आज काय खाल्लं?

Submitted by अदिति on 22 July, 2013 - 19:38

'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल Happy
हा धागा पौष्टीक आहारासाठीच(डायट) आहे. माझ्या मते आहार पौष्टीक असला, योग्यप्रमाणात असला आणि ह्याला व्यायामाची जोड असली की वजन अपोआपच अवाक्यात राहाते. तर मित्रांनो ह्या धाग्यावर आज काय खाल्लं अन ते तुम्हाला बॅलन्स्ड वाटल का , नसेल तर तसे होण्यासाठी काय बदल करता आले असते हे लिहुयात. आणिहो इतरांच्या मेन्युवर तुमची मतही मांडा .. त्या निम्मीत्याने हेल्दी पाककृतींची चर्चाही करता येइल. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोला Proud

आज काय खल्लं असं विचारायच्या ऐवजी.... आज तोंडावर ताबा कसा ठेवला.... असं विचारायला हवं.... Wink

त्यापेक्षा उद्या काय खाणार असा हवा आहे धागा..

कारण बहुतांशी आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्या भाज्या कडधान्ये वापरुन घरोघरीच्या अन्नपूर्णा ( म्हणजे आपण पण आलो त्यात Wink स्वयंपा़क करतात.. त्यातच काहीकाही वेगवेगळे आवडीनुसार बनवतात... पण रोजच्या रोज किती
कॅल्शियम. किती आयर्न.. सर्वात महत्वाचे प्रोटिन वगैरे वगैरे याची मोजदाद करायला वेळ देता येत नाही खरं म्हणजे...

तेंव्हा उद्या काय खाणार आहात त्याची यादी पोस्त करावी इथे..
म्हणजे सगळ्या माबोकरांना एक्मेकांच्या घरचे उद्याचे मेनू माहित होतील आणि कुणाच्या घरी उद्या जायचं हे ठरवता येईल Proud

गमतीचा भाग सोडला तर मी वरची पोस्ट मनापासून लिहिलीये बरकां !

मला आवडेल वाचायला..:)

मलाही शीर्षक वाचुन असंच वाट्लं.. आज काय मस्त, चमचमीत खाल्लं हेच लिहायच Happy
के अंजली +१ ... लवकर मेन्यु सांगा Wink

आज तोंडावर ताबा कसा ठेवला.... असं विचारायला हवं>>> मग पोस्टी पडायच्याच नाहीत. Proud

बाकी खाणे हा आपल्या आवडीचा विषय..
त्यामुळे मी इथे असेनच... Happy

उद्याच प्लान करायला मला जमणार नाही. म्हणजे प्लान केलतरी त्याप्रमाणे होईलच अस नाही म्हणुन मी आजचच लिहीते. पण अंजली तुझी कल्पना चांगली आहे.
भाजी (गवाराची), पोळी, ब्रोकोली सालाड आणी जेवन झाल्यावर गोड म्हणुन चोबानीचे ब्लु बेरी ग्रीक योगर्ट. Happy

अरे? फोटो गायब? बाय द वे, ब्रोकोली सॅलड कडवट लागते का? कधी करुन नाही बघितल... भाजीच खाल्ली बरेचदा.

नाही विजय. ब्रोकोली raw असेल तर चांगली लागत नाही (मला तरी) पण blanch केले तर छान चव लागते. पाणी उकळवुन त्यात चवीला मीठ टाकायच आणी ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे १ मिनीट उकळायचे. मग पाणी गाळुन त्यात गार पाणी टाकायचे. तेही अर्धा एक मिनीटाने गाळुन घ्यायचे. मग लिंबु पिळुन त्यात टोमटो, काकडी, नट्स, कोवळी पालक टाकुन मस्त होत सालड. हव तर आवडणार ड्रेस्सिन्ग टाकु शकतोस. मी ओलीव्ह ओइल मधे रोझमेरी आणी लसुण ठेचुन टाकुन ठेवते कधीही कोणत्याही सालड मधे टाकायला बरे पडते.

करुन बघ.

आज काय खाल्लं?>> आता उपमा... लंच मध्ये पोळी आणी मोड आलेली मुगाची उसळ खाणार.

