स्वर्णप्राश - आयुर्वेदिक औषध

Submitted by गजानन on 4 August, 2013 - 07:09

नमस्कार,

काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते. एक ते सहा या वयोगटातील मुलांना हे नियमितपणे (महिन्यातून तीन ते चार थेंब) दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, योग्य शारिरीक वाढ, स्मरणशक्ती वाढणे इ. अनेक फायदे सांगण्यात आले. त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिल्यावर शाळेत मुलांना हे दर महिन्याला देण्यात येईल. द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे. कोणाला याबाबत काही अनुभव आहे का? असल्यास कृपया इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन,
सोनं, चांदी हे धातू उत्तम अँटीमायक्रोबियल असले, तरी फक्त नॅनोरूपातच ते शरीरास हानीकारक नसतात, असं आजवरचं संशोधन आहे. सोन्याचांदीचे नॅनोकणही हानीकारक असतात, असा दावाही हल्ली केला जातो, पण अजून त्यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही. या सुवर्णभस्माबद्दल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काही वर्षांपूर्वी एक शास्त्रज्ञ संशोधन करत होत्या. त्यांच्याशी बोलून तुला सांगतो.

गजानन पारंपारीक आयुर्वेदीक औषधांवर संशोधन होणं खुप गरजेचं आहे.
मागच्या आठवड्यात माझ्या एका कलिगने आर्टिकल दाखवलं त्यात इंडिंयन स्पायसेस कँन्सरवर उपयोगी असल्याचं लिहिलं होतं , म्हणुन बघितलं तर ती हळद होती , त्याने मागतली म्हणुन त्याला दोन हळदीची पाकिटं आणुन दिली आणि कसं घेऊ शकतो हेही सांगितलं..

आम्ही माझ्या भाच्या आणि भाचीला देतोय. ते ११ महिन्यांचे आहेत.
३०० रुपये नोंदणी, १०० रुपये दर महिना.

वैद्य कानिटकरांनी सोने+ खारीक उगाळून द्यायला सांगितले होते.(मुलाचे वय ६ वर्षे होते.) सहाणीवर सोनेरी रेषा उठल्या होत्या . मात्र सुवर्णभस्म हे तज्ञांना विचारुन देण्यात यावे.वैद्य प.य. खडीवाले वैद्य यांनी लिहिल्याप्रमाणे सोने पेल्याभर पाण्यात टाकून पाणी अर्धा पेला होईपर्यंत उकळून ते मुलांना देण्यात यावे.

वर्षादेसाई,
हे दर जास्त वाटतात. अष्टांग आयुर्वेदमधेही (सप कॉलेजच्या जवळ) असते दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन, २५ कि ५० रुपये एवढेच घेतात.

जामोप्याच्या धाग्यावरले औस्।अध आणि यांचे औषध वेगळे वाटत आहे. त्यात नक्षत्राचा उल्लेखही आहे.

पण शळेमध्ये असे सरसकट कँप घेऊन कुठलेही आयुर्वेदिक औषध देता येते का?

पण शळेमध्ये असे सरसकट कँप घेऊन कुठलेही आयुर्वेदिक औषध देता येते का? >>>द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे

गजानन, या औषधाविषयी नाही माहीत पण दोन प्रकार बघितले आहेतः

१. लहान बाळांच्या गुटीमध्ये सोन्याचे २ वळसे (गुटी उगाळताना सहाणेवर सोने दोनदा फिरवणे) देतात (हे दोनच द्यायचे असतात. जास्त द्यायचे नसतात)
२. रात्रभर पाण्यामध्ये सोने ठेऊन सकाळी ते पाणी मुलांना प्यायला देतात.

दोन्ही प्रकारात काही विशेष फायदा झालेला मी तरी बघितला नाहीये. म्हणजे ती मुले इतर मुलांसारखीच आजारी वगैरे पडताना बघितली आहेत, त्यांच्यात काही विशेष प्राविण्य आलेले नाही. या प्रकारांचा तोटा पण काही जाणवला नाहीये अर्थात ती मुले अजून खूप लहानच आहेत म्हणा.

दुसरे एक स्वतःच्या बाबतीतले निरीक्षणः ससूतशेखर आणि सुवर्ण-सूतशेखर गोळ्या पित्तावर तितक्याच लागू पडतात मला. सुवर्ण-सूतशेखर अधिक प्रभावी आहेत असे मला तरी जाणवले नाही. पण पूर्वी जी सुवर्ण-सूतशेखरची मात्रा यायची ती मात्र खूप प्रभावी असायची.

