मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही ,मी काय करावे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 November, 2016 - 10:50

नमस्कार मायबोलीकरांनो ,मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मायबोलीची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मायबोलीकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती | 23 November, 2016 - 10:51 नवीन
तुमचं लग्न झालंय का?>>>>>>> पोरीला विहीरीत ढकलू पण शेतकर्याला देणार नाही अशी आजकाल मुलींच्या बापाची मानसिकता आहे.आणि लग्न करुन अजून प्रश्न वाढतील .मुल जन्माला घालायला अक्कल लागत नाही पण सांभाळायला लागते,ती अक्कल कुठुन आणू???

शेतीविषयक जे धागे आलेत आतापर्यंत त्यातून जे साध्य झाले नाही ते या प्रकटनाने साध्य झालय. किती अगतिकता आलीय हे जाणवलं. आमच्यासारखे शेती न करणारे काही मदत करू शकणार नाहीत. उत्तम शेती, मध्यम व्यापार ,कनिष्ट नोकरी हे वाक्य शाळेतल्या फळ्यावर तीन रंगात लिहिलेलं आठवतय. उलट झालय. मोत्यासारखा दाणा वगैरे कविकल्पना, खिल्लारी बैलांची जोडी इतिहासजमा आहे. शेतीचे टिव्हि चानेल्स अमक्याने वांगी लावून असा नफा घेतला अन तमक्याने उजाड माळरानावर डाळिंबांचं विक्रमी पीक घेतलं हे सर्व खोटा प्रचार वाटतो. शेती हा जुगार झालाय. आपला डाव लागतो तेव्हा इतरांच्या हातात एखादी न लागलेली फतरी पानं असतात.

srd ,हे शेतकरी म्हणून केलेले आत्मकथन नव्हे.शेतीवर भाष्य करण्याएवढी अक्कल असती तर इथे ते प्रश्न जरुर मांडले असते.असो ,मि काही समस्या मांडली आहे त्यावर काहि भाष्य करता आले तर बघा.

मला व्यवहार ज्ञान नाही >>> हे मलाही नाही. तुम्हाला बरे वाटावे म्हणून बोलत नाहीये. किंबहुना तुम्ही खरे बोलत आहात की खोटे हे देखील मला माहीत नाहीये तर तुम्हाला बरं वाटावे असे बोलायचा प्रश्नच नाही. पण खरेच मी व्यवहारज्ञानात कच्चा आहे, मला नवीन गोष्टी शिकायचा आळस येतो, मला कोणाशीही स्पर्धा करायला जमत नाही, मी माझ्याच विश्वात रममाण असतो, आणखी काही दिवसांनी मी या जगाच्या कितीतरी मागे पडलेलो असेल, गंमत म्हणजे मला अक्कल नाही असेही बोलू शकत नाही, ती पुरेशी आहे. पण ईतर दुर्गुणांमुळे म्हणा किंवा ईतर गुणांच्या कमतरतेमुळे म्हणा माझ्या मागचे किंवा जे मला वाटतात माझ्या मागे असायला पाहिजे असे कित्येक जण हळूहळू माझ्या पुढे निघून जातात, पुढेही जात राहतील....

आता तुम्हाला वाटेल मी ईथे माझा प्रॉब्लेम सांगतोय आणि हा आपलेच घेऊन बसलाय, तर सांगायचा मुद्दा हा की या सर्वात एकच जमेची बाजू आहे माझ्याकडे, ती म्हणजे मी फार खुश आहे. जशी काही असेना माझी लाईफ एंजॉय करतोय. आणि ती देखील सहज. फारसा विचार न करता. हे सहजतेने जास्त महत्वाचे असते. तुम्ही एखादी गोष्ट तीव्रतेने आठवायचा प्रयत्न करता तेव्हा ती आठवत नाही, तुम्ही डोळे गच्च मिटून झोपायचा प्रयत्न करता तेव्हा ती येत नाही. आनंदाचेही असेच असते. मोठे आनंद शोधू नका, छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जास्त महत्वाच्या असतात, एकदा तुम्ही आनंदी राहायला लागलात की मला वाटते सायकोलॉजीशी संबंधित जे काही आजार विकार आहेत या जगात ते शून्य होऊन जातात.

