आरोग्य

भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व फायदे

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 June, 2014 - 14:04

एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील... एक ना दोन गोष्टी असतात! तुम्ही सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरेच काही अवलंबून असते.

पायाची टाच दुखण्यावर सोपा आणि प्रभावी उपाय.

Submitted by सुभाषिणी on 9 May, 2014 - 10:12

पायाची टाच दुखणे ही समस्या बर्याच जणांना विशेष तः मध्यम वयीन स्त्रिया ना छळणारी समस्या आहे.मलाही बरेच महिने हा त्रास होतोय.असथीरोग तद्न्य वेदनाशामके सगळे करून झाले.सकाळी उठुन पायटेकवणे भयंकर त्र्रासाचे होई.काही दिवसांपूर्वी. netवर वाचले आणि हा उपाय बर्यापैकी उपयोगी झाला .तो असा पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहा.सुरवातीला खुप गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. दिवसातुन २ ३वेळा.मी पहिल्यांदि रात्री अेकदाच केले.दुसर्या दिवशी बराच फरक वाटला.असे तीन दिवस केले.

विषय: 

नखांचे आरोग्य

Submitted by गजानन on 29 April, 2014 - 09:11

तुमची नखं तुमच्या आरोग्याचा आरसा असतात, असं म्हटलं जातं.

उदा. निळसर नखं - हृदयाशी संबंधीत आजार, पिवळसर नखं - यकृताशी संबंधीत आजार इ.

१. एखाद्या बोटाचा 'नेल बेड' कमी होत असेल तर त्याचे कारण काय असावे? (दुसर्‍या हाताच्या त्याच बोटाच्या नेल बेडच्या तुलनेत २/३ मिमिचा तरी फरक )
२. कधी कधी नखांखाली पांढरे डाग येतात ते (जस्ताच्या अभावामुळे ?) माहीतच असेल. पण अगदी बारीक काळे डॉट्स कशामुळे येतात?
३. कधी कधी एखाद्या नखावर अगदी बारीक बारीक खड्डे का येतात? (ज्यामुळे नख वरून खडबडीत लागते).

यांसारखे प्रश्न, उत्तरे आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा करण्याकरता हा धागा उघडला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

maji mulgi 10 mahinyachi zali pan tila ajun ak hi daat nahi ala kay karave?

Submitted by मेघा कोकितकर on 23 April, 2014 - 02:16

maji mulgi 10 mahinyachi zali pan tila ajun ak hi daat nahi ala kay karave?

विषय: 
प्रांत/गाव: 

उच्च रक्तदाब - लक्षणे आणि घरगुती उपाय

Submitted by nikitasurve on 22 April, 2014 - 02:26

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.
या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे.

१) तीन ग्रॅम मेथीदाणा. पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

२) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

विषय: 

रुग्णालये, वैद्य, वैद्यकीय सेवा, अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:23

नमस्कार!

आयुष्यातील अनेक टप्प्यांवर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी / इतर कोणासाठी वैद्यकीय क्षेत्राच्या सहवासात येतो.

अनेक रुग्णालये, प्रयोगशाळा, संशोधन संस्था, निष्णात वैद्य, शस्त्रक्रिया तज्ञ, नर्सेस, इतर सेवा पुरवणार्‍या संस्था, तसेच वैद्यकीय उपकरणे पुरवणारी दुकाने वगैरेंची माहिती येथे एकत्र करता येईल.

वजन वाढवण्याबाबत

Submitted by बन्या on 19 April, 2014 - 15:43

जिकडे पहावे तिकडे वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो, पण अशीही लोकं असतात जी अती बारीक, अशक्त, क्रुश असतात, ज्यांचे वजन खुपच कमी असते, आणि काही केल्या वाढत नाही.

अनुवांशिक असेल तर काहीच समस्या नाही, अशा व्यक्ती बारिक असल्या तरी चपळ असतात.

पण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.

अन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.

यामागे मानसिक ताणतणावही असु शकतो.

शब्दखुणा: 

मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यावी – एक स्वानुभवाचा सल्ला

Submitted by प्रमोद् ताम्बे on 17 April, 2014 - 02:59

मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यावी – एक स्वानुभवाचा सल्ला
मधुमेह काय किंवा रक्तदाब काय , या दोन्हीही आनुवंशिक व्याधी आहेत. एखाद्या घरात जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्याचे पैकी कुणालाही , ही व्याधी असेल तर ती पुढच्या पिढीतील मुला-मुलींपैकी किंवा त्यापुढील पिढीतील नातवंडांपैकी कुणालाही होऊ शकते असे वैद्यक शास्त्र सांगते. तसेच ह्या दोन्ही व्याधींना छुपे रुस्तूम असे म्हणतात.कारण दोन्हीमध्ये तपासणी केल्याखेरीज काही समजत नाही.

ठाण्यातील नर्सिंग ब्युरो

Submitted by स्वाती२ on 13 April, 2014 - 10:25

नमस्कार,
माझे आई-बाबा ठाण्याला एकटेच रहातात. दोन दिवसांपूर्वी बाबा अचानक आजारी पडले. सोसायटीमधील लोकांनी खूप मदत केली. मात्र या सगळ्यात नर्सिंग ब्युरोतून कुणी दादा/ताई मदतीला मिळाल्यास बरे पडेल असे जाणवले. कृपया मला ठाण्यातील चांगले नर्सिंग ब्युरो सुचवाल का? माझे आईबाबा वसंत विहारच्या जवळ रहातात.

Pages

Subscribe to RSS - आरोग्य