टाय्टॅनियम प्लॅटिनम आयुर्वेद काळात ठाऊक होते की नाही ते माहीत नाही.
पण महाग धातू असल्याने नक्कीच काहीतरी औषधी गुण, नक्कीच असतील. हीरक भस्म देखिल असते म्हणे.

बुद्धी वाढविण्याचे एक औषध ऐकून आहे. एक ग्लास पाणी (ग्लास चांदीचा हवा. सोन्याचा चालेल) भरून त्यात हिरे ठेवून चतुर्दशीच्या चांदण्यात ते पाणी सुकवावे. एक तृत्यांश पाणी झाल्यावर पाणी काढून घेऊन ते स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. बाटलीचे बूच काचेचे हवे. (ग्लास व हिरे त्यांतील सत्व निघून गेल्याने आता निरुपयोगी असतात. ते डॉ. इब्लिस यांना दान करावे)
हे असे हिरकसिद्ध पाणी दररोज, चंद्रोदया आधी १२ मिनिटे, २ थेंब डाव्या नाकपुडीत टाकावे.
३ महिन्यांत बालकांची नाही वाढली तरी पालकांची बुद्धी नक्कीच वाढते असा अनुभव आहे.
(हिरकसिद्ध पाण्यासाठी वापरलेले ग्लास व खडे दान करणे म्यांडेटरी आहे)

मी माझ्या सध्या ११ महिन्याच्या असलेल्या मुलीला दर महिन्याला सुवर्ण भम्स देते. माझ्या एक आयुर्वेदीक फॅमिली डॉ. आहेत. त्या दरमहिन्याच्या गुरुपुष्यला हा डोस देतात.

मोठ्या मुलीला मी पाण्यात सोन्याची वस्तू टाकुन ते पाणी प्यायला द्यायचे.

<टाय्टॅनियम प्लॅटिनम आयुर्वेद काळात ठाऊक होते की नाही ते माहीत नाही.
पण महाग धातू असल्याने नक्कीच काहीतरी औषधी गुण, नक्कीच असतील. हीरक भस्म देखिल असते म्हणे>

इतरांचं माहीत नाही, पण निदान शास्त्रज्ञतरी संशोधन करताना एखादा धातू महाग आहे किंवा नाही, हा निकष लावत नाहीत. सोन्याचांदीच्या कणांचे औषधीगुण सिद्ध होऊन अनेक वर्षं लोटली आहेत.

चिनुक्स जी
कृपया लेख वाचा.

हे गूगलः
1,064 °C = Gold, Melting point

हे लेखात लिहिलेले आहे :
>>काल मुलीच्या शाळेत आयुर्वेदातल्या एका तज्ज्ञांचे व्याख्यान होते. त्यांनी स्वर्णप्राश या आयुर्वेदातल्या एका औषधाविषयी पालकांना पुढील माहिती दिली. शुद्ध सोने हे इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर १००० ते १५०० °C पर्यंत उकळले जाते. ही क्रिया दहा ते पंधरा वेळा केली जाते. असे केल्याने ते सोने आपल्या शरीरात १००% शोषण्यायोग्य होते. मग हे सुवर्णभस्म मध आणि गायीचे तूप यांत घालून स्वर्ण प्राश तयार केले जाते.<<

कोणती आयुर्वेदिक औषधे हजार प्लस डिग्री सेल्सियस या टेंपरेचरला टिकतात?
"औषधांबरोबर उकळले जाते" कशात?
केवळ शुद्ध सोने शरीरात घातल्याने हे सगळे गुण दिसतात. अन आम्ही सोन्याच्या नावाखाली खुश रहातो.

चिनुक्स यांच्या सारख्या संशोधक वृत्तीच्या माणसाकडून मला सेन्सिबल काऊंटर प्रतिसादाची अपेक्षा होती. हजार पंधराशे डिग्रीवर सोने इतर औषधांबरोबर उकळणे हा प्रकारच हास्यास्पद नाही वाटत तुम्हाला?

सोन्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल एक लेख येऊ द्या. आनंदाने वाचू.
जास्त मते मिळालीत तर एम यू एच एस आहेच! अन ते काय म्हणतात ते आयुष पण आहे सध्या जोरावर.

