ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता यावी म्हणून जगभर गुलाबी रिबीनीची चळवळ सुरु झाली आणि जगभरच्या स्त्रियांना त्या उपक्रमानं एकत्र आणलं. पुरुषांच्याही स्वास्थ्याबद्दल असं काही असावं, पुरुषांमधे त्याबद्दल जागरुकता यावी म्हणून १९९९ मधे ऑस्ट्रेलियात या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रोस्टेट कॅन्सर आणि डीप्रेशन यासाठी मुख्यत: ही चळवळ होती. २०१० मधे टेस्टीक्युलर कॅन्सरशी निगडित उपक्रमाला यात सामावून घेऊन पुरुषस्वास्थ्याबद्दल सर्वांगीण विचार करणारी चळवळ असं त्याचं रुप बदललं.
मिशा + नोव्हेंबर = मोव्हेंबर (Moustache + November = Movember)
या चळवळीचं मुख्य प्रकट रूप म्हणजे दरवर्षी लाखो पुरुष नोव्हेंबर महिन्यात मिशा वाढवतात. १ तारखेला पूर्ण सफाचट करायची आणि ३० तारखेपर्यंत मिशा वाढू द्यायच्या. यामागचा उद्देश म्हणजे अशा मिशा या उपक्रमाच्या चालता बोलता जाहिरात फलक बनतील आणि त्या योगाने पुरुषांमधे आरोग्याबद्दल जागरूकता येईल.
What is Movember?
Movember is the month formerly known as November, where men and women across the globe join together to raise awareness and funds for men’s health issues. Men grow a Mo (moustache) for 30 days to become a walking, talking billboards, for our men’s health causes - specifically cancers affecting men.
Men who support Movember, called Mo Bros, start by registering at Movember.com. Mo Bros start Movember 1st clean-shaven, then grow and groom their Mo, for the rest of the month, raising money along the way. Women who support Movember, called Mo Sistas, also start by registering at Movember.com. Mo Sistas champion the Mo by supporting their Mo Bros, organizing events, leading a team and spreading the important message of men’s health.
अधिक माहिती http://www.movember.com वर मिळेल. ही साईट त्या त्या देशाच्या Movember उपक्रमाची जागरूकता करणार्या संस्थळावर नेते त्यामुळे प्रत्येक देशात थोडाफार बदल दिसेल. त्या त्या देशात ही संस्था सेवाभावी संस्था म्हणून कायदेशीर रित्या नोंदणीकृत आहे.
अमेरिकेतल्या उपक्रमांबद्दल इथे माहिती मिळेल.
http://us.movember.com/about/
http://us.movember.com/faq/
वेगवेगळ्या संशोधनावरून असं निष्पन्न झालंय की पुरुष खालील कारणांसाठी डॉ़क्टरकडे जाण्याचं टाळतात.
- नंतर हॉस्पीटल मधे जावे लागेल अशी भिती वाटते
- स्वतःच्या प्रकृतीबद्दल बोलणं लाजेचं आणि कमीपणाचं समजतात
- व्यवसायातल्या व्यस्ततेमुळे खरोखरच जायला वेळ नसतो
- आळशीपणा
आज सरासरी पुरुषांचं आयुर्मान स्त्रियांपेक्षा कमी आहे. अमेरिकेतल्या आकडेवारीनुसार दर ६ पैकी १ माणसाला प्रॉस्टेट कॅन्सर होतो. जागतिक पातळीवर आत्महत्या करणार्या पुरुषांची संख्या , स्त्रीयांच्या चौपट आहे.
आपण प्रत्येक जण या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. तुमच्या गावातल्या उपक्रमात तुम्ही सहभागी होणार असाल तर त्याबद्दल माहिती तुम्ही इथे देऊ शकता. किंवा अगदी वैयक्तिक पातळीवर स्वतःपुरता मिशी वाढवून पाठींबा देऊ शकता.
Grow your Mo and help save a Bro !
अतिशय चांगला उपक्रम इथे
अतिशय चांगला उपक्रम इथे माहिती दिलीत हे मस्त केलंत. माझ्या कंपनीत मागच्या वर्षी पासून हा उपक्रम सुरु केलाय.
भाग घेणार्या प्रत्येक पुरुषाला १० स्पॉन्सर मिळवावे लागतात. ३० नोवेंबरला ज्याच्या मिशा जास्त भरघोस दिसतील त्याला बक्षिस वगैरे असते.
माझ्या माहितीत अॅक्सेंचर मधे पण हा उपक्रम राबवला जातो.
मस्त उपक्रम. माझे सर्व
मस्त उपक्रम. माझे सर्व एंप्लॉयीज वेगवेगळ्या वयोगटातील पुरुश आहेत. मी त्यांना नेहमी तब्येतीची काळजी घेण्यास सांगत असते. हा मिशी उपक्रम राबवता येइल.
कायम 'मो' असणार्यांनी काय
कायम 'मो' असणार्यांनी काय करायचे ?
