चिकुन्गुनिया सद्रुश नवीन विषाणुजन्य आजार

Submitted by स्मिता श्रीपाद on 10 October, 2016 - 01:31

गेल्या काही महिन्यांपासुन पुण्यात चिकुन्गुनिया सदृश एक नवीनच प्रकारचा विषाणुजन्य आजार पसरला आहे.
माझ्या माहितीतल्या घरटी एकातरी व्यक्तीस हा आजार झालेला मी ऐकला/पाहिला.
याची लक्शणे साधारण खालील प्रमाणे असतात :

- थंडी वाजुन अतिशय तीव्र स्वरुपाचा ताप येणे ( १०२ ते १०४ )
- सांधे,स्नायु दुखणे
- ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे
- क्वचित जुलाब्/उलटी असा त्रास

ताप १-२ दिवसात कमी होतो. पण थकवा बराच राहातो.
डेंगु आणि चिकुन्गुनिया दोन्हीच्या टेस्ट निगेटीव्ह येतात.पण प्लेटलेटस काही प्रमाणात कमी होतात.

ताप उतरला आणि रुग्ण पूर्ण बरा झाला तरी पुढे कित्येक दिवस सांधे व स्नायु आखडणे व दुखणे असा त्रास होतो.

मला अशाप्रकारचा ताप येउन उद्या ७ आठवडे पूर्ण होतील.
परंतू अजुनही मला प्रचंड सांधेदुखी आणि स्नायुदुखी चा त्रास होत आहे.ऑफिसमद्धे एसी मधे बसुन अजुनच त्रास होतो.रोज एखादे नवीनच हाड जास्त दुखायला लागते.८ आठवडे सांधेदुखी राहिल असे डॉकटर म्हणाले होते त्यानुसार आत्तापर्यंत दुखणे कमी व्हायला हवे होते पण तसे काही लक्षण दिसत नाहिते.
त्यामुळे आता माझे पेशन्स पण संपत चाललेत. Sad माझ्या ओळखिच्या बर्याच जणांना सेम त्रास चालु आहे.

यावर खात्रीशीर ईलाज किंवा औषध उपलब्ध आहे का ?
मायबोली वर कोणाला अशाप्राकारचा त्रास झाला आहे का ? असल्यास काय उपाययोजना केली ?
होमिओपॅथी चा सांधेदुखी साठी फायदा होतो असे ऐकले आहे ? हे खरे आहे का ?
ईथल्या जाणकार डॉक्टरांचा सल्ला काय आहे ?

याविषयावर ईथे तुम्हा सगळ्यांची मतं जाणुन घेण्यासाठी हा धागा.
( असा धागा अधीच येउन गेला असेल तर प्लीज मला सांगा )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गेले ३ महिने हा त्रास होत आहे. याला काहि औषध घेतले तरी २/३ दिवस बरे वाटते. पुन्हा दुखायला लागते. त्यासाठि विश्रांती हेच औषध आहे.

बंगलोरला माझ्या बहिणीला आणि बाबांना झाला.
बहिणीला डॉक्टरांनी कसल्याशा स्टरॉअीड्सचे अींजेक्शन दिले. त्याने तिला खूपच आराम मिळाला, व्यवस्थित हिंडु फिरु लागली तीन चार दिवसात.

बाबांना वयोमान, किडनी आजार वगैरेंमुळे ते अींजेक्शन दिले नाही.
चार महिने झाले अजून, नीट चालता येत नाही, पण स्लो, स्टेडी अींप्रुव्हमेंट आहे.

माझे आई आणि बाबा दोघांनाही सेम हाच त्रास झाला होता मागच्या वर्षी. ऑक्टोबर मधेच. एकत्र आजारी होते दोघेही. बाबांना १०५ ताप आणि आईला १०३-१०४ पर्यन्त. आणि गावाला जाऊन दोघे एकत्र आजारी पडले. २ दिवसांसाठी गेले होते. एका आठवड्यानंतर आले.