इब्लिस,
वरच्या लेखाचा इथे संबंध नाही. मुद्दा सुवर्णभस्म व त्याचे औषधी फायदे हा आहे. या लेखात ते औषध उच्च तापमानाला विकतात, असं कुठे लिहिलं आहे? इतक्या उच्च तापमानाला औषध देता / विकता येणार नाही, हे प्रत्येकाला कळतं.

केवळ सुवर्णभस्मच नव्हे, तर प्रवाळ, मोती यांच्या भस्मांवरही जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. अनेक विज्ञानपत्रिकांमध्ये त्यांवर पेपर येत असतात. या वस्तू महाग आहेत, म्हणून हे संशोधन सुरू झालेलं नाही.

तुमच्या प्रतिसादात तुम्ही सोनं आणि चांदी महाग आहेत, म्हणून औषध म्हणून वापरले जातात, असं लिहिलं आहे. सोन्याचांदीप्लॅटिनमचे नॅनोकण उलट हल्ली कॅंसरसाठीच्या उपचारांमध्ये ड्रग कॅरियर म्हणून वापरतात. गजानननं उल्लेखलेल्या सुवर्णभस्मावरही अनेक औषधकंपन्या काम करत आहेत.

<हजार पंधराशे डिग्रीवर सोने इतर औषधांबरोबर उकळणे हा प्रकारच हास्यास्पद नाही वाटत तुम्हाला?>

सोन्याचे नॅनोकण बनवण्यासाठी या तापमानाला धातू वितळवणं, ही एक सर्वमान्य पद्धत आहे. प्रयोगशाळांमध्ये हल्ली याचं सुधारित रूप असलेली लेझर अब्लेशन पद्धती वापरली जाते. औषध या तापमानाला उकळणं, याबद्दल मला माहीत नाही. पण माझा संबंध केवळ सुवर्णभस्मापुरता मर्यादित आहे, कारण सोन्याचे नॅनोकण हा माझ्या संशोधनाचा गेली अठरा वर्षं विषय आहे. हा धातू महाग असल्यानं मी हा विषय निवडलेला नाही.
बाकी टायटेनियम आणि टायटेनियम डायऑक्साइड यांचे नॅनोकणही औषध म्हणून आणि ड्रग कॅरियर म्हणून वापरता येतील का, यावर ढिगानं पेपर आहेत.

सत्तर-ऐशीच्या दशकात ठिकय पण अगदी आत्ताही लोकं असल्या भंपकपणाला फसतात याचं आश्चर्य वाटतं.

आपल्याकडे अनेक पिढ्यांपासून जनम घुट्टीत शुद्ध सोन्याची आंगठी उगाळून देतात, गाईचं तूप देतात, काय उजेड पडलाय? कसली किडकी आणि नासकी पैदास चालूच आहे. देश खड्ड्यात जातोयच आहे. या आयुर्वेद आणि तत्सम तंबूवाल्यांचं साला एक बरंय. एक कोणताही रोग घ्या आणि खणखणीत औषध सुचवा आणि इतर कसोट्यांनी बरा करून दाखवा. उगाच ज्याच्यावर अ‍ॅलॉपॅथीमध्ये औषध सापडलं नाहिये असा एड्स वगैरे किंवा मग उगाच स्मरणशक्ती, रोगप्रतिकारकशक्ती असलं काहितरी घ्यायचं.

देवा रे!
महोदय,
गोल्ड सॉल्ट्स संधिवातात वापरतात, हे ठाऊक नसले, तरी दातात देखिल सोने भरतात, व तो सोन्याचा औषधी गुण आहे, इतपत सामान्य माणसाला समजते.

तुमचे, 'नॅनॉपार्टिकल्स कसे तयार करतात' हे संशोधन चुकीचे नाही. पण त्याचा अन या असल्या आयुरवेदिक औषधाचा काय संबंध??

१५०० डिग्रीला इतर "औषधांसोबत उकळणे"?? चहा आहे तो? १५०० डिग्री कशाला म्हणतात? त्याने सोने शरीरात अ‍ॅब्सॉर्ब होणे सोपे होते?? रिअली??? वॉव!

कॅन्सर ड्र्गस साठी कॅरियर असणे अन स्वतः औषधी असणे यात फरक आहे का काही?? उद्या उठून कॅप्सुल बनविण्यासाठी जिलेटिन वापरतात म्हणून त्याच्या औषधी गुणांवर बोलू आपण. किंवा अ‍ॅल्युमिनियम रॅपर फॉइल्स बद्दल देखिल.

