आरोग्य

इंटरनेट हे व्यसन आहे का ?

Submitted by असो on 17 February, 2012 - 19:05

इंटरनेटचे व्यसन असू शकते का ? असल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? आऱोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का ?

हे व्यसन कसं सोडवता येतं ?

अमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा?

Submitted by dhaaraa on 16 February, 2012 - 23:16

तसा हा प्रश्न आमच्यासाठी बराच जुना आहे. (एरवी 'मराठी लोकांचं हिंदी'सारखा टीपी करण्याचा विषय, पण यावेळी गंभीरपणे विचारतेय.)

अन्नभेसळ, अन्नसुरक्षा आणि आपण

Submitted by चंपक on 12 January, 2012 - 04:15

नुकताच मी खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय सुरु केला ! (त्याची निगडी प्राधिकरणात शाखा पण आहे!:)) खरे तर अपघातानेच. माझा एक मित्र एम. एस्सी. नंतर ग्लेनमार्क कंपनी मध्ये संशोधक म्हणुन नोकरी करत होता. पण ५ वर्षांचा नोकरी नंतर त्याला रुटीन कामाचा कंटाळा आल्याने तो नोकरी सोडुन गावी शेती करु लागला. मी भारतात परतल्यावर त्याची भेट घेतली तेंव्हा त्याने "नैसर्गिक्-सेंद्रिय शेती" (सेंद्रिय अन्न म्हणजे इंग्रजीत ऑर्गॅनिक फुड) बद्दल सांगितले. तो अन त्याचे सोबतचे शेतकरी असे जवळपास ३०० शेतकरी एका अध्यात्मिक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यांना पुरक म्हणुन श्री.

विषय: 

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 January, 2012 - 11:16

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.

१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे

कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?

टीन एजर्स आणि एस टी डी

Submitted by स्वाती२ on 29 December, 2011 - 08:05

नमस्कार मंडळी.
गेल्या महिन्यात माझ्या मुलाच्या टीमने टीन एजर्स आणि एसटीडी या विषयावर वाय प्रेस साठी स्टोरी केली. इंडियानापोलिस स्टार या न्युज पेपरच्या ब्लॉग मधे ही स्टोरी उपलब्ध आहे
http://blogs.indystar.com/ypress/2011/12/17/in-battle-against-stds-denia...

तसेच वाय प्रेस च्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. http://www.ypress.org/news/in_battle_against_stds_denial_is_the_enemy

विषय: 

ऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे

Submitted by नरेंद्र गोळे on 23 December, 2011 - 23:42

प्रारण संवेदक उपकरणे१ मुख्यतः दोन प्रकारची असतात.

१. दर-मापक उपकरणे आणि
२. व्यक्तिगत मात्रा-मापक उपकरणे.

ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल

Submitted by नरेंद्र गोळे on 22 December, 2011 - 05:07

किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्‍या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्‍यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते.

१. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन
२. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन

रक्तदाब मोजण्याचं यंत्र : माहिती हवी आहे

Submitted by गजानन on 21 December, 2011 - 07:08

नमस्कार,

मला रक्तदाब मोजण्यासाठी घरगुती डिजिटल यंत्र घ्यायचं आहं. फ्लिपकार्टवर बरेच पर्याय दिसले. कोणत्या कंपनीचं यंत्र अचूक वाचन दाखवणारं आणि टिकाऊ असते, याची कृपया माहिती द्या. धन्यवाद.

विषय: 

ऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन

Submitted by नरेंद्र गोळे on 21 December, 2011 - 06:23

जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.

ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार

Submitted by नरेंद्र गोळे on 16 December, 2011 - 00:22

किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.

१. घरेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.

२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य