कॅन्सर

जराही घाबरू नकोस - भाग २

Submitted by आनन्दिनी on 27 January, 2017 - 05:56

मुलांचे हाल बघून मानवी आईवडीलसुद्धा कळवळतात. बापू , नंदाई तर साक्षात परमेश्वर. ते आपल्या लेकराला किती वेळ दुःखात राहू देतील. रात्री मी झोपले आणि स्वप्नात बापू आणि नंदाई !! स्वप्नातही हे गाठीचं संकट मी विसरले नव्हते. मी नेहमी बापू बापू करत असते. पण त्या दिवशी स्वप्नात मात्र मी जाऊन नंदाईच्या पायांना घट्ट मिठी मारली. मी जागेपणी जे म्हटलं होतं की "मला आई इथे हवी आहे" त्यामुळेच असावं असं मला वाटतं . तर मी आईचे पाय घट्ट धरून विचारलं "आई मी घाबरू नको ना?" आणि नंदाईने अगदी firmly सांगितलं "जराही घाबरू नकोस"

शब्दखुणा: 

जराही घाबरू नकोस - भाग १

Submitted by आनन्दिनी on 27 January, 2017 - 05:52

हा लेख किंवा कथा नाहीच, हा माझा अनुभव आहे जो इथे share करतेय. नोव्हेंबर २०१६ मध्ये आमच्यावर एक संकटच आलं होतं , साधारण अडीच महिन्यांपूर्वी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या छातीत एक गाठ आली. मी स्वतः डॉक्टर आहे पण स्वतःची गाठ हाताला लागल्यावर माझ्या पोटात गोळाच आला. मी राकेश- माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला गाठ लागतेय. लगेच आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. योगायोग म्हणजे ९ तारखेला माझा वाढदिवस असतो, त्याच दिवसाची अपॉइंटमेंट मिळाली.

शब्दखुणा: 

कॅन्सर तज्ञांबद्दल माहिती

Submitted by चना@12 on 23 July, 2013 - 12:45

नमस्कार माबोकर्स!

मला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे Sad

घरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये

काकांना आधीच माईल्ड हार्ट अ‍ॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..

कॅन्सरचा अनुभव - एक कविता

Submitted by अमितकरकरे on 26 April, 2013 - 01:19

ब्रेस्ट-कॅन्सरचे निदान ऐकून मनात येणाऱ्या भावनांचे हे विविध टप्पे...
...प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवलेले.

काल होते नीट, आज गमावला सूर;
भासू लागे सारे मला, धूसर धूसर
काय केला गुन्हा, आला आजार हा भाळी;
माझीयाच घरा लागे नजर का माझी ?
गमावले सुख, सारे एकाच क्षणात;
रीती झाली संध्याकाळ, तनात-मनात
मनी वाटे, सांगू नये कोणालाही काही;
आपलेच भोग, मन एकटेच साही
काढले चिमटे, तरी दु:स्वप्न तुटेना;
सैरभैर मन, कशामधेही रमेना
सख्या येती भेटायाला, सांगती अनुभव;
कोठल्या, कोणाची, एक तरी आठवण
बोलता सांगता, फेरा इतरांचा कळे;
घरटी एक माता याच्या आगीमधे जळे
एकाकी सोसले काही जणींनी हे दु:ख;

विषय: 
शब्दखुणा: 

कॅन्सर

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 01:05

ब्रेस्ट-कॅन्सरचे निदान ऐकून मनात येणाऱ्या भावनांचे हे विविध टप्पे...
...प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवलेले.

काल होते नीट, आज गमावला सूर;
भासू लागे सारे मला, धूसर धूसर
काय केला गुन्हा, आला आजार हा भाळी;
माझीयाच घरा लागे नजर का माझी ?
गमावले सुख, सारे एकाच क्षणात;
रीती झाली संध्याकाळ, तनात-मनात
मनी वाटे, सांगू नये कोणालाही काही;
आपलेच भोग, मन एकटेच साही
काढले चिमटे, तरी दु:स्वप्न तुटेना;
सैरभैर मन, कशामधेही रमेना
सख्या येती भेटायाला, सांगती अनुभव;
कोठल्या, कोणाची, एक तरी आठवण
बोलता सांगता, फेरा इतरांचा कळे;
घरटी एक माता याच्या आगीमधे जळे

शब्दखुणा: 

कॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज

Submitted by स्वाती२ on 24 September, 2011 - 11:26

माझ्या नवर्‍याच्या प्लॅन्टमधे काम करणारा एक कामगार शेवटच्या स्टेजचा थायरॉईड कॅन्सर रुग्ण आहे. त्याच्या १४-१६ वयोगटातील मुलांसाठी आणि पत्नीसाठी केअर पॅकेज पाठवायचे आहे. तेव्हा काय गोष्टी द्याव्यात? तसेच रुग्णासाठी काय द्यावे?

विषय: 
Subscribe to RSS - कॅन्सर