औषधांशी संबंधीत कुठेतरी 'सोने' असा उल्लेख आल्यावर सदर व्यक्ती सरळ सरळ सोन्याने प्रतिकार शक्ति वाढते अन स्मरणशक्ती वाढते असा वाट्टेल तो दावा करीत आहे. अन असल्या भोंदू प्रकाराला परवानगी देणारे शाळावाले शुद्ध निष्काळजी आहेत असे माझे म्हणणे आहे.

धागा या असल्या प्रकारा बद्दल अनुभव विचारण्यासाठी आहे.

ही भोंदूगिरी लक्षात यावी यासाठी माझा तिरकस प्रतिसाद होता. तुमच्या >>सोन्याचांदीच्या कणांचे औषधीगुण सिद्ध होऊन अनेक वर्षं लोटली आहेत.<< या वाक्याने, मूळ दाव्याला चुकीची क्रेडीबिलिटी मिळते आहे.
सोन्याचांदीच्या कणांचे कोणते औषधी गुण, कधी सिद्ध झालेत??

पण चुकलंच माझं साहेब. मेडिसिन चा अन माझा काय संबंध? माफ करा, उगंच लिहिले इथे Happy

द्यायचे की नाही हे पालकांसाठी ऐच्छिक आहे

अहो, पण मुळात दवाखान्याच्या बाहेर कुठेही कुणालाही कसलाही पेपर न करता औषध देणे हेच कायद्याला अनुसरुन नसेल, तर ते करावेच कशाला?

<तुमचे, 'नॅनॉपार्टिकल्स कसे तयार करतात' हे संशोधन चुकीचे नाही. पण त्याचा अन या असल्या आयुरवेदिक औषधाचा काय संबंध??>

सुवर्णभस्मात ९० टक्क्यांहून अधिक प्रमाण हे सोन्याच्या नॅनोकणांचं असतं, हा तो संबंध. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे.

<१५०० डिग्रीला इतर "औषधांसोबत उकळणे"?? चहा आहे तो? १५०० डिग्री कशाला म्हणतात? त्याने सोने शरीरात अ‍ॅब्सॉर्ब होणे सोपे होते?? रिअली??? वॉव!>

हे गजाननला त्या वैद्यांनी सांगितले. ही पद्धत योग्य नाही, याची मी खात्री करून घेतली आहे. तपशिलात चूक असू शकते, मात्र त्याचा सुवर्णभस्म म्हणजे काय, आणि त्याचे फायदेतोटे यांच्याशी काय संबंध? आधी सोन्याची पानं तापवून कांजी, गोमूत्र आणि इतर काही द्रव्यांमध्ये बुडवली जातात. मग आर्सेनिक डायसल्फाइड अणि Pb3O4 यांच्या पावडरीसमवेत ही पानं १२०० अंश सेल्सियसहून अधिक तापमानाला तापवली जातात. यातून गडद लाल पावडर मिळते. या पावडरीचा रंग लाल असतो कारण या कणांचा आकार हा अत्यंत कमी असतो.

<सोन्याचांदीच्या कणांचे कोणते औषधी गुण, कधी सिद्ध झालेत??>>

इब्लिस, थोडं गुगलून बघा हो Happy सिल्व्हरनॅनो हा शब्द तुम्ही जाहिरातींमध्येतरी नक्की ऐकला असेल, नाही का?

बाकी, तिरकस प्रतिसाद न देता, शब्द न फिरवता मुद्देसूद चर्चा केलीत, तर बरं वाटेल. Happy

तिरकस प्रतिसाद न देता, शब्द न फिरवता मुद्देसूद चर्चा केलीत, तर बरं वाटेल. >> अन मजसारख्यांना नवीन माहितीही मिळेल.

१५०० डिग्री से तापमान पृथ्वीच्या पोटात असते ना?

आणि एखादा धातू कितीही तापवून पुन्हा थंड केला, तरी थंड केला तेंव्हा पुन्हा तो तेच गुणधर्म दाखवणार ना?

१. १५०० डिग्रीला तापवणे

२. १५०० डिग्रीला आयुवेर्दिक औषधात उकळणे.

३.पाण्यात सोने घालून पाणी आटवणे.

५. सोने सहाणेवर उगाळणे

६. हातात सोन्याचे दागिने घालणे.