मेजर विकनेस भरुन निघायला ६ महीने लागले. रॅशेस नव्ह्ते. जुलाब-उलट्या नव्ह्त्या पण खुप frequently जायला लागत होतं.

रोज एखादे नवीनच हाड जास्त दुखायला लागते.>>>> हे अजुनही आहे. रात्र रात्र झोपच लागत नाही त्यांना. आता खुप कमी आहे त्रास. ९०-९५% lesser. पण आहे.

तुम्हाला घाबरवण्याचा हेतु नाही. पण आम्ही चिकनगुनिया झाला होता असं समजुन होतो. पण हे वेगळं काही असु शकेल का?

नीट चालता येत नाही, पण स्लो, स्टेडी अींप्रुव्हमेंट आहे.>>> हो आई बाबा पण कितीतरी महिने रेलिंगला धरुन पायर्‍या चढ -उतर करत होते. आईला तर अजुनही पटकन खाली बसता किंवा बसली तर ऊठता येत नाही.

हम्म,मायबोलीकर साती यावर विषेश लिहू शकतील.कॉलिंग साती.
व्हायरस अनेक प्रकारचे असतात,अगदी लाखो प्रकारचे आहेत व बॅक्टेरीयाही अनेक प्रकारचे असतात ,पैकी कशामुळे हा त्रास होतोय हे शोधने अवघड आहे .
(DRACO antiviral नावाचे नवीन औषध येते आहे ,कॉमन कोल्डपासून HIV पर्यंत कोणातेही व्हायलर इन्फेक्शन त्याने बरे होऊ शकते,हे फक्त माहीतीसाठी सांगितले.)

- सांधे,स्नायु दुखणे +१
- ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे +१
ही दोन्ही लक्षणं माझ्या आई-वडिलांना सुद्धा दिसली होती (जुलै महिन्यात). डेंग्यू टेस्ट निगेटीव्ह आली होती. डॉक्टरांनी हा आजार डेंग्यूही नाही, चिकनगुनियाही नाही, त्याच्या मधलाच काहीतरी आहे असं निदान केलं होतं. वर हेही सांगितलं होतं की यावर इलाज अजून सापडला नाही. आईची सांधेदुखी हल्लीहल्लीच जरा कमी झाली आहे.

माझ्या काका-काकु दोघांनाही असाच त्रास होतो आहे.. ४-५ आठवडे झालेत. सगळ्या टेस्ट निगेटीव्ह आल्यात. पण हात पाय अजुनही खूप दुखतात.. खाली उतरण पुर्ण बंद झालय... डॉक्टर म्हणतात काही दिवसात कमी होइल तोवर सहन करणे हाच उपाय आहे!!!

आईची सांधेदुखी हल्लीहल्लीच जरा कमी झाली आहे.>>
@मित : म्हणजे जुलै चा त्रास जवळजवळ ३-४ महिने राहिला असं का ?
मला माझे पेशन्स अजुन वाढवावे लागतील म्हणजे... Sad

डॉक्टर म्हणतात काही दिवसात कमी होइल तोवर सहन करणे हाच उपाय आहे!!! >>
@सखी-माउली:
अरे देवा....म्हणजे दुसरा काहीच उपाय नाही का ?
घरी बसणं तर अशक्य आहे मला..

बहिणीला डॉक्टरांनी कसल्याशा स्टरॉअीड्सचे अींजेक्शन दिले >> हा कितपत खात्रीशीर उपाय आहे ? ईथल्या डॉकटरांनी सल्ला द्या प्लीज

याला "अ‍ॅडव्हान्स फ्ल्यु" म्हणतात बहुतेक.
वर लिहिल्याप्रमाणे १०२-१०३ ताप येतो आणि १-२ दिवस तरी राहातो..
डेंग्यु आणि चिकुनगुनिया या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह येतात पण अंगातली शक्ती जाते एकदम.
माझ्या माहितीत स्टेरॉईड्स घेतलेल्यांना बराच लवकर आराम पडलेला आहे.
पण स्टेरॉईड्स देणारा डॉक्टर खात्रीचा असावा.

