आरोग्य

पार्किन्सन्ससाठी नृत्योपचार

Submitted by शोभनाताई on 7 April, 2014 - 03:30

पार्किन्सन्स (पीडी) होण्याची कारणे? : माहित नाहीत

पीडी पूर्ण बरा होण्यासाठी उपचार? : अजून तरी नाहीत.पण संशोधन चालू आहे. आशेचा किरण आहे.आणि पूर्ण बरा होत नसला तरी लक्षणावर नियंत्रण आणून चांगले जीवन जगता येते.

अशी प्रश्नोत्तरे पीडीवरील कोणतेही साहित्य वाचले की हमखास आढळतात.आणि हे वास्तव स्विकारताना लक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात.त्यांच्या अत्यंत मर्यादित आणि व्यक्तीनिहाय उपयोजितेचा विचार करुनही पीडीनी त्रस्त पेशंटना ते आशेचे किरण वाटतात.

शब्दखुणा: 

उरळी-कांचन निसर्गोपचार केंद्र

Submitted by शर्मिला फडके on 5 April, 2014 - 05:00

उरळी-कांचन निसर्गोपचार केंद्रात राहून आलेले आहेत का कोणी इथे? ऐकीव किंवा वैयक्तिक अनुभव वाचायला आवडतील.

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.png

विषय: 

संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)

Submitted by मंजिरी on 30 March, 2014 - 09:29

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले.

कानामागून आली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 30 March, 2014 - 08:55

१५ एप्रिल २०१३. सायंकाळी सातची वेळ. मी आणि पत्नी, तिचा आवडता अभिनेता - राजीव खंडेलवालचा "साऊंडट्रॅक" चित्रपट पाहत होतो. या चित्रपटात नायकाचा एक कान पूर्ण बधीर होतो आणि दुसर्‍या कानाला जेमतेम ३० टक्के श्रवणशक्ती राहते असा एक प्रसंग आहे. पुढे तर नायक पूर्णच बहिरा होतो. अर्थात त्याच्या या कमतरतेवर मात करूनही तो उत्तम संगीतकार म्हणून स्वत:ला सिद्ध करतो असे काहीसे चित्रपटाचे कथासूत्र आहे. तर आम्ही हा चित्रपट व्यवस्थित Enjoy केला. चित्रपट पाहतच रात्रीचे भोजनही उरकले आणि अचानक रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने तक्रार केली की तिला एका कानाने अजिबात ऐकू येत नाहीये.

किडनी साफ करण्याचे हर्बल औषध

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 March, 2014 - 12:17

एक मूठभर धुवून स्वच्छ केलेली कोथिंबीरीची पाने घ्या. ती बारीक चिरून एका स्टीलच्या पातेल्यात घालून त्यात स्वच्छ पाणी मिसळा व १० मिनिटे चांगले उकळवून घ्या व थंड झाल्यावर गाळून घ्या व ते पाणी एका बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेवा.रोज सकाळी झोपून उठल्यावर एक भांडे हे पाणी पित जा. एक आठवड्यातच तुमचा तुम्हाला फरक जाणवेल.किडनीत साचून राहीलेले अनावश्यक क्षार व इतर विषद्रव्ये लघवीवाटे निघून जाऊन तुमची किडनी स्वच्छ होईल व जोमाने कार्य करू लागेल.

विषय: 

लेकीच्या पायदुखीची समस्या. उपाय व कारणे?

Submitted by निल्सन on 27 March, 2014 - 08:20

माझी लेक वय वर्षे ३.५, ती २ वर्षाची होती तेव्हापासुन तिचे तळपाय दुखण्याचे सुरु झाले तिचे तळपाय रोज दुखतात दिवसा / रात्री तिचे पाय दाबल्याशिवाय ती झोपतच नाही. सुरवातीला आम्ही लगेचच तिच्या डॉक्टरांना भेटलो त्यांनी कॅल्शियम कमी आहे असे सांगुन कॅल्शियमचे औषध सुरु केले. तरीही तिचे दुखणे सुरुच होते म्हणुन आम्ही त्यांना परत भेटलो पण सहा महीने तरी औषध द्या असे त्यांनी सांगितले. औषध देउन काहीच फायदा होत नव्हता म्हणुन आम्ही तिला एका हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांनीही सेम कारण सांगितले आणि दुसरे कॅल्शियमचे औषध सुरु केले आणि जास्त दुखल तर पेनकिलर दिलं. तरीही रात्री तिचे पाय दाबणे सुरुच होते.

विषय: 

ठाण्यातील दवाखान्यांबद्दल माहिती हवी

Submitted by _आनंदी_ on 27 March, 2014 - 01:30

ठाण्यात नविनच आलो आहोत.. लहान मुलीसाठी मल्हार टॉकिज्च्या ओपोजिट असलेले वीणा पाठक यांचे क्लिनिक मिळाले... अजुन ते नीट वाटले .. अजुन काही पर्याय आहेत का?

मला गायनॅक कडे जायच आहे... ज्युपिटर हॉस्पिटल बद्दल ऐकल आहे .. तिथे बरेच गयनॅक आहेत .. ते कस आहे ??.... गायनॅक साठी अजुन काही पर्याय आहेत का?

मला थोडे दिवस झाले एक श्वसनाचा त्रास होत आहे ..... वय २८.. मुद्दाम हुन खोल श्वास घेतला की बरे वाटते .. नहितर नॉर्मली थोड ऑक्सिजन ची कमतरता असल्यासारख वाटत ... असा कुणाचा अनुभव आहे का? घशात थोडा कफ कंटिन्युअस असतो ... डॉक. ना दाखवायचे आहे .. कोणत्या डॉकना दाखवु?

मदत..

विषय: 

रक्तदाब

Submitted by सख्या on 26 March, 2014 - 13:49

वय ३५, वजन ८०, रक्तदाब सलग दोन महीने मॉनिटर केला १४०/८० असाच आहे.
नॉर्मल येण्यासाठी काय करावे ? १४० हा जरा हायर साईडला आहे.
(ई काकांसाठी)डॉ ने सल्ला दिला आहे प्राणायाम, वॉकींग करा. गुडगेदुखीमुळे हैरान आहे.
प्लीज प्लीज प्लीज डायट, व्यायामप्रकार सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य