशा सर्व शहरातून गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीने संस्थेचे उद्धिष्ठ तसेच कार्याविषयी माहिती देणारे माहिती फलक गणॅशोत्सव मंडळाच्या मंडपापाशी लावणे शक्य आहे का यावर विचार झाला. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला मानस आणि आपल्या कार्याची माहिती पोचवता येइल. संस्थेचे मार्गदर्शक श्री. दत्तात्रय उर्फ दत्ताभाऊ गायकवाड यांनी वीटा व कराड येथील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापाशी आपले माहिती फलक लावण्याची जबाबदारी घेतली आहे.

पुण्यातील स्थानिक मंडळांशी बोलणी सुरू आहेत. साधारण २X२ किंवा २X३ अशा आकाराचे माहिती फलक या गणेश मंडळांना पुरवण्याची जबाबदारी "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था घेत आहे. सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती की त्यांना शक्य असेल तर आपापल्या शहरात, आपल्या उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या मंडपात हे फलक लावता येतील का? ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया "मैत्र जिवांचे" च्या पदाधिकार्‍यांशी त्वरित संपर्क साधावा.

म्हणजे गणेशोत्सव सुरु व्हायच्या आधी हे फलक त्यांच्यापर्यंत पोचवता येतील.

माहिती फलकाचा नमुना...

मायबोलीकरांच्या सक्रिय सहभागाच्या आणि सुचनांच्या प्रतिक्षेत !

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी
सचिव
'मैत्र जिवांचे सामाजिक संस्था'
भ्रमणध्वनि क्र.: ९९६७६६४९१९
विरोप पत्ता : maitrajivanche.ngo@gmail.com

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, August 18, 2011 - 14:30 to Wednesday, August 31, 2011 - 02:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोचवण्याचा मार्ग खरंच खूप चांगला आहे. पण विशाल, फलकावरचा मजकूर खूप जास्त वाटला. म्हणजे गणपतीच्या कार्यक्रमांना, दर्शनाला येणारी व्यक्ती थांबून हे सगळं वाचेलंच असं नाही. तुम्ही हा मजकूर कमी करून, आवश्यक मुद्दे हायलाइट करू शकला तर जास्त परीणामकारक होईल असं नाही का वाटत?

अत्यंत चांगली कल्पना. जितक्या जास्त लोकांपर्यंत पोचता येईल तेव्हढे छानच आहे. उपक्रमाला खूप शुभेच्छा.
मलाही थोडसे मृ सारखेच वाटते. जाहिरात फलक तेवढा आकर्षक करून घ्या कोणाकडून तरी. कमी आणि लक्षवेधक मजकुर हवा. मला वाटते मायबोलीकर साजिरा स्वतः जाहिरत क्षेत्रात काम करतात त्यांचा सल्ला घ्या हवा तर.

धन्यवाद सगळ्यांचे Happy
मृ आणि रुनी धन्स ! तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी प्रयत्न करतो अजुन एडीट करण्याचा !

विशाल उपक्रम चांगला आहे..
मृ आणि रुनीला अनुमोदन...
माझे आणि हबाचे ह्या संदर्भात बोलणे झाले होते.. मी काही जणांना पुण्यातल्या सगळ्या मंडळांच्या लिस्टबद्दल विचारणा केली आहे.. मला उत्तर मिळाले की कळवतोच..

मस्त आणि अभिनव कल्पना. थोडे मोठे फलक, थोडा कमी मजकूर- हे शक्य झाले तर आणखीच मस्त.

रूनी, हबा देखील त्याच क्षेत्रात आहे. Happy

मला काही काम दिल्यास मी नक्की करेन.

वरील पत्रकातील फक्त आपली मागणी असणारा चार ओळींचा भागच घ्यायचा आहे. मैत्र चा लोगो, संपर्क आणि नाव. त्यामुळे २ फुट रुंदी ३ फुट ऊंची भरपूर होइल. मंडळांच्या सोयिचेही होइल.

चांगली कल्पना तर आहेच. पण केवळ गणेशोत्सवापर्यंत वाट पहायची? इतर काही कल्पना (ही कल्पना राबवण्यासाठी) नाहीत का?

कसा रिस्पॉन्स आहे? काय नि कुठे नि कसे काम चालले आहे? "माझ्या परिसरात कसे काम करता येईल" याबद्दल काही ठरले आहे काय?