आरोग्य

युरीक अ‍ॅसिड कमी करण्याविषयी

Submitted by स्वप्ना_तुषार on 22 July, 2013 - 06:34

माझे उजवे पाऊल एप्रिल पासून दुखत होते . मेमध्ये दुखायचे थांबले. म्हणून दुर्लक्ष केले. आता पुन्हा १५ दिवस हा त्रास चालू झाला. युरीक अ‍ॅसिड ५.९ झाले आहे. फिजिशियन म्हणतात हे नॉर्मल आहे आणि ऑर्थोपेडिक म्हणतात बायकांच्या मानाने हे जास्त आहे. ही गाऊटची सुरुवात आहे असंही म्हणाले.प्रोटिनयुक्त पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहे. यावर कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

विषय: 

जगातल्या लोकांच्या पसंतीचा आहार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 21 July, 2013 - 12:03

जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.

मुले व त्यांच्यात दिसणारी 'Loss' ची भावना..

Submitted by सीमा गायकवाड on 20 July, 2013 - 04:30

दु:ख, वेदना यांचा अनुभव केवळ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमूळेच येत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा Loss आणि त्यामूळे होणारा त्रास किंवा दु:ख आपल्याला होत असते. मात्र त्याकडे Loss असं म्हणून बघितले जात नाही. मनाला उदास वाटणे, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, मनाला न करमणे, चिडचिड यासारखी भावनिक आंदोलने किंवा स्थिती आपण अनुभवतो पण त्याखाली आपल्यासाठी महत्वाची असणारी कुठली तरी गोष्ट आपण गमावलेली असू शकते.

अशा कोणकोणत्या गोष्टी असतात? ज्याने आपल्याला वरील प्रकारच्या भावनांना सामोरे जावे लागते?

विषय: 

"civic sense"

Submitted by Omkar Deshmukh on 20 July, 2013 - 01:13

मागच्या वर्षी कॅनडा मध्ये क्युबेक राज्यात एका मोठ्या university मध्ये मी (engineering )research intern होतो तेंव्हाची गोष्ट. एकदा देवाच्या कृपेने त्या दिवसाचे experiments लवकर उरकले आणि मी घरी येउन, जर फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या (झकास ) हवेत फेर-फटका मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. अथांग पसरलेल्या हिरवळीतून नागमोडी गेलेल्या पायवाटेवरून मी चालत होतो. बाजूला काही ठराविक अंतराने बेंचेस होती आणि त्यावर काही तरुण तर काही आजूबाजूचे (फिरायला आलेले )वृध्द गप्पा मारत बसले होते. माझ्या समोरुन एक भारतीय मुलगा ( किंवा रंगावरून पाकिस्तानी असावा ) हातात काहीतरी खात खात चालत होता.

विषय: 

केशरोपण

Submitted by धडाकेबाज on 19 July, 2013 - 09:45

केशरोपण करायचे आहे.हि शस्त्र क्रिया कशि करतात. त्यास किती पर्यंत खर्च येवू शकतो . म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काढण्याचा उद्देश्/हेतु आहे.
ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया ह्याबाबत माहिती द्यावी.

विषय: 

अदृष्य भिंत ......

Submitted by डॉ अशोक on 16 July, 2013 - 01:42

अदृष्य भिंत ......

सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात काम करणा-यांना संसर्गजन्य रोगाच्या साथीचं इन्वेस्टीगेशन करणं म्हणजे काय आव्हान आहे हे माहित असतं. मला माझ्या ३०-३५ वर्षांच्या सर्व्हीस मधे असे प्रसंग अनेकदा आले. पेशंटच्या एखाद्या दुर्मिळ रोगाचं निदान आणि एखाद्या साथीचं निदान यात साम्य एकच आहे आणि ते म्हणजे यातून मिळणारं समाधान. यातल्या एका साथीचा किस्सा सांगण्यासारखा आहे.

टक्कल पडने एक समश्या-उपाय

Submitted by राह on 15 July, 2013 - 01:58

अनुवाशिकतेने टक्कल पडने हि एक मोथि समश्या होत चाललि आहे.साधारण वयाच्या २० ते २२ पासन अनेकान्ना अनुवाशिकतेने टक्कल पड्न्यास सुरुवात होते.ईथे हेअर ट्रान्सप्लान्ट सोडून चर्चा करने.उपाय सुचवने.
म्हनुन सदर विशयावर व्यापक चर्चा करने गरजे चे आहे

केरळी आयुर्वेदिक उपचार

Submitted by Omkar Deshmukh on 13 July, 2013 - 15:15

केरळ मध्ये अनेक ठिकाणी आयुर्वेदिक पंचकर्म केंद्रे / निसर्गोपचार /मसाज सेंटर इत्यादि व्यवसाय जोरात आहे.

ते कितपत विश्वासार्ह आणि उपयुक्त आहेत ?

जाहिरातबाजी भरपूर आणि रेट सुद्धा फार...जवळपास 3000 रुपये प्रतिदिनं

याविषयी कोणाला काही माहिती /अनुभव आहेत का?

काही निवडक चांगल्या केंद्रांची नावे कळतील का?

सीताराम आयुर्वेदिक हॉस्पिटल ,त्रिचुर THRISSUR ह्या विषयी काय अनुभव आहेत?

चला सुखी होऊया…

Submitted by Omkar Deshmukh on 13 July, 2013 - 15:02

१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!

विषय: 

पुस्तक परिचय : " पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत" ( डॉ. ह.वि. सरदेसाई यांच्या अभिप्रायासह)

Submitted by शोभनाताई on 10 July, 2013 - 01:14

२४ मे रोजी आय. एम.ए.च्या संचेती हॉलमध्ये शेखर बर्वे यांच्या "पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत" या पुस्तकाच प्रकाशन झाल. प्रसिद्ध न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप दिवटे यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकाने मराठीतील शास्त्रीय विषयावरच्या लिखाणात मोलाची भर पडली आहे.आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉक्टर माया तुळपुळे यांनीही पुस्तकातील मुल्यांकन तक्ते, मानसिक आघातावरील प्रकरण आहारविहारावरील माहिती याचे विशेष कौतुक केले.
डॉक्टर ह.वि.सरदेसाई प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत.पण त्यानी आवर्जून पुस्तक प्रकाशनापूर्वी आपला अभिप्राय दिला पुस्तक परिचयाबरोबर तो ही येथे देत आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य