आरोग्य

जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

उपवासाची पावभाजी

Submitted by कवठीचाफा on 10 July, 2014 - 17:57

साहित्य :
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
रताळी- २
बटाटे -२
दुध - १/२ लिटर
मिरच्या - ५-६
तिखट - रंगापुरते
तूप - २ मोठे चमचे
लिंबु - १
मिठ - चविपुरते

सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.
प्रत्येकी १ रताळे व बटाटा यांचा किस करून बाजूला ठेवा. एका भांड्यात दुध घेऊन त्यात लिंबु पिळा, त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तूप घालुन ते मंद आचेवर ठेवा, तुप तापल्यानंतर त्यात हलक्या हाताने दुध घाला, त्यात मघाशी टांगून ठेवलेले साबुदाणे थेट कपड्यातूनच टाका. आता थोडावेळ वाट पहा.

दु:खाचे स्वरूप

Submitted by नरेंद्र गोळे on 7 July, 2014 - 06:40

घर छोड के चले थे, खुशी की तलाश में, खुशी की तलाश में,
गम राह में खडे थे, वहीं साथ हो लिये,
यूँ हसरतों के दाग मोहोब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कहीं, और रो लिये

अशाप्रकारे सुखाच्या शोधार्थ घराबाहेर पडलेल्यांच्या वाटेवरच उभी असणारी दुःखे, त्यांची सोबत करू लागतात. मग स्वतःलाच त्या दुःखाचा सल सांगून रडून घ्यायची पाळी येते. त्यामुळे दुःख म्हणजे काय हे कुणालाही सांगावे लागत नाही. जन्म घेणारी बालके तर दुःख सहन न होऊन रडत रडतच ह्या जगात अवतीर्ण होत असतात.

विषय: 

आहाराचा आठवडी तक्ता

Submitted by स्नू on 25 June, 2014 - 01:29

हे आहे माझ्या पुढच्या आठवड्याचे आहार नियोजन. हे नियोजन खालील गृहितकांवर आधारित आहे

काही गृहीतके :

1. मी दिल्लीला राहते. पालक, मेथी, शेपू अश्या गुणी पालेभाज्या येथे फक्त हिवाळ्यात मिळतात. बाकीचे 8 महीने केवळ फळभाज्य आणि पनीर, राजमा, छोले, डाळी यांच्या आधारे काढावी लागतात.
2. मी सकाळी 9 वाजता घरातून निघते आणि संध्याकाली 7 वाजता घरी परतते.
3. मी अत्यंत आळशी आहे. लग्नाआधी इकडची काडी तिकडे सुद्धा केलेली नाही. Sad
4. दिल्लीत फक्त मी आणि माझा नवरा असे दोघच राहतो. आणि तो बराच समजूतदार असल्याने जेवण बनवण्याबाबत फारसा आग्रही नसतो.

प्रांत/गाव: 

single umbilical artery, or SUA बद्दल माहिती/चर्चा

Submitted by वत्सला on 13 June, 2014 - 07:17

single umbilical artery, or SUA बद्दल काही माहिती अथवा अनुभव असल्यास कृपया इथे लिहा.

विषय: 

मायस्थेनिया बद्दल माहिती मिळु शकेल काय?

Submitted by यक्ष on 12 June, 2014 - 01:49

'मायस्थेनिया' ह्याबद्दल माहिती मिळु शकेल काय? विशेषतः 'ऑक्युलर मायस्थेनिया' बद्दल!

माझ्या वडिलांच्या (ज्येष्ठ नागरिक) डोळ्यांबद्दल डॉक्टरांनी शक्यता बोलून दाखवलीय. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची अनियंत्रित उघ्डझाप होण्याचा त्रास मधे मधे जाणवतो.

धन्यवाद!

विषय: 

वृद्ध पालकांची काळजी व देखभाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 June, 2014 - 07:37

आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.

सुंदर दिसण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग

Submitted by अजय on 6 June, 2014 - 01:27

1024px-Lemon.jpg
फोटो: André Karwath Wikimedia

बहुगुणी लिंंबाचा रस तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खुप उपयुक्त आहे

१. चेहर्‍यावरचे काळपट डाग घालण्यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडा लिंबाचा रस घेऊन त्या भागावर लावा. साधारण ३० मिनिटे तसेच ठेवा आणि उन्हात बाहेर पडू नका. फक्त चेहर्‍यावरच नाही तर शरिराच्या इतर काळपट पडलेल्या भागावर ही युक्ती वापरता येईल. रस डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

विषय: 

जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2014 - 07:35

वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्‍या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.

Pages

Subscribe to RSS - आरोग्य