आरोग्य

थोडासा वेळ.....स्वत:साठी

Submitted by विद्या भुतकर on 21 April, 2016 - 16:47

आजची पोस्ट थोडी वादळी होऊ शकते. यात कुणाच्या भावना दुखविण्याची इच्छा नाहीये, नक्कीच. उलट काही चांगले झाले तर आनंदच आहे. २४-२५ वर्षांपर्यंत मला असं वाटायचं की मी कितीही खाल्लं तरी माझं वजन वाढणार नाही. कॉलेज मध्ये असताना दिवस दिवस चालणं व्हायचं. नोकरी लागल्यावरही बैठं काम वाढलं तरी तगतग होतीच. पण अमेरीकेत आल्यावर माझ्या मेसमधल्या खाण्यापेक्षा जास्त जड, गोड खाणं सुरु झालं.आणि सहा महिन्यात माझं वजन पाच किलोने वाढलं. मला कळलं सुद्धा नाही कधी वाढलं. कारण कधी माहीतच नव्हतं वजन करून, शिवाय ते वाढणार नाही ही खात्री होतीच. पण इथे आल्यावर पहिल्या वर्षातच मला माझ्यात झालेले बदल दिसून येऊ लागले.

विषय: 

कमी रक्तदाबावर उपाय

Submitted by arjun1988 on 20 April, 2016 - 16:11

मला खुप वर्षांपासून सायनसचा त्रास आहे. मला त्यावर आमच्या ओळखींच्यानी कपालभातीं, प्राणायाम करण्यास सांगितले. माझा सायनसचा त्रास खुपच कमी झाला, पण त्यामूळे मला कमी रक्तदाबचा त्रास सुरु झाला आहे. कपालभातीं, प्राणायाम न थांबवता रक्तदाब नियमित कसा राहील ?

विषय: 

आरोग्यविमा (Health Insurance) कोणता चांगला आहे?

Submitted by माधव on 19 April, 2016 - 06:33

मेडीक्लेम कोणत्या कंपनीचा घ्यावा?

माझ्या ऑफीसतर्फे आधीच एक health insurance आहे. मग हा खाजगीरीत्या घ्यायचा विमा बेसिक असेल की अ‍ॅडऑन प्रकारचा ?

मला अपेक्षीत असलेले मुद्दे:
१. भरपाई आणि त्यासाठी पडणारे कष्ट (सगळ्यात महत्वाचा मुद्दा)
२. preexisting आजार सोडल्यास विम्याने संरक्षण न मिळणारे आजार
३. हप्त्याची रक्कम आणि मिळणारे फायदे
४. प्रत्येक आजाराबाबत खर्चाची मर्यादा असल्यामुळे होणारे तोटे
५. नॉन क्लेम बोनस (फ्री चेक-अप्स, कमी हप्ता इ.)

शब्दखुणा: 

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 18 April, 2016 - 23:13

गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी..

HealthApps.jpg

कामातुरांणाम् ना भयम् .....

Submitted by SureshShinde on 18 April, 2016 - 18:23

स्थळ: मेडिसिन डिपार्टमेंट, ससून हॉस्पिटल, पुणे. साल १९७६.

प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती.

मेंदू, भावना व वर्तणूक : भाग २

Submitted by मंजूताई on 15 April, 2016 - 09:53

आधी म्हटल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत. ‘अवेकनिंग्ज’ हा पार्किसन रोगावर बनवलेला अप्रतिम चित्रपट ज्यात सॅक्सने भूमिकाही केली आहे,

शब्दखुणा: 

मेंदू, भावना व वर्तणूक : भाग १

Submitted by मंजूताई on 12 April, 2016 - 06:45

सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शब्दखुणा: 

मदत हवी : मसाजर आणि नुगा थेरपी

Submitted by उडन खटोला on 9 April, 2016 - 13:13

मी सुमारे आठ वर्षापूर्वी नुगा थेरपी ने मसाज / उपचार घेत होतो. त्याने गुढगेदुखी / पाठदुखी व इतर समस्यांवर बर्‍यापैकी फायदा /सुधारणा झाली . परंतु आमच्या शहरातील ते नुगा थेरपी चे केंद्र २०१० साली बंद पडले. त्यानंतर मी अनेक ठिकाणी चौकशी केली ,परंतु हे मशीन घरी बसवण्यास सुमारे दीड लाखापर्यंत खर्च येतो असे समजले. तसेच जुनी मशीन्स ओएलएक्स वर द्देखील ६५०००/- ते ८००००/- पर्यन्त उपलब्ध आहेत. परंतु इतकी इन्व्हेस्टमेंट मसाज साठी करणे मनास पटत नाही . परंतु त्या मसाज चा नक्की फायदा होतो हे खरे आहे. तर काय उपाय करावा?

विषय: 

लोकसत्ताने मागे घेतलेला अग्रलेख

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 19 March, 2016 - 10:12

‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.

मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.

http://www.loksatta.com/sampadkiya-category/aghralekh/

Pages

Subscribe to RSS - आरोग्य