आरोग्य

आयोडाईज्ड मीठ

Submitted by हर्ट on 8 July, 2015 - 02:28

रोजच्या जेवणात नक्की कुठले मीठ वापरावे ह्याबद्दल कुणी माहिती मिळेल का? मी आयोडाईज्ड मीठ वापरुण पाहिले पण मला त्याची एकतर चव फारशी आवडली नाही आणि कितीही टाकले तरी ती किंचित खारट चव लागत नाही.

धन्यवाद.

विषय: 

मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !

यकृत आणि त्याचे आजार

Submitted by मिमिविजय on 26 June, 2015 - 06:54

माझा स्वतःचा अनुभव आहे
गेली १३ वर्षे मी पित्ताच्या विकार मुळे त्रस्त आहे
पण आता ऑक्टोबर २०१४ मध्ये ताप येउन कावीळ झाली पुन्हा जून २०१५ मध्ये कावीळ झाली आहे
मी डॉक्टर कडे गेलो नाही परंतु माझ्या पोटावर जिथे यक्रुत असते तिथे एक छोटी गाठ लागते
देवाला माहित कि कुठला आजार आहे बहुतेक हेपतय्टिस बी असावा

विषय: 

लहान मुलांचे वजन

Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16

माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्‍या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.

त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक

मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा..

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2015 - 16:28

मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा.
___________________________________________________________________

:- दारू पिऊन मेले त्यांना सरकार काय म्हणून नुकसान भरपाई देते? कोण त्यांना प्यायला सांगते? मेले आपल्या कर्माने. नाहीतरी दारू कुठे जगवते. उद्या मरणार होते ते आज मेले.

:- त्यांना नाही त्यांच्या अनाथ झालेल्या बायकापोरांना ते पैसे मिळतात. घरच्यांचा आधार जातो, यात त्यांची काय चूक?

विषय: 
शब्दखुणा: 

नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?

तडका - अन्नाची सुरक्षितता,...?

Submitted by vishal maske on 13 June, 2015 - 23:32

अन्नाची सुरक्षितता,...?

आहाराच्या असुरक्षिततेच्या
ऊसळ्यांवरती ऊसळी आहेत
माणसांसाठीच्या अन्नामध्ये
माणसांकडूनच भेसळी आहेत

जणू मना-मनात पोसलेले
निष्काळजीपणाचे वेल आहेत
माणसांची दक्षता घेण्यासाठी
आज माणसंच फेल आहेत,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मॅगी आणि आपण

Submitted by नितीनचंद्र on 10 June, 2015 - 05:10

मॅगी बाबत मायबोलीकरांची मत काय आहेत हे जाणुन घेण्यासाठी बरेच शोधले पण अनेक विषयावर आपले मत मांडणार्‍या जागृत मायबोलीकरांना काय झाले काही समजले नाही.

एकंदरीतच हा विषय मिडीयाकडुन हाताळला गेला, सरकारकडुन हाताळला गेला यात काही तरी गडबड असल्याचे जाणवते आहे.

सुरवात एफ डी ए पासुन करावी लागेल. एखादा खाद्यपदार्थ किंवा औषध त्या राज्यात बनविण्याचे लायसन्स राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले एफ डी ए देते. मग वर्षाच्या वर्षाला ते लायसन्स चालु ठेवण्यासाठी स्वतःच्याच प्रयोगशाळेत स्वतः जाहीर केलेले अन्न घटक/ औषधांचे घटक त्या प्रमाणात आहेत ना ह्याचे प्रमाणपत्र एफ डी ए ला द्यायचे.

शब्दखुणा: 

चिंगी आणि मॅगी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 June, 2015 - 07:27

चिंगी आणि मॅगी.

चार दिवस झाले आमच्या शेजारच्या चिंगीला घरचा डाळभात गोड लागत नाहीये. डाळ आणि भात मुळी गोड नसतोच असे पांचट युक्तीवाद नको, चिंगीच्या भावना समजून घ्या. सारे काही जेवण साग्रसंगीत असावे पण कोणीतरी नेमके त्यातील मीठ काढून घ्यावे तसे कोणी तरी चिंगीच्या जेवणातील नेमके सार काढून घेतलेय.

आता या रविवारची गोष्टच घ्या ना. झाले काय, चिंगीचे बाबा नेहमी सारखे घरात प्यायला बसले. एका हातात मद्याचा ग्लास, दुसर्या हातात चैतन्यकांडी, आणि धूर् खिडकीच्या बाहेर. समोर कागदाच्या पुडक्यात शेवचकली चकण्याला, आणि सोबत पेप्सीकोल्याचा ग्लास हातात घेऊन त्या चकण्यावर ताव मारणारा तिचा दादा.

विषय: 
शब्दखुणा: 

आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य