आरोग्य

फ्लॉवर रेमेडी

Submitted by निरुपमा on 9 February, 2013 - 05:41

फ्लॉवर रेमेडी आणि प्राणि जगत : एक अनुभव.

माझी भाचेसून कोकणात डॉक्टर आहे. ती आणी तिचा नवरा हौस म्हणून पशुपालन करतात. त्यांच्याकडील काही म्हशीना काहीतरी त्वचा रोग झाला. अनेक प्रकारचे अति खर्चिक उपचार करूनही बरा झाला नाही. एक म्हेंस पण दगावली.

ती डॉक्टर असूनही पुश्पौषधीचा वापर करते.

एकदा सहजच तिने या त्वचारोगावर प्रयोग म्हणून पुश्पौषधीपासून केलेले मलम या प्राण्याना लावले. आश्चर्य म्हणजे या मलमाचा उपयोग होऊन त्वचा रोग बरा होऊ लागला . काही दिवसात दुसरा कोणताही उपचार न करता हा रोग पुर्ण बरा झाला.
हजारो रुपये खर्च करूनही या रोगावर इलाज होत नव्हता.

विषय: 
शब्दखुणा: 

फ्लॉवर रेमेडी वर्ग

Submitted by निरुपमा on 9 February, 2013 - 05:16

फ्लॉवर रेमेडी वर्ग सुरु करत आहे.
वेळ : दुपारी ३- ५. (सोयीनुसार बदलता येइल)
स्थळ : सॅलेसबरी पार्क, पुणे.

२२ फेब्रु. ते १० मार्च २०१३.
( १० वर्ग )

.
नाममात्र शुल्क आकारण्यात येइल. बाखचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा हेतू आहे.
इच्छूक असणार्‍यानी सम्पर्क साधावा.

शोभना तीर्थाली.

निरुपमा जोशी
nirupamapjoshi@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज / An appeal for blood (A+) in Mumbai

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.

येत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर तातडीच्या कॉरोनरी आर्टरी आणि अ‍ॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे. या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.). त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का? ए पॉझिटिव (A+) रक्ताची गरज आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पुण्यात AB negative (AB - ) रक्ताची गरज

Submitted by अजय on 31 January, 2013 - 21:04

आज वडिलांची अचानक तातडीची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांचा रक्तगट AB negative आहे. याच गटाच्या रक्तदात्याच्या शोधात आहोत. तुम्हाला शक्य असेल किंवा कुणी माहिती असेल तर कृपया संपर्क करा.

विषय: 
शब्दखुणा: 

माझा साक्षात्कारी.....मधुमेह

Submitted by समीर on 27 January, 2013 - 20:49

ऑफिसमध्ये कधी मेडीकल इन्श्युरन्ससंबंधी बोलणं झालं किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमीच अभिमानानं सांगायचो की, कव्हरेज किंवा कोण डॉक्टर्स इन्शुरन्स ग्रूपमध्ये आहेत याचा मला फारसा फरक पडत नाही, गेल्या १३ वर्षांत एकदाही (कधीतरी सर्दी-खोकला सोडल्यास) डॉक्टरकडे जावं लागलं नाही, त्यामुळे फॅमिली डॉक्टरही कोणी नाही. दरवर्षी करू करू म्हणून ठरवत वार्षिक मेडिकल चेकअपही करत नव्हतो, हा मुद्दा मात्र सफाईनं टाळत असे.

विषय: 

कृपया मदत करा - असंबध बडबड, मानसिक त्रास

Submitted by निषा on 24 January, 2013 - 01:49

माझ्या मैत्रिणीविषयी प्रश्न आहे. तिचे लग्न झाले असुन तिला ४ महिन्याची मुलगी आहे. तिला लहानपणापासुन पाहत आहे. तिचे वागणे बोलणे चांगले व नॉर्मल आहे. पण गेल्या काही दिवसांपासुन तिचे वागणे बोलणे अचानक बदलले आहे. ती सांगते की तिला सतत भिती वाटते. ती मध्येच सर्वांना नीट ओळखते तर मध्येच एखाद्या व्यक्तिकडे बघुन ती दुसरीच व्यक्ती आहे असे समजुन तिच्याशी बोलते. स्वतःच्या मुलीमध्ये तिला तिचा खुप वर्षापुर्वी वारलेला मामा दिसतो. स्वतःच्या बहिणीमध्ये तिची लहानपणीची वर्गमैत्रीण दिसते. मध्येच तिच्या सासुबद्द्ल बोलते की त्या बघ इथे बसल्या आहेत.

निराशा / वैफल्य

Submitted by असो on 21 January, 2013 - 03:59

निराशा / वैफल्य या संदर्भात माहिती हवी आहे.

वैफल्यातून येणा-या प्रतिक्रिया / वैफल्यग्रस्त होण्याची कारणे / स्वतः किंवा आपल्यामुळे इतरांच्यात वैफल्य येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी / स्वभाव विशेषाप्रमाणे होणारे परिणाम / उपचार इ. माहिती मिळाल्यास आभारी राहीन.

गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी

Submitted by हरिहर on 20 January, 2013 - 05:10

आज रविवार दि. 20/1/13 रोजीची दै.लोकसत्ता मधील लोकरंग पुरवणी वाचली. त्यामधील पृष्ठ क्र.3 वरील श्री. गिरीश कुबेर लिखित "गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी....' हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख वाचण्यात आला. सदर लेखाचा गोषवारा असा -

विषय: 

वॉटर प्युरीफायर्स

Submitted by झकासराव on 7 January, 2013 - 07:07

सध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.
तेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
सध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.
त्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.
हा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.
सोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.

विषय: 

डोळ्यांच्या समस्या

Submitted by निंबुडा on 28 December, 2012 - 04:36

'आरोग्यम् धनसंपदा' ह्या ग्रूप मध्ये डोळे ह्या विषयावर परीपूर्ण चर्चा असलेला धागा न सापडल्याने हा धागा उघडत आहे.

डोळ्यांच्या समस्या व डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाय, शल्यक्रिया, डोळ्यांचे डॉक्टर्स इ.संबंधी इथे चर्चा करू या.

डोळ्यांशी संबंधित विशिष्ट समस्यां/प्रश्नांसाठी खालील धागे 'आरोग्यम् धनसंपदा' ग्रूप मध्ये तसेच जुन्या मायबोलीवर ह्या आधी बनवले गेल्याचे दिसत आहे. लिंक इथे देत आहे.

डोळे येणे - चांगलं की वाईट ?

डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे

Pages

Subscribe to RSS - आरोग्य