मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

There are many males who intrinsically hate the concept of
rape, and are incapable of committing it even in fantasy. On
the other hand, there are many who are "on the other hand">>>>>>. हे on other hand ला जे आहेत त्यांची संख्या वाढीस लागली आहे असे आपल्याल वाटत नाही काय?

पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.>>> फक्त पुरूषालाच असे वाटते हे कशावरून ठरवले ?

पहिल्या दोन पॅरॅग्राफ्स ना अनुमोदन पण त्या नंतर थेट पॉलिगमस नेचरकडे घेतलेली उडी खुप शॉर्ट साईटेड आहे. जोडीदार असावा असं वाटणं आणि मिळाला नाही म्हणून अशी काही कृत्यं करणे ह्यात फार मोठा फरक आहे. तुम्ही लिहिलं ते दमन, बॉटल्ड अप ह्या अर्थानी असेल तर ते अगदी बरोबर आहे. तसे जर इमोशन्स इच्छा दबून राहत असतील तर त्या अशा भयानक स्वरुपात कधी कधी बाहेर येतात.
ज्या मुलांना मोठं होत असताना लैंगिकता ह्या विषयात योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यातले काही जण पुढे जाऊन अशी कृत्यं करतात.
ऑनेस्टली सांगायचं तर भारतासारख्या देशात खुप अवघड आहे सगळ्याच स्तरातल्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणे. जास्तीत जास्त सरकार शिक्षण देऊ शकतं, सुरक्षा व्यवस्था वाढवू शकतं. खरं शिक्षण घेऊन सुद्धा कित्येक लोकं लैंगिकता ह्या विषयाबाबत अगाध असतात.

पुरूषांनी polygamy करताना ती तशी स्त्रियांना पण करायला लागेल हे लक्षात आलं असेलच. आपला समाज तेवढा ओपन आहे का?

या सुचवलेल्या सिस्टिम मधे एखाद्या पुरूषाने दमनासाठी polygamy करायची ठरवली पण त्याला एखाद्या स्त्रीने संमती दिली नाही तर तो पुरूष बलात्काराकडे वळणारच नाही का? हे polygamy बद्दल ठरवणं एकतर्फी आहे असं नाही वाटत?

सगली मांडनी पुरुषाच्या बाजुने केली आहे, भारतात कित्ती स्त्रियांचे दमन होत नसेल . त्या नाहीत ब-या बलात्कर करत ? पुरुषी वर्चस्वादातून केली आहे मांडनी.

माझ्यामुळे तुमची महत्वाची चर्चा भरकटू नये म्हणून मी पोस्ट डीलीट करत आहे.
जरा वेगळा विचार - तो देखील 'समजा' असं लिहून हायपोथीसीस म्हणून - मांडला तरीही लिहिणार्‍याला निंद्यनीय वगैरे म्हणून गप्प करण्यात तुमचा वेळ आणि बुद्धी वाया जायला नको म्हणून पोस्ट डीलीट करत आहे.
कदाचित मी चुकीचा प्रश्न चुकीच्या लोकांसमोर मांडला. माय बॅड. गुड लक विथ युर चर्चा Happy

असाही विचार येतो की समजा स्त्रीयांनी बलात्कार होत असताना एका लिमीट नंतर ती सेक्स्युअल प्रोसेस एंजॉय केली, प्रतिकार न करता, तर बलात्कार करणार्‍या माणासाची मानसिकता बदलेल का? >>>>>> यु बेटर बी केअरफुल व्हॉट यु से. You need to think through this before you make a comment like that. It almost makes me think if you really know how sex works? For a woman who doesn't want to have sex with someone, the process isn't the same at all. Not enjoyable at all but painful because the body will not work the same when you are in a distressed situation. Its hard to imagine but this effect gets multiplied if there are more men involved. Forget painful it is downright barbaric. Also, this is only the physical part and there are a whole range of psychological effects that follow after, which can potentially devastate your life.

