आरोग्य विज्ञान सकारात्मक दृष्टिकोन

सकारात्मक दृष्टिकोन

Submitted by नीलम बुचडे on 3 November, 2015 - 08:25

नमस्कार मायबोलीकर
सकारात्मक दृष्टिकोन व त्याचे परिणाम सिद्ध करणारा आणखी एक प्रयोग मी टीव्ही वर बघितला..
तो असा....
दोन माणसांना वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो द्यायला सांगितले. त्यापैकी एकाला एकदम
दुःखी चेहरा तर दुसऱ्याला आनंदी, हसरा चेहरा करायला सांगितले..
याच पोजमध्ये त्यांना २ मिनिटे स्थिर रहायला सांगितले.
फोटो काढल्यानंतर त्यांना ५० डॉलर्स बक्षीस दिले गेले. यानंतर त्यांना एक जुगाराचा खेळ खेळण्याची अॉफर देण्यात आली. त्यात जिंकल्यास १०० डॉलर मिळतील असे सांगण्यात आले.
त्यापैकी ज्याने आनंदी पोजमध्ये फोटो दिले त्याने पटकन होकार दिला व तो जिंकला सुद्धा..

विषय: 
Subscribe to RSS - आरोग्य विज्ञान सकारात्मक दृष्टिकोन