लोकहो,
त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.
सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.
स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००
०७०० :
माझी मुलगी ११ वर्षांची आहे... आणि मे मध्येच तिचे पिरियडस सुरु झाले.... बरं झाले तर झाले ते फारच अनियमित आहेत... दर ८ .. १५ दिवसला येतात... आयु. औषधे चालु केली आहेत.. २ महिने झालेत... पण एलोपथी डॉ. म्हण्तात.. काहीच गरज नाही औषधांची... सुरुवात ही अशीच असते... पण ती ( माझ्यामते) फारच लहान आहे ... आणि ह्या अनियमितपणाला अगदिच कंटाळली आहे...तिला समजावुन सांगता माझी नाके नउ येत आहे...
काय करावे समजत नाहीये... ह्यातुन काय मार्ग काढावा.. आयु औषधे चालु ठेवावि का एलोपथी घ्यावे.... पण मग साइड इफेक्ट ची भिती वाट्ते... अजुन फारच लहान आहे ती हे सगळं सहन करण्यासाठी 
प्रवासातला पेशंट
प्रवासात मला पुस्तक वाचत बसणं, किंवा मोबाईलशी खेळत बसणं अजिबात आवडत नाही. मी मनुष्यवेडा माणुस आहे. त्यामुळे मला विमान प्रवासापेक्षा रेल्वे किंवा बस प्रवास आवडतो. एका विमान प्रवासात जलाल आगा माझ्या शेजारच्या सीट्वर होता. (हो, तोच तो! "शोले" मधे त्याच्यावर "मेहेबूबा ओ मेहेबूबा" हे गाणं चित्रीत झालंय !) पण दोन तासाच्या प्रवासात गडी एका वाक्यानंही माझ्याशी बोलला नाही ! मी प्रयत्न करून सुद्धा. त्यामुळे विमान प्रवासात मला मजा येत नाही.
नमस्कार माबोकर्स!
मला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे 
घरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये
काकांना आधीच माईल्ड हार्ट अॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..
'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल 
माझे उजवे पाऊल एप्रिल पासून दुखत होते . मेमध्ये दुखायचे थांबले. म्हणून दुर्लक्ष केले. आता पुन्हा १५ दिवस हा त्रास चालू झाला. युरीक अॅसिड ५.९ झाले आहे. फिजिशियन म्हणतात हे नॉर्मल आहे आणि ऑर्थोपेडिक म्हणतात बायकांच्या मानाने हे जास्त आहे. ही गाऊटची सुरुवात आहे असंही म्हणाले.प्रोटिनयुक्त पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहे. यावर कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
दु:ख, वेदना यांचा अनुभव केवळ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमूळेच येत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा Loss आणि त्यामूळे होणारा त्रास किंवा दु:ख आपल्याला होत असते. मात्र त्याकडे Loss असं म्हणून बघितले जात नाही. मनाला उदास वाटणे, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, मनाला न करमणे, चिडचिड यासारखी भावनिक आंदोलने किंवा स्थिती आपण अनुभवतो पण त्याखाली आपल्यासाठी महत्वाची असणारी कुठली तरी गोष्ट आपण गमावलेली असू शकते.
अशा कोणकोणत्या गोष्टी असतात? ज्याने आपल्याला वरील प्रकारच्या भावनांना सामोरे जावे लागते?
मागच्या वर्षी कॅनडा मध्ये क्युबेक राज्यात एका मोठ्या university मध्ये मी (engineering )research intern होतो तेंव्हाची गोष्ट. एकदा देवाच्या कृपेने त्या दिवसाचे experiments लवकर उरकले आणि मी घरी येउन, जर फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या (झकास ) हवेत फेर-फटका मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. अथांग पसरलेल्या हिरवळीतून नागमोडी गेलेल्या पायवाटेवरून मी चालत होतो. बाजूला काही ठराविक अंतराने बेंचेस होती आणि त्यावर काही तरुण तर काही आजूबाजूचे (फिरायला आलेले )वृध्द गप्पा मारत बसले होते. माझ्या समोरुन एक भारतीय मुलगा ( किंवा रंगावरून पाकिस्तानी असावा ) हातात काहीतरी खात खात चालत होता.
केशरोपण करायचे आहे.हि शस्त्र क्रिया कशि करतात. त्यास किती पर्यंत खर्च येवू शकतो . म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काढण्याचा उद्देश्/हेतु आहे.
ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया ह्याबाबत माहिती द्यावी.