वरील मुद्द्यांशी सहमत नाही. भारतीय समाजातील अशा घटनांच्या वाढीची कारणे माझ्यामते अशी आहेतः

१. लैंगिक शिक्षणाचा अभाव
२. स्मार्ट्फोन्समुळे सहजी उपलब्ध असलेले पॉर्न.
३. सारासार विवेकबुद्धीचा अभाव. कमी शिकलेले, क्षुल्ल्क धंदापाणी करणारे लोक असले उद्योग करतात.
४. कमकुवत कायदे, ज्यांची कुणास काहिच जरब नाही.
५. पोलिस पॅट्रोलचा अभाव. अशा घटना सार्वजनिक ठिकाणी घडतात तेव्हा कायदा, सुव्यवस्था असते कुठे?

बुवा, त्यातला 'समजा' हा शब्द लक्षात घ्या. मी एक हायपॉथीसीस मांडतीये, एक पॉसीबीलीटी.
आत्ता ह्या घडीला तसंही बलात्कार होत आहेतच. हे असं काही झालं तर त्याचे परीणाम काही वेगळे होतील का? हा विचार मांडतीये. एक थीयरी. कदाचित एक प्रश्न. आणि ते उपस्थित करणं मला आवश्यक वाटतं.

@सपना हरीमामे ,पुरुषी मानसिकतेतुन धागा काढला नाही आहे ,बलात्कार का होत आहेत ,पॉलिगॅमीचं असणारं पुरुषी आकर्षण या अनुषंगाने एक मत मांडले आहे फक्त.
@rmd अर्थात ,स्त्रीयांनाही मुक्त लैंगिक व्यवहारात पॉलीगॅमी करावी लागेल ,फक्त ती व्यवस्था अन्यायी नको तर परस्पर सहमतीची असावी.
@rar कोणतीही स्त्री बलात्कार एजॉय करत नाही,यु नीड टु चेंज युअर स्टेटमेंट.

मला परिच्छेद सहा मधे लिहिलेला उपाय योग्य वाटतो . बदलत्या काळानुसार पुरुषांच्या
दृष्टिकोनात बदल घडवणे आवश्यक आहे. त्यानुसार जन्माला आल्यापासून त्यांचे प्रबोधन करावे. जुन्या
संस्कृतीचा उगाचच अभिमान गाऊ नये. जिथे स्त्रीला किंमत नाही. त्याचप्रमाने दारिद्र्य नष्ट करणं आवश्यक आहे. प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. किंबहुना प्रत्येक हाताने काम केलेच पाहिजे असे बंधन असायला हवे.
म्हणजे इतर फालतु गोष्टी करण्यास कमी वेळ मिळेल .अर्थातच या उपायांची व्यावहारिक शक्यता पडताळून पाहाय्ला हवी.

.

रार, आय हॅव नथिंग मोअर टु से. हायपोथेटिकली बोलताना सुद्धा आपण लॉज ऑफ बायॉलॉजी अ‍ॅण्ड सायकॉलॉजीला धाब्यावर नाही ना बसवू शकत?

.

>>असाही विचार येतो की समजा स्त्रीयांनी बलात्कार होत असताना एका लिमीट नंतर ती सेक्स्युअल प्रोसेस एंजॉय केली, प्रतिकार न करता, तर बलात्कार करणार्‍या माणासाची मानसिकता बदलेल का?>> सिरीयसली रार?

स्रीने मुळात तिच्यावर बलात्कार होतोय हेच डीनाय केलं तर?>>>>>>>>कस डीनाय करेल ,निर्भयाबरोबर जे प्रकार घडलेत ते इथे देऊ शकत नाही, असल्या गोष्टी कोण्नतीही स्त्री डिनाय करेलच,साधा परपुरुषाचा आगंतुक स्पर्श नको असणारी स्त्रीची मानसिकता असते हे तुम्हाला स्त्री असल्याने ठाउक असेलच .

नवलच वाटतेय रार या आयडीची अत्यंत अतर्क्य आणी निषेधार्थ कॉमेंट वाचुन.

असाही विचार येतो की समजा स्त्रीयांनी बलात्कार होत असताना एका लिमीट नंतर ती सेक्स्युअल प्रोसेस एंजॉय केली, प्रतिकार न करता, तर बलात्कार करणार्‍या माणासाची मानसिकता बदलेल का? ----

निंदनीय! बलात्कार करणार्या माणसाला अजुनच हिंमत येईल आणी तो अजुन अशी क्रुत्ये करेल. -

आणि हे तुम्हाला गप्प करायला लिहिले नव्हते तर तुमच्या मुद्द्यावर माझे मत म्हणुन लिहिले होते. इतरांनी लिंक्स, तुमच्या विधानामागील कारणे, कुठ्ल्या लिमिट नंतर एंजॉय करावे असे विचारले आहे. ही उत्तरे तुमच्याकडे नाहीत म्हणुन तुम्ही पळ काढलात का?