आमच्याकडे साबा-साबु एक आयुर्वेदीक पेनकिलर घेतात. त्यांना संध्याकाळपर्यंत बरे असते. त्या गोळीचे नाव अपडेट करते इथेच. शिवाय माझ्या ओळखीत ज्यांनी स्टेरॉईड्स घेतले त्यांच्या डॉक्टरचे नाव इथे अपडेट करते विचारून.

आमच्याकडे साबा-साबु एक आयुर्वेदीक पेनकिलर घेतात. त्यांना संध्याकाळपर्यंत बरे असते. त्या गोळीचे नाव अपडेट करते इथेच. शिवाय माझ्या ओळखीत ज्यांनी स्टेरॉईड्स घेतले त्यांच्या डॉक्टरचे नाव इथे अपडेट करते विचारून.

>>> पियू, नक्की कर.

आमच्याकडे साबा-साबु एक आयुर्वेदीक पेनकिलर घेतात. त्यांना संध्याकाळपर्यंत बरे असते. त्या गोळीचे नाव अपडेट करते इथेच. शिवाय माझ्या ओळखीत ज्यांनी स्टेरॉईड्स घेतले त्यांच्या डॉक्टरचे नाव इथे अपडेट करते विचारून.>>

हो हो..प्लीज सांग नाव...स्टेरॉईड बद्दल विचार करावा लागेल पण आयुर्वेदीक गोळ्या नक्की ट्राय करता येतील

बाबांना हा / अशाच प्रकारचा त्रास होतोय.गेले १५ दिवस झाले. रेड ब्लड सेल कमी क्झाले होते. अन व्हाईट ब्लड सेल्स वाढले आहे. खूप अशक्त पणा आहे. संडास उलटीही होतेय. आता कमी आहे त्रास. ७ तारखेला सर्व रीपोर्ट नॉर्मल आले. पण त्रास कमी होत नाही. खुप अंगदुखी आहे म्हणतायेत.

आज पर्यंत एकही इंजेक्शन्म घेतलेले नाही त्यांनी. वय वर्ष ६७. खूप फिरतात , फिट आहेत एकदम अन आता अगदी केविलवाणे झालेत या दुखण्याने.

साबा साबु ज्या आयुर्वेदीक गोळ्या घेतात त्याचं नाव "रुमाविन" आहे.

http://3.imimg.com/data3/MJ/VK/MY-10283436/rumawin-250x250.jpg

वर फोटोत दिसतेय तशी सेम बाटली आहे घरी. तेल लावत नाहीत पण ते.. फक्त गोळ्या घेतात दोघे.

पियु धन्यवाद .
त्याना कोणा डॉक्टरांनी ही गोळी प्रीस्क्राईब केलेली का ?
कोणालाही घेता येते का ?

त्याना कोणा डॉक्टरांनी ही गोळी प्रीस्क्राईब केलेली का ?
>> नाही. एका ओळखीतल्या सिनिअर नर्सने प्रिस्क्राईब केली आहे. त्या बरीच वर्षे या क्षेत्रात असून त्या बरेचदा साबांना वेगवेगळी आयुर्वेदीक औषधे सुचवतात आणि सासुबाईंना बर्‍यापैकी गुण येतो.

कोणालाही घेता येते का ?
>> हो. त्यांनी तरी असेच सांगितले.

Rumawin COMPOSITION :
Each capsule contains : Sallai Guggal 75mg, Kishore Guggal- 75mg, Shudh Shilajeet-40 mg, Nirgundi-40 mg, Maharansnadi Ghana-50 mg, Asgandha-40 mg, Suranjan-20 mg, Kuchla Shudh-20 mg, Triffla-30 mg, Haldi-30 mg, Pippali-20 mg, Gulancha-30 mg, Sundh-30 mg.