आज सकाळ पासुन
चहा पिला:)
टोम्याटो भात खाल्ला
आणि ज्युस[सफरचंद +केळ]

नाश्ता : गरम गूळ-तूप-पोळी, चहा
दुपारी ऑफिसातः २ पोळ्या, फरसबीची भाजी, (४ मैत्रिणींच्या ड्ब्यातल्या ४ भाज्या -- थोड्या थोड्या)

अदिती, नक्कीच करुन बघतो. इथे मुबलक मिळते ब्रोकोली.

काहीतरी आज भिववावं म्हणजे उद्यापर्यंत मोड येईलही... बघावं लागेल काय आहे ते Happy

मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये
(आज व्यायाम पण नाही केलाय Sad )

फक्त चहा प्यायलेय
ते पण दोन वेळा!

आता २ वाजता जाऊन बटाट्याची भाजी, पोळी, शेंगदाण्याची चटणी आणि अंगतपंगत साथीदारांनी डब्यात जे काही आणलं असेल ते थोडंस अस खाईन

गुळाचा शिरा >> म्हणजे ???>>>>>>>>>>>. नॉर्मल शिरा आपण साखर घालुन करतो ना?? तोच गुळ घालुन करायचा....खमंग लागतो....सुपर्ब

गुळाचा शिरा>>> कणीक आणि गुळ वापरुन करतात. खमंग लागतो मस्तपैकी!

आज पावभाजी! फ्लावर, बटाटा, फरसबी (की श्रा घे? Wink ), मटार, गाजर, टोमॅटो, कांदा, ढो मिरची. बटरवरच केली होती त्यामुळे नंतर पावाला बटर लावले नाही!

आवडला धागा....पण खर खर लिहावे ........ Happy

<<<<<<काल काय खाल्ले >> शिर्षक हवे.दिवसभराचा आहार संतुलित होता की नाही हे कळेल>>>>>अनुमोदन

सकाळी थालिपिठ ....इथे रोझे आहेत म्ह्णुन लन्च नाही.... Uhoh घरी जाउन पोळि भाजी ( फ बी ) सॅलड ...रत्रिच्या जेवणाला छाट...

<<<<<<काल काय खाल्ले >> शिर्षक हवे.दिवसभराचा आहार संतुलित होता की नाही हे कळेल>>>>> काल/ आज काय खाल्ल, उद्या काय खाणार, कधीच ही लिहीलं तरी चलेल Happy ह्या धाग्याचा मुख्य उद्देश आहे इथे लिहीण्याच्या निमीत्त्याने काय खाल्ल/खाणार हे पौष्टीक/चौरस आहे की नाही हे तपासुन पाहाणे.

असच एकदा डॉक्टरांशी ( ज्या वेट मॅनेजमेन्ट साठीही कन्सल्ट करते) बोलतांना त्यांनी आहार चौरस होण्यासाठी काही थम रुल्स सांगीतले होते. पोर्शन कन्ट्रोल हे त्यातील एक. जेवणाच्या मध्यम आकाराच्या ताटाचे ४ भाग करुन त्यातील १ भाग प्रोटीन, १ भाग कार्ब आणी २ भाग सालड/ग्रीन्स मुख्यता कच्चे अस एका वेळच जेवण असावं अस सांगीतल. हे कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना लागु पडायल हरकत नाही.

इथे लिहीतांना जर आजच्या(/कालच्या/उद्याच्या) जेवणातील प्रोटीन, कार्ब आणी सालड किती/कोणते हे जर लिहीले तर एकतर तुम्हालाही लिहीतांनाही काही राहीले तर लक्ष्यात येइल किंवा कोणीतरी पॉईट आउट तरी करेल. तसेच कदाचीत तुमच्या मेनु ने इतरांना प्रेरीत होता येईल Happy

हे सगळ करायला डेडीकेटेड साईट्स आहेत, अ‍ॅप्स आहेत पण मायबोली गंमतच वेगळीच आहे Happy

मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये << रिया सकाळचा नास्ता महत्वाचा Happy २ वाजेपर्यत पोटत काही नाही हे बरोबर नाही.

Pages