>>> असाही विचार येतो की समजा स्त्रीयांनी बलात्कार होत असताना एका लिमीट नंतर ती सेक्स्युअल प्रोसेस एंजॉय केली, प्रतिकार न करता, तर बलात्कार करणार्‍या माणासाची मानसिकता बदलेल का?

Uhoh
ती कुठली लिमिट तेही सांगा कृपया.

.

ओह हे ऑलरेडी युरोपात अभ्यासलं जातंय म्हणजे हा आऊट ऑफ द बॉक्स विचार कोणीतरी केला आहे आणि तुम्ही इथे नुसतं रिपोर्टिंग करताहात तर.
ओके, लेट्स नॉट शूट द मेसेन्जर देन.

इंटरनेट्वरुन अकलेचे डोस घ्यायची सवय नाही मला. स्त्रीवरील बलात्कार हा नुसताच शारिरीक नसतो. तिच्या स्वाभिमानावर, स्वत्वा वर असतो. अनोळ्खी, दारुडे, गलिछ लोक नुसते हात लावु पाहतात तेव्हाही संताप संताप होतो. बलात्कार्याची मानसिकता बदलावी म्हणुन स्त्रीने ती सेक्स्युअल प्रोसेस एंजॉय करावी हे अतिशय निंदनीयच आहे. --

आणि हे तुम्हाला गप्प करायला लिहिले नव्हते तर तुमच्या मुद्द्यावर माझे मत म्हणुन लिहिले होते. इतरांनी लिंक्स, तुमच्या विधानामागील कारणे, कुठ्ल्या लिमिट नंतर एंजॉय करावे असे विचारले आहे. ही उत्तरे तुमच्याकडे नाहीत म्हणुन तुम्ही पळ काढलात का?

ओह हे ऑलरेडी युरोपात अभ्यासलं जातंय म्हणजे हा आऊट ऑफ द बॉक्स विचार कोणीतरी केला आहे आणि तुम्ही इथे नुसतं रिपोर्टिंग करताहात तर.
ओके, लेट्स नॉट शूट द मेसेन्जर देन.---

ओके नो मोअर शुटींग द मेसेंजर.

सिंथेटिक जिनीयस

मोबाईल वरून लिहीणे अशक्य झाल्याने तात्पुरती बाहेर पडले होते.
तुम्ही पुरुषी मानसिकतेतून धागा काढलाय असे मी केव्हां म्हटलेय ? तुमचे गृहीत धरणे हे ती मानस्किअता दर्शवते. त्या पुढचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा म्हणजे कदाचिअत कळेल.

निर्भयाने तिच्यावर झालेला बलात्कार हा बलात्कार न मानता कॅज्युअल सेक्स विथ सम रँडम मेन मानला असता तर आणि वर एन्जॉय केला असता तर तिच्याबरोबर जे झालं ते टाळता आलं असतं का?

माझा प्रश्न निंद्यनीय आणि अतर्क्य वाटतोय ना? मग दुर्लक्ष करा की त्याकडे. त्यावर उत्तर देण्यात तुमची बुद्धी आणि अमूल्य वेळ वाया घालवू नका प्लीज. मूळ लेखातल्या प्रश्नांवर चर्चा करा. निदान चर्चा भरकटणार नाही. ---

मुळ लेखावर मी माझे मत आधीच दिले होते.

रार , यांच्या मत मांडण्याच्या स्वातंत्र्याशी मी सहमत आहे, पण ते मत सध्या तरी पटण्ञासारखे नाही. आय मीन झेपणेबल दिसत नाही. कदाचित त्या सोसायटीत सुट होईल असा विचार केला तरीही नाहीच पटत...

पिंकची मांडणी कितीही ककच्चीकच्चीअसली त्या सिनेमाने मेसेज पोहोचवलाय. धागा काढना-याने पिंक पाहिला तर इथे लोक काय म्हणताहेत ते त्यांना समजेल.

Pages