बाकी जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी अक्कल लागते, व्यवहारज्ञान लागते, वगैरे अंधश्रद्धा आहेत. जगण्यासाठी बस्स जगण्याची जिद्द लागते, आणि मग ती देखील तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आयुष्यावर प्रेम करू लागता Happy

तळटीप - तुम्ही काहीतरी वेगळे विचारलेय आणि मी काहीतरी वेगळेच सांगतोय असे वाटले तर सोडून द्या. मी असेच फारसे लोड न घेता लिहित असतो.

ऋन्मेष +१
बरोब्बर एकदम.
जॅक ऑफ ऑल नी मास्टर ऑफ समथिंग व्हायची गरज का असते? असलीच तर करायचे प्रयत्न. नाही झेपलं तर नाही, बीग डील म्हणायचं!

मी फार खुश आहे. जशी काही असेना माझी लाईफ एंजॉय करतोय. आणि ती देखील सहज. फारसा विचार न करता. हे सहजतेने जास्त महत्वाचे असते. तुम्ही एखादी गोष्ट तीव्रतेने आठवायचा प्रयत्न करता तेव्हा ती आठवत नाही, तुम्ही डोळे गच्च मिटून झोपायचा प्रयत्न करता तेव्हा ती येत नाही. आनंदाचेही असेच असते. मोठे आनंद शोधू नका, छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जास्त महत्वाच्या असतात, एकदा तुम्ही आनंदी राहायला लागलात की मला वाटते सायकोलॉजीशी संबंधित जे काही आजार विकार आहेत या जगात ते शून्य होऊन जातात.

बाकी जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी अक्कल लागते, व्यवहारज्ञान लागते, वगैरे अंधश्रद्धा आहेत. जगण्यासाठी बस्स जगण्याची जिद्द लागते, आणि मग ती देखील तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आयुष्यावर प्रेम करू लागता
>>
+१

सिंजी ,आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोण ठेवा शिवाय तुम्ही शेतीत एवढे गहु लावलेत उस लावलाय . एवढ्या पाच एकर शेतीची तुम्ही देखभाल करताय इतके सगळे चांगले चालले आहे असं विचार पण करा

तुम्ही इथे मांडलेली समस्या गंभीर आहे. तुम्ही मानसोपचार घेत आहात ही चांगली गोष्ट आहे. त्याबरोबर योग, प्राणायाम आणि अध्यात्माची गोडी लावून घ्या. त्यामुळे खरंच खूप फरक पडतो.

लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने
त्याचा मायबोलीवर लिहिण्याशी काय संबंध?

मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते कारण मा़झे तसेच आहे. जिद्दीने अनेक कष्ट करून कसा बसा तरलो आहे - याहून कितीतरी जास्त मला मिळू शकले असते - अगदी डोळ्यासमोर दिसताहेत आयुष्यातले क्षण जेंव्हा अक्कल नसल्याने चुकीचे निर्णय घेतले नि यश मिळाले नाही.

असू दे.
माझी अशी समजूत झाली आहे की स्वतःला सुधारणे हे स्वतःच्याच हातात असते. मा़झ्या बाबतीत मला कळले की मा़झा स्वभाव रागीट, नि प्रत्येक गोष्ट मनाला खोलवर लावून घ्यायची. हे मा़झे. म्हणून मी आता त्या दोन गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. व्यवहारज्ञान म्हणजे कधी कधी डोके शांत ठेवून, विचार करून मग काय ते करावे. फरक पडला मला तरी.
की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
असले काही करू नका. माण्साचा जन्म मिळाला आहे, अक्कल आहे, जरा शांत डोक्याने विचार करा. सगळे ठीक होईल.

संत अमीरखान यांनी थ्री इडीयट सिनेमाट म्हंटलेच आहे - आल इज वेल.
म्हणून मी चहात आलं घालूनच पितो.

हे बघा वर माझ्या प्रतिसादाखाली आलेले प्रतिसाद, असे काहीतरी सेंटी वेंटी लिहिले, फिलॉसॉफी झाडली की लोकांना आवडते. लोकं खुश, आपण खुश, हीच तर मजा आहे जगण्यातील आणी मायबोलीगिरी करण्यातील. दोनचार फसलेल्या लेखांवर मिळालेले शिव्याशाप पचवायची ताकद मग यातूनच तर मिळते Happy
प्रत्यक्ष आयुष्यातही सुखांवर आणि आनंदांवर फोकस कराल तर ते तुम्हाला आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टींना झेलायची ताकद सहज मिळवून देतील.

