अ‍ॅपल सायडर व्हिनेगरविषयी

Submitted by मंजूडी on 17 November, 2016 - 23:22

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी, सौंदर्यवृद्धीसाठी बहुपयोगी आहे अशी माहिती वाचनात आली आहे. केस आणि त्वचेचा पोत सुधारणे याबरोबरच वजन कमी करणे, ब्लड प्रेशर आणि डायबेटिस नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी अत्यंत गुणकारी आहे अशी केवळ माहिती मिळाली आहे, तज्ज्ञांचा सल्ला मिळालेला नाही.

तर, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या वापराची माहिती, अनुभव, उपलब्धता, परीणाम, दुष्परीणाम यांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाचलं होतं कि अ‍ॅपल सायडर विथ मदर चांगलं असतं पण जास्त प्रमाणात घेतलं गेलं कि अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. फेसबुक वर एक फक्त मुलींचा ग्रुप आहे beautiful Brown bodies असा, त्यात बरंच डिस्कशन झालं होतं.

मध नाही.

From wiki -
Mother of vinegar is a substance composed of a form of cellulose and acetic acid bacteria that develops on fermenting alcoholic liquids, which turns alcohol into acetic acid with the help of oxygen from the air. It is added to wine, cider, or other alcoholic liquids to produce vinegar.

परवा एक प्रयोग पाहिला. एका भाण्ड्यात थोडे व्हिनेगर घेतले .. त्यात एक हाड टाकलं. २/३ तासानी ते बाहेर काढलं तर ते लवचिक झालं होतं. (व्हिनेगर कॅल्शियम खातं).. तेव्हा हे घेण्यापूर्वी खात्री करून घ्या. उगाच हाडे ठिसूळ होऊन मोडुन पडायला लागली तर 'लेने के देने' म्हटल्यासारखे होईल...

दररोज एक चमचा ACV आणि एक चमचा लिंबू रस एका मोठ्या ग्लासभर पाण्यातून!

बेस्ट वे टू स्टार्ट युअर डे!

Helps to alkalize your body as most health issues arise and develop in acidic environment.

ACV does cause problems with calcium with overuse. Please rinse mouth after drinking as it will harm teeth enamel if not washed away.

Helps to alkalize your body as most health issues arise and develop in acidic environment.

>> व्हिनीगर तर अॅसिडीक असते ना? मग त्याने शरीर. Alkalize कसे होईल?

ACV is the only vinegar that is alkaline forming as opposed to other vinegars. You will find more details on the net or at your doctors.

एका मित्राकडून अ‍ॅपल सायडर व्हिनिगर बद्दल कळाले. हा मित्र गेली काही वर्षे नियमित अ‍ॅपल सायडर व्हिनिगर घेतो आहे आणि त्यामुळे त्याची ब्ल्ड शुगर, बाकी इतर गोष्टी नियंत्रणात आहेत. अ‍ॅपल सायडर व्हिनिगर विथ मदर हेच घ्यावे (इतर प्रकारचे नाही) असे त्याचे ठाम मत आहे. "विथ मदर" असलेले व्हिनिगर जुन्या पारंपारीक पद्धतीने करतात त्यामुळे त्यात थोडी गढूळता (आणि थोडेसे धागे ) असतात ज्याला मदर