विनोद सोडला तर इथे पण दर वर्षी नोव्हेंबर मध्ये हा उपक्रम राबवणारे पाहिले आहेत.
इथे ऑस्ट्रेलियातही हा उपक्रम
इथे ऑस्ट्रेलियातही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जातो. माझ्या ऑफिसातलेही काही पुरूष दर वर्षी यात सहभाग घेतात.
या महिन्यात दाढी-मिशा वाढवुन त्याला काहितरी शेप द्यायचा, रंगवायच्या असले उद्योग करणारे पण आहेत काही महाभाग
मिलींदा, कायम 'मो'
मिलींदा, कायम 'मो' असणार्यांनी 'मो'क्याचा फायदा घ्यायचा आणि मो ला 'मो'काट वाढु द्यायची...ट्रीम करायच्या भानगडीत पडायच नाही
नोव्हेम्बर सम्पला की मग त्यावर 'मो'वर फिरवायचा आणि 'मो'काट 'मो' पासुन 'मो'क्ष मिळवायचा 
याबद्दल माहितच
याबद्दल माहितच नव्हते.
धन्यवाद अजय.
याबद्दल माहीत नव्हते. चांगला
याबद्दल माहीत नव्हते. चांगला उपक्रम!
लाजो
ह्याबद्दल माहीत नव्हते.
ह्याबद्दल माहीत नव्हते. धन्यवाद अजय.
लाजो,
मलाही ही संकल्पना माहित
मलाही ही संकल्पना माहित नव्हती. भारतात अजून फारसा प्रचार झाला नाहीये बहुतेक. धन्यवाद अजय.
लाजो ... सह्हीच!
आज रमादान संपणार.
आज रमादान संपणार.
संपला बुवा आमचा मोव्हेंबर!
संपला बुवा आमचा मोव्हेंबर!
काहिच माहिती नव्हती पुर्वी..
काहिच माहिती नव्हती पुर्वी.. चांगला लेख.. ज्ञानात भर पडली..
> संपला बुवा आमचा
> संपला बुवा आमचा मोव्हेंबर!
हो ना, स्वतःकडे आणि स्वतः सारख्या इतरांकडे पाहुन 'हा कोण नवा प्राणी' असे विचारावे लागणार नाही.
म्हणजे उद्या सकाळपासुन. अजुन पुर्ण नाही संपलेला.
मिशी वाढवण्याचा आणि
मिशी वाढवण्याचा आणि पुरूषस्वास्थ्याचा संबंध काही लक्षात आला नाही.
गुलाबी रिबीन, फेसबुक स्टेटसमधे अंतर्वस्त्रांचा रंग टाकणे, मिशा वाढवणे, एखाद्या महिन्याचे नाव वेगळ्या प्रकारे उच्चारणे वगैरे प्रकारांनी नेमकी किती आरोग्यविषयक जागृती होते, याचेही कधीतरी ऑडिट झाले पाहिजे. 'त्यांनी' काहीतरी खूळ काढायचे आणि सगळ्यांनी त्याला उचलून धरायचे यात काही अर्थ दिसत नाही.
सदासर्वदा मुछमुन्डा,
ज्ञानेश.
आमचा पण संपला. माझा पहिला
आमचा पण संपला. माझा पहिला मोव्हेंबर.
मला ९९.९९% लोकांचा खूप चांगला अनुभव आला आणि मी काहीतरी चांगले करतो आहे असे स्त्री-पुरुष दोघांनीही बोलून दाखवले. मोव्हेंबर फाऊण्डेशनसाठी आर्थिक मदत करणार्या पुरुषांबरोबर स्त्रीयाही होत्या. पण एक अनुभव आला आणि झोपलेल्या माणसाला एकदम खाडकन थप्पड मारून उठवल्यावर कसे वाटेल तसे वाटले.
आमच्या ऑफीसमधे मोव्हेंबरचं वातावरण. त्या उत्साहात मी प्रोस्टेट कॅन्सर शी संबधीत पोस्टर लावत हिंडत होतो. ऑफीसजवळच्या जीम मधे मोठे फलक आहेत. तिथे एका ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती करणारे पोस्टर पाहिले होते आणि त्याच्या शेजारची जागा मोकळी होती. एक गोरी तिथली मॅनेजर आहे. संभाषण ईंग्रजीत झाले.
"नमस्कार मी अमुक , इथला सभासद आहे."
"नमस्कार, मी काय मदत करू?"
"तुम्ही मोव्हेंबरबद्दल ऐकले आहे का?"
"हो माहिती आहे. पुरुषांच्या स्वास्थ्याबद्दल प्रचार करण्यासाठी.."
"बरोबर. म्हणूनच हे प्रोस्टेट कॅन्सर बद्दलचं पोस्टर लावायचं आहे. इथे पुरुषांनी नियमीत व्यायाम करावा असंही लिहलं आहे."