वर तुम्ही एक लिहिले आहे की आईवडीलांनंतर माझे काय होईल. खरं सांगायचे झाल्यास याचे टेंशन तुमच्यापेक्षा तुमच्या आईवडीलांना जास्त असेल, की आपल्यानंतर आपल्या पोराचे काय होणार. एकदा त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करून बघा, तुमचा या समस्येकडे बघायचा अ‍ॅटीट्यूड बदलून जाईल.

ऋणम्या, कडक प्रतिसाद. बाकी B.Sc फर्स्ट क्लास वाले असे म्हणायला लागले, तर आम्हाला विहीर जवळ करावी लागेल. बाकी व्यवहारज्ञान अन अक्कल वैगरे उपजत कोणाकडेच नसते, जितके अनुभव घेत जाऊ तितकी ती वाढते.
बाकी तुम्ही वर मांडलेल्या परिस्थितीतून खरोखरच जात असाल, तर मला तरी वाटते व्यवहारज्ञान वैगरे अगदी वरवरच्या बाबी आहेत, तुमचा आतला सल काहीतरी वेगळाच असावा. कदाचित एका चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका बसला असावा किंवा जे केले त्याहून बरेच अधिक काहीतरी करायला हवे होते, पण योग्य निर्णय नसल्याने नाही झाले, असे वाटत असावे.
असा मठ्ठपणाचा शिक्का स्वतःवर मारणे, म्हणजे स्वतःच्या निर्णयक्षमतेवर आपल्या हातांनी कुर्हाड चालवण्यासारखे आहे. काही निर्णय चुकतात, तुमचेही बरेच चुकले असतील, म्हणून काय झाले? वाट चुकली, म्हणून मुक्कामाकडला प्रवास थोडीच थांबतो? आपण चालणे सोडत नाही, इतरांना विचारतो, नकाशे पाहतो, अगदीच काही नसेल, तर वाट फुटेल तिकडे पळतो, पण चालणे सोडत नाही.

आजूबाजूला पाहाल तर ध्यानात येईंल, आजवर जितके जण अपयशात कुढत राहिलेत, ते त्यांच्या मठ्ठपणामुळे नाही, तर धोरणलकव्यामुळे.

माझ्या मोडक्या तोडक्या अनुभवावरून तरी मला वाटते, बाकी एकूण एक गुण तुमच्यात नसतील तरी काहीही, अक्षरश: काहीही बिघडत नाही, फक्त निर्णय घेण्याची, प्रयत्न करण्याची, पुढे चालण्याची धमक हवी. चुकल्यासारखे वाटले तर दुसरी वाट निवडण्याची समज हवी.

कुठेतरी वाचलेले आठवले, "परमेश्वराला प्राप्त करण्याचे सामर्थ्य फक्त प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे" .
बाकी तुम्ही याही मनस्थितीतून बाहेर याल; प्रयत्न चालू ठेवा.

रुन्म्या, दोन्ही पोस्टी अतिशय आवडल्या. सिंजी किंवा आमच्यासारख्या भावनाप्रधान लोकांना हे वाचायला फार छान वाटतं अमलात आणायला जमत नाही रे .....
सिंजी समुपदेशकाची मदत घेताय हे चांगलं करताय वेळ लागेल पण सगळे काही व्यवस्थित होईल...

बाकी जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी अक्कल लागते, व्यवहारज्ञान लागते, वगैरे अंधश्रद्धा आहेत. जगण्यासाठी बस्स जगण्याची जिद्द लागते, आणि मग ती देखील तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आयुष्यावर प्रेम करू लागता स्मित
हे सगळ्यात भारी आहे.

तुमच्या http://www.maayboli.com/node/60915 इथल्या पोष्ट वरुन तरीतुम्ही या धाग्यावर जे काही म्हणताय ते खरं आहे असे वाटत नाही. की नुसती सहानुभुती मिळवण्यासाठी हे उपद्व्याप आहेत

वैभव ,प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक कंगोरे असतात,त्यातील लैंगिकता या बाबतीत अक्कल लागत नाही.आहार ,निद्रा ,भय ,मैथुन हे उपजतच दिलेले गुण आहेत.

Pages