याचा मूळ घटक हा Sallai Guggul - म्हणजेच शल्लकी हा दिसतो.
शल्लकी joint pain साठी आता अ‍ॅलोपॅथी मध्ये सुद्धा वापरतात. शल्लकी इंग्रजी नाव: Boswellia Serrata.
त्याचे "enhanced formulation म्हणजे Aflapin. Aflapin च्या गोळ्या बहुदा हाडांचे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात.
मी शल्लकी नावाने आयुर्वेदिक गोळ्या आणि Aflapin दोन्ही वापरल्या आहेत. आठवड्याभरा नंतर त्याचा चांगला परिणाम जाणवु लागतो, आणि मग खूप आराम मिळतो. मला दोन्ही सारखेच effective वाटले.
Rumawin / शल्लकी हे आयुर्वेदिक डॉक्टर आणि Aflapin हे orthopedic doctor यांच्या सल्याने वापरावे.

ओळखीतल्या सिनिअर नर्सने प्रिस्क्राईब केली आहे. त्या बरीच वर्षे या क्षेत्रात असून त्या बरेचदा साबांना वेगवेगळी आयुर्वेदीक औषधे सुचवतात>> Uhoh
पियु, कुणी कितीही अनुभ्वी नर्स असले तरी डॉ़क्टर नाही. आणि नर्सच्या अनुभवात आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान कुठे बसते?

<<स्टेरॉईड बद्दल विचार करावा लागेल पण आयुर्वेदीक गोळ्या नक्की ट्राय करता येतील>> स्मिता श्रीपाद - मला वाटतं अ‍ॅलोपॅथिक औषधे, स्टेरॉईड्स यांचे परिणाम, दुष्परिणाम हे पक्के माहित असतात कारण त्याच्या असंख्य वेळा वैद्यकीय चाचण्या झालेल्या असतात. डोसचे माप आणि परिणाम-दुष्परिणामाचे माप यांचे गुणोत्तर माहित असते. तसे बहुतेक आयुर्वेदिक औषधांचे अजून तरी असे प्रमाणीकरण नाही. बरं वाटतं हे फार सरसकट वाक्य आहे. त्याच्यामागे संख्यात्मक, चाचणी प्रयोग इ. आधार असायला नको का? इथे आयुर्वेद चांगला का अ‍ॅलोपॅथी हा वाद नाही पण औषधाचे परिणाम-दुष्परिणाम चाचणीतून असंख्यवेळा सिद्ध करून बघायचा मुद्दा आहे.
आयुर्वेदिक औषधाने जसा कधी कधी उतार पडलेला बघितला आहे तसाच प्रमाणीकरण न झालेल्या दम्याच्या आयुर्वेदिक औषधात स्टेरॉईड्स असल्याने (आणि पेशंटला माहित नसल्याने) डोसमधे चूक होऊन पेशंट अतिदक्षता विभागात गेल्याची घटना सुद्धा जवळून बघितली आहे.

डेंगु झाला म्हणून दिलेल्या स्टेरॉईडसनी एक २५ वर्षाच्या मुलाच्या तब्येतीची हालत अन नंतर आलेले कायमचे पंगुत्व डोळ्याने पाहीलय. सो बी केअरफुल. पब्लीक.

so in short..." stay away from steroids " for now असं वाटतय मला...
मला शक्यतो औषधे नकोच आहेत....त्यामुळे तेलाने मसाज करणे , शेकणे असे उपाय करते आहे.
भरपूर पाणी पिणे, शक्य तेवढा आराम करणे हेही सोबत चालु आहे.
एका अतिशय खात्रीच्या डॉक्टरांची होमिओपॅथी औषधे नुकतीच सुरु केली.
बघु कसा फरक पडतो ते.
ईथे कळवेनच.