आता, यापैकी नेमका कोणता प्रकार औशधी आहे?

जालावर मिळालेली महिती -
In what concerns the domain of health and medical applications, gold nanoparticles have been successfully used as part of the treatment for some diseases. Rheumatoid arthritis was among the first conditions where use of gold was part of the therapy since it has been found that gold particles implanted near the arthritic hip joints relieve pain. There have also been some in vitro experiments which have proved that gold nanoparticles combined with microwave radiation can destroy the beta-amyloid fibrils and plaque which are characteristic for Alzheimer’s disease. But perhaps the most important medical purpose for which gold nanoparticles can be used is the localization and treatment of cancer. It has already been shown that by directing gold nanoparticles into the nuclei of cancer cells, they can only not hinder them from multiplying, but also kill them.

या सुवर्णभस्माबद्दल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काही वर्षांपूर्वी एक शास्त्रज्ञ संशोधन करत होत्या. त्यांच्याशी बोलून तुला सांगतो.
चिनूक्स, ओके, धन्यवाद. सविस्तर माहिती मिळाली तर फार बरं होईल.

गजानन पारंपारीक आयुर्वेदीक औषधांवर संशोधन होणं खुप गरजेचं आहे.
श्री, हो. असं अनेकदा फार फार तीव्रतेनं वाटतं. आयुर्वेदिक पदार्थांचे गुणधर्म आणि त्यांचे शरीरावर होणारे सु/कु-परिणाम यांची माहिती ही आजच्या वैज्ञानिक भाषेत उपलब्ध झाली तर माझ्यासारख्या सर्वसामान्यांना समजण्यास फार मदत होईल असे वाटते. वैज्ञानिक भाषेत म्हणजे विज्ञान हा विषय शालेय शिक्षणात शिकवला जातो त्या अनुषंगाने - केंद्रक, पेशी, ऊती, स्नायू, जनुकं, गुणसूत्रं, हाडांची रचना, त्यातले घटक, शरीरातल्या विविध संस्था इ. जेणेकरून या औषधांचे परिणाम शाळेत जे शिकवले गेले त्याच्याशी रिलेट करता येईल.

येळेकर, माधव, आम्हाला ज्यांनी व्याख्यान दिले त्या व्याख्यात्यांच्या मते पाण्यात सोने ठेवून किंवा पाण्यात उकळल्याने त्या पाण्यात सोन्याचा काहीच अंश उतरत नाही. खारीक किंवा इतर बालखाद्यांबरोबर जे सोने उगाळले जाते ते सोने शरीराकडून स्वीकारले (शोषले) जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

वर्षा, अश्चिनी, हो. हे दर आम्हाला सांगितलेल्या (सुरुवातीला तीस रुपये, त्यापुढच्या डोसांकरता प्रत्येकी वीस रुपये) त्यापेक्षा खूपच जास्त वाटले.

अहो, पण मुळात दवाखान्याच्या बाहेर कुठेही कुणालाही कसलाही पेपर न करता औषध देणे हेच कायद्याला अनुसरुन नसेल, तर ते करावेच कशाला?
वेडा राघू, आयुर्वेदिक औषधांकरता कायद्याचे काही खास नियम आहेत का यासंबंधी मला माहिती नाही. शिवाय सदर फॉर्म भरून दिल्यानंतर ते रीतसर काही प्रिस्क्रिपशन देणार की नाही, याचीही काही कल्पना नाही. हे व्याख्यान केवळ स्वर्णप्राशाची पालकांना माहिती देण्यासाठी होते. पण एकूणच पालकांच्या प्रतिसादांवरून बरेच पालक हे औषध आपल्या पाल्याला देण्यास उत्सुक दिसले.

औषधांशी संबंधीत कुठेतरी 'सोने' असा उल्लेख आल्यावर सदर व्यक्ती सरळ सरळ सोन्याने प्रतिकार शक्ति वाढते अन स्मरणशक्ती वाढते असा वाट्टेल तो दावा करीत आहे. अन असल्या भोंदू प्रकाराला परवानगी देणारे शाळावाले शुद्ध निष्काळजी आहेत असे माझे म्हणणे आहे.
इब्लिस, तुम्ही खरोखरंच पुरेशा गांभीर्याने हे लिहिलं असलंत आणि हा भोंदूपणा उघड करण्यात तुम्हाला रस असेल तर किंवा तुमच्या (डॉक्टर म्हणून) आणखीही काही शंका असतील (ज्या आमच्यासारख्यांच्या डोक्यात सहसा येणार नाहीत) तर या व्यक्तिची संपर्कमाहिती शाळेकडून घेऊन मी तुम्हाला देऊ शकेन.

