आरोग्य

नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना

Submitted by मो on 10 February, 2015 - 09:47

गेल्या ५० वर्षात जगभरातील प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये नोकरदार किंवा व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी होण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. नोकरी व्यवसायात बस्तान बसेपर्यंत आपत्यप्राप्ती लांबवणे किंवा '१ या २ ऐवजी' १ बस कडे कल झुकणे ह्या गोष्टीही आजकाल काही प्रमाणात पाहण्यात येत आहेत. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे.

विषय: 

नायजेरियन विचित्र कथा -१ - एक कर्नल कि मौत

Submitted by दिनेश. on 31 January, 2015 - 05:39

मी नायजेरियातल्या अगबारा या गावी नोकरी करत होतो त्या काळातली हि घटना. या गावी मोठे मोठे कारखाने आहेत. ग्लॅक्सोचाही कारखाना आहे. आमच्याच कंपनीचे अॅसिड प्लांट, ग्लास प्लांट, फर्टीलायझर डेपो, सिलिकेट प्लांट, आयर्न डेपो अशी काही युनिट्स होती. ६० च्यावर भारतीय होते आणि ३०० च्या वर नायजेरियन होते.

प्रत्येक विभागाचा कारभार बघायला स्वतंत्र मॅनेजर होतेच, पण तरी या सगळ्यांची मोट एकत्र बांधायला म्हणून एक रिटायर्ड कर्नल दाखल झाले होते. त्यांना कर्नलच म्हणायचे असा त्यांचा आग्रह होता.

हाऊस एम डी बद्दल

Submitted by mi_anu on 30 January, 2015 - 05:07

हाऊस एम डी मला खूप आवडायची. हाऊसचे एकंदर पात्र आणि त्याला कायम चिमटे काढत असूनही कठीण प्रसंगी त्याला आधार देणारी आणि त्याच्या बुद्धीला कायम मानणारी टिम पण.
मालिका आता स्टार वर्ल्ड वर संपली पण त्याच्या आठवणी जागवण्यासाठी हा धागा.

Endless to-do list

Submitted by Mother Warrior on 12 January, 2015 - 20:56

ही अशीच गंमत. ही माझी फक्त मुलासंबंधित टूडू लिस्ट. तरी शाळेसंबंधित काहीच आले नाही यात.
नो वंडर, मला मुलाखेरीज दुसरे काहीच सुचत नाही..

autism_to_do_list

विषय: 

How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

Submitted by Mother Warrior on 8 January, 2015 - 21:14

मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर कितीही प्रयत्न केला तरी मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोसेसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. Happy

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

१४) बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स

Submitted by Mother Warrior on 4 January, 2015 - 22:04

मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.

विषय: 

१३) बायोमेडीकल उपचारपद्धती व ऑटीझम

Submitted by Mother Warrior on 2 January, 2015 - 19:01

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मागील लेखावर्/चर्चेवर मिळालेल्या प्रतिसादांच्या प्रोत्साहनाने तसेच माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनासाठी परत एकदा आभार! Happy

विषय: 

भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.

विषय: 

अमिताभ व कबुलीजबाब

Submitted by उडन खटोला on 23 December, 2014 - 13:28

नुकतेच जुने जाणते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात असे कबूल केले की सन २००० मध्ये त्याना टीबी रोग झाला होता ,परंतु उपचार घेवून त्यानंतर ते पूर्ण बरे झाले .तरी टीबी च्या पेशंट नी /परिवाराने हताश न होता पेशंटवर पूर्ण उपचार करून घ्यावेत . हे वाचल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले . \

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य