"नाही लावायच."
"सॉरी? !!"
"तुम्ही बरोबर ऐकलं. हे पोस्टर लावायचं नाही."
"का? ब्रेस्ट कॅन्सरचं पोस्टर तुम्हाला चालतं. तर प्रोस्टेट कॅन्सरचं का नाही?"
"मी म्हणते म्हणून".
"मी तुमच्या वरिष्टांशी बोलू शकतो का?"
"नाही आणि मीच इथली सगळ्यात वरिष्ट आहे. काहीही झालं तरी हे पोस्टर लावायचं नाही".
" का तुम्हाला या पोस्टर बद्दल काही अडचण आहे का? काही बदलायला हवं आहे का?"
" मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही !".
म्हटलं, जर इतका विरोध कूठलंही कारण न देता होत आहे, म्हणजे नक्कीच मी काहीतरी चांगलं काम करत असणार.
चमत्कारीकच बया दिसतेय! मला
चमत्कारीकच बया दिसतेय!
मला अनेकांनी विचारले व त्यांना पहिल्यांदाच मोव्हेंबर बद्दल कळले.
मिशा (खास करुन जर नेहमी ठेवत नसाल तर) जाहिरातीचे चांगले माध्यम आहे. तुम्हाला आवडत नसतील तर महिनाभर (का होईना) थोडेसे वेड्यासारखे दिसल्याने काही फरक पडत नाही हे ही कळते.
अहो ऐकलं का, नोव्हेंबर
अहो ऐकलं का, नोव्हेंबर सुरू व्हायला एकच आठवडा उरला आहे. काही मिशाळ उपक्रम होणार आहेत का?
आपल्याकडे पोलिओबद्दल चांगली
आपल्याकडे पोलिओबद्दल चांगली जनजागृती होते. देवीचा रोग किंवा इतर रोगांबद्दलही जनजागृती होत. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल ब-यापैकी जागृती होते आहे. पण इतर ठिकाणी असलेल्या थीम इथे यशस्वी झालेल्या नाहीत. पारंपारीक पद्धतीने (पोस्टर्स, निरनिराळ्या मेडीयातल्या जाहीराती, टीव्ही रेडीओवरच्या मोहीमा, इ.) चांगली जनजागृती झाली आहे.
त्यासाठीच इथे मिशा राखणे वगैरे पटत नाही. त्याला सर्वच पातळ्यांवरून कँपेनिंगची जोड असायला हवी. नाहीतर कशासाठी मिशा काढल्या आणि वाढवल्या हे कुणाच्या लक्षात देखीलयायचं नाही. कधीच मिशा न ठेवणा-याने मिशा ठेवल्या तर कदाचित त्याला विचारलं जाईल. पण त्याने दिलेलं उत्तर हे हसण्यावारी नेलं जाईल ही भीती वाटते.
याबद्दल माहीत नव्हते. चांगला
याबद्दल माहीत नव्हते. चांगला उपक्रम!
धन्यवाद अजय.
ह्यावेळी केले का कोणी
ह्यावेळी केले का कोणी मोव्हेंबर?
आमच्या इथे पण ग्रो अ मो सेव्ह
आमच्या इथे पण ग्रो अ मो सेव्ह अ ब्रो असं मेल आलं होतं.बरेच ब्रो अश्या मेल्स ला ऑटो रुटिंग स्पॅम रुल लावत असल्याने त्यांना ही माहितीच नव्हती.मागाच्याच्या मागच्या वर्षी पुरुष दिवस साजरा केला होता.त्यात लाफटर थेरपी चा लाफ रायो(य)टस नामक एक छळवादी कार्यक्रम खास पुरुषांसाठी ठेवला होता, त्याचा अनुभव घेतल्यावर बर्याच भिडूनी पुढच्या वर्षी आम्हाला स्पेशल दिवस नको म्हणून विनंती केली होती.
प्रोटेस्ट कॅन्सर बद्दल जागृती, तसेच एचपीव्ही कॅन्सर पुरुषांना पण होतो हे सांगणे गरजेचे आहे.
२०१५-१६ मध्ये मुंबईत तरी
२०१५-१६ मध्ये मुंबईत तरी मोव्हेंबर बद्दल लोकांना माहित होते. काही ऑफिसेस वगैरेमध्ये मिश्या-दाढी मुद्दाम वाढवलेले काही पुरुष दिसत. एखादा इव्हेंट वगैरे. मग ते संपले समहाऊ.
गेले ३-४ वर्ष मोव्हेंबर बद्दल कुठेच चर्चा नाही, त्याऐवजी यंगस्टर पब्लिक NNN वरचे चावट मिम्स बनवण्यात जास्त बिझी
बरं, सध्या पंचविशीच्या कुठल्याही फ्याशनेबल तरुणाला फेशियल हेअर मँडेटरी असल्याने मोव्हेंबर ऑर रेस्ट ऑफ द इयर सारखेच !