आरोग्य

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:06

कर्कोपचार

अनेक कर्करुग्णांना त्यांच्या आरोग्यनिगेबाबत निर्णय घेण्यात सक्रिय सहभाग हवा असू शकतो. तुमचा रोग आणि त्यावरील उपचारांचे पर्याय यांबाबतचे सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, निदानापश्चातचा धक्का आणि तणाव हे सोसण्यास अवघड असतात. त्यामुळे डॉक्टरला विचारायच्या सर्व गोष्टी लक्षात येणेच कठीण असते. म्हणून डॉक्टरांची भेट ठरविण्यापूर्वीच त्यांना विचारायच्या प्रश्नांची एक यादीच करून ठेवणे सोयीचे ठरत असते.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:02

कर्काकरताचे धोकेघटक

डॉक्टर्स अनेकदा हे सांगू शकत नाहीत की एखाद्या व्यक्तीस कर्क का व्हावा आणि इतर एखाद्या व्यक्तीस तो का होऊ नये. खाली, कर्काकरताचे सर्वात प्रचूर असलेले धोकेघटक दिलेले आहेत.

१. वयोमान
२. तंबाखू
३. सूर्यप्रकाश
४. मूलककारी प्रारण
५. काही रसायने व इतर पदार्थ
६. काही विषाणू आणि जीवाणू
७. काही उत्प्रेरके
८. कर्काबाबतचा कौटुंबिक इतिहास
९. मद्यार्क
१०. निकृष्ट आहार, शारीरिक सक्रियतेचा अभाव किंवा स्थूलता

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 21:58

७०% कर्करोग टाळता येण्यायोग्य असतात असे दूरदर्शनवरील सह्याद्रीवाहिनीच्या एका कार्यक्रमात नुकतेच सांगितले गेले. मात्र पुरेशी माहिती नसेल तर तो टाळणे शक्य होत नाही.

कर्काबाबतच्या आधिकारिक आणि अचूक माहितीचा पुरवठा सातत्याने करणारी "जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंटस " ही अशीच एक अशासकीय संस्था, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आवारात एक बुकस्टॉल चालवत आहे. त्यांच्याकरता केलेला एका पुस्तिकेचा मराठी अनुवाद, इथे लोकहितार्थ प्रस्तुत करत आहे.

http://shabdaparyay.blogspot.in/2013/06/blog-post_27.html
ह्या दुव्यावर अवघड शब्दांचे अर्थ अल्फाबेटिकली आणि अकारविल्हे रचून उपलब्ध केलेले आहेत.

आज व्यायाम केला ?

Submitted by विजय देशमुख on 24 June, 2013 - 22:16

खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.

मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.

विषय: 
शब्दखुणा: 

कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार

Submitted by मनू on 24 June, 2013 - 02:36

काल कोलेस्ट्रोल लेवल चेक केली तर ldl कोलेस्ट्रोल जास्त आले आहे.
तर ते कमी करण्यासाठी आहारात काय घ्यायला हवे आणि काय कमी / बंद करायला हवे याची माहिती हवी आहे.

विषय: 

सपोर्ट ग्रुप - मस्क्युलर डिसट्रॉफी

Submitted by मेधावि on 8 June, 2013 - 06:17

माझ्या मैत्रिणीच्या ५ वर्षाच्या मुलाला मस्क्युलर डिसट्रॉफी हा आजार झालाय. हा जेनेटीक आजार असून एक्स गुणसुत्रातून म्हणजे आईकडून तो नवीन पिढीत संक्रमीत होतो. विशेष म्हणजे हा फक्त मुलांनाच होतो. मुलींना नाही होत. त्या (मुली) कॅरीअर्स असतात व नंतर त्यांच्या मुलांना तो होऊ शकतो. ह्या आजारात नवीन स्नायू बनत नाहीत व आहेत ते स्नायू हळूहळू दुर्बल होत जातात व हळूहळू तो माणूस अपंग होत जातो.

विषय: 

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

Submitted by चिन्गु on 27 May, 2013 - 07:25

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?
मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे साधारण किती खर्च येईल?

विषय: 
शब्दखुणा: 

बायपास सर्जरी

Submitted by ChaitanyaKulkarni on 26 May, 2013 - 06:21

माझ्या वडिलांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. त्यांना १५ वर्षांपासून मधुमेह आहे. १.५ वर्षांपुर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता (डॊ. सांगण्यानुसार तो कमी तीव्रतेचा होता). पुण्यातला दोन डॊ. नी बायपासच करा असे सांगितले आहे, पण आम्हाला शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही अडचणी येऊ शकतात का? एंजेओप्लास्टी करून फ़रक पडेल का? असे प्रश्न पडले आहेत.
वय - ५९

विषय: 

सायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल)

Submitted by आशुचँप on 12 May, 2013 - 12:47

गेल्या काही भागात दिलेल्या माहीतीचा काही जणांना तरी सायकल घ्यायला मदत झाली असेल. आता सायकल खरेदी झालीये, बरोबर एक्सेसरीज पण घेतली आहे. आता काही सायकलींगच्या आणि मेंटेनन्सच्या टीप्स....
एक सूचना - मी काही यातला तज्ञ वगैरे नाही. आंतरजालावर माहीती घेऊन आणि माझे काही अनुभव असे मिळून माबोकरांसाठी मी ही माहीती देत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य