पोळयां भाकर्‍यांच्या नीट वैद्यकीय चाचण्या झाल्या नाय, तेव्हा पासून आम्ही ते खाणे बंद केले हाय. पिझ्झा हा त्यामानाने कित्येक देशात वापरल्या जातो, तो कसा बनवावा, याच्या शास्त्रीय पद्धती हायेत. त्यात उगाच आमचे आजी आजोबा, पणजी पणजोबा तर खायचे असा पारंपारिक अट्टाहास नाय.

काकेपांदा +१
@स्मिता-श्रीपाद- नारळ पाणी व मोसंबी यांचा पण आहारात समावेश करा.
(सांध्या नां लागणारे इलेट्रोलाइट व वीटॅमिन C साठी.)

थ्रेप्टिनची बिस्किट्स (केमिस्ट्कडे मिळतात),चणे+गूळ खा.प्रोटिनसाठी ही बिस्किट्स असतात.

माझ्या बहिणीलापण हा त्रास सुरू आहे. एक महिना झाला.
जे ऐकले आहे त्यावरून ह्यातून पूर्णपणे बाहेर पडायला ५ ते ६ महिने लागतात

माझ्या सासरी आणि माहेरी एकूण ५ ६ जणाना हा त्रास सुरू आहे. सर्वजण पुण्याचेच
मागील वर्षी एकालाच झाला होता. ह्या वर्षी म्हणजे हद्दच झाली आहे

माझ्या ओळखीत असलेल्यांना स्टेरॉईड्स घेऊन बरे वाटले / आराम पडला असे लिहिले आहे.
त्यांनी रेफर केलेल्या डॉक्टरचे नावः
डॉ. संजय राजकुंतवार, अरण्येश्वर मंदीराजवळ, पुणे
काँटॅक्ट नंबरः +91 98231 29428

माझ्या नात्यात ओळखीत अनेकांना हा त्रास झालेला आहे आणि त्यातल्या काही जणांना २ महिने होऊन गेले तरी सांधेदुखीचा त्रास होत आहे, एका व्यक्तीचे तर सारखे पाय सुजतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुर्ण बरे व्हायला वेळ लागेल, सहा महिने देखील. Sad
कोणी विषाणू हल्ला तर केला नसेल ना पुण्यावर ? Uhoh

Sorry Marathi font waparala nahi. Mazya aaicha paay khup dukhat ahe.Tila ekadahi taap ala nahi. Tasech na sahan karany jogya sandhyachya wedana hot ahet. Tests madhe pan kahi sapadat nahi. He gele ek mahina chalu ahe
Ya baddal koni kahi sangu shakel ka?

माझ्या भावोजींना ऑक्टोबर मध्ये चिकन गुनिया झाला होता. खर म्हणजे तेव्हा ताप माईल्ड असल्याने रक्त चाचणी केली नाही आणि चिकन गुनिया असे निदान झाले नाही. पण नोव्हेंबर मध्ये अचानक एक पाय सुजू लागला. आधी बसमधून येताना काही तरी लागल्या मुळे असेल असे वाटले. पण दुसर्या दिवशी प्रचंड सूज आली. मग दुसरा पाय ... हाताची बोटे ... कोपर असे दुखू लागले. तेव्हा डॉक्टर ने तो बहुतेक चिकन गुनिया असावा., रिकव्हर व्हायला २ महिने जातील असे सांगितले.

गेले दोन महिने आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी दोन्ही उपचार चालू आहेत. पौष्टीक आहार सुकामेवा अंडी पालेभाज्या वैगेरे हि सुरु आहे, वय ४२, फिरतीची नोकरी, महिना भर सुटी घेऊन घरी बसलेत. आता जानेवारी संपत आला तरी हि त्यांचे पाय रोज प्रचंड सुजतात . हात त्या मानाने बरे आहेत. काही घरगुती उपाय आहेत का ? कृपया शेअर करावा . पपईचा रस, राईच्या तेलाचा मसाज याने खरंच काही फरक पडतो का ?

Pages