प्रतिसादाकरता सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

हा खालचा मुद्दा राहिला.

<<औषधांशी संबंधीत कुठेतरी 'सोने' असा उल्लेख आल्यावर सदर व्यक्ती सरळ सरळ सोन्याने प्रतिकार शक्ति वाढते अन स्मरणशक्ती वाढते असा वाट्टेल तो दावा करीत आहे. अन असल्या भोंदू प्रकाराला परवानगी देणारे शाळावाले शुद्ध निष्काळजी आहेत असे माझे म्हणणे आहे.>>>

हा दावा केवळ 'सदर व्यक्तीनं' केलेला नाही. सर्वच जुन्या वैद्यकग्रंथांमध्ये हे उल्लेख आहेत. नॅनोगोल्डच्या अँटिमायक्रोबियल प्रॉपर्ट्यांवर पेपर लिहिताना अनेक परदेशस्थ शास्त्रज्ञ या आयुर्वेदिय सुवर्णभस्माचा उल्लेख करतात. सुवर्णभस्माशी संबंधित पेपरांचे संदर्भही देतात.

केवळ एखादी परंपरा आयुर्वेदातली आहे, म्हणून ती वाईट असं म्हणणं अयोग्य आहे. आवळ्याची अनेक औषध आयुर्वेदात आहेत. आवळ्यातलं व्हिटॅमिन सी कधीच नष्ट होत नाही, असे भोंदू दावेही अनेकजण करतात. पण त्या पलीकडे जाऊन आवळ्यातले अँटिऑक्सिडंट्स आणि त्यांचा वापर करून सोन्याचांदीचे नॅनोकण आम्ही तयार केले. हे अँटिऑक्सिडंट्स गॅमा रेडिएशनांपासून संरक्षण करतात, हे बीएआरसीच्या संशोधकांनी सिद्ध केलं.

मी वर लिहिलं त्याप्रमाणे आयुर्वेदिय परंपरेतल्या अनेक औषधांवर सध्या संशोधन सुरू आहे. ते केवळ आयुर्वेदिय औषधांचा प्रचार व्हावा, किंवा त्यांचा खोटेपणा उघड व्हावा, म्हणून नव्हे. हे पिवळे चष्मे संशोधन करताना बाजूला काढून ठेवायचे असतात. अन्यथा नॅनोकणांचा औषधांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वापर सुरू असताना त्यांचा मानवी शरीरावर घातक परिणाम होतो का, हे शोधण्यात शास्त्रज्ञांनी वेळ घालवलाच नसता.

गजानन,
सोन्याच्या नॅनोकणांमध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म असल्याचं सिद्ध झालं आहे. हे कण कॅसरच्या पेशी वाढू देत नाहीत, असंही संशोधन आहे. कोलॉयडल सोन्यामुळे जखमाही लवकर बर्‍या होतात, असे काही पेपर सांगतात. मात्र या कणांमुळे स्मरणशक्ती वाढते, हे अजून कोणी लिहिलेलं नाही.

चिनूक्स,
एक बाळबोध प्रश्न - हे नॅनोकण म्हणजे काय असते नक्की? ते आपले शरीर कसे शोषते? की इंजेक्शन द्यावे लागते?

हे गजाननला त्या वैद्यांनी सांगितले. ही पद्धत योग्य नाही, याची मी खात्री करून घेतली आहे.
<<
हे जर योग्य नाही,
तर केवळ माझे आऊट ऑफ काँटेक्स्ट शब्द घेऊन मी "आयुर्वेदाला" विरोध करतो आहे, हा आभास का निर्माण करणे सुरू आहे?
धाग्यात दिलेल्या औषधात सुवर्णभस्म हा शब्द/वस्तू आहे! हे जे केलं त्याचा अन सुवर्णभस्माचा कस्ला बोडक्याचा संबंध येतो त्यात?
सोन्याचांदीतला चांदीच बरा दिसला? सोन्याचे कोणते गुणधर्म सिद्ध झाले बा?

भ्रमरा, मी संधिवाताबद्दल लिहिलेले आहे आधीच.

पण असो. उत्तम माहीती. संतुलीत प्रतिसाद. येऊ द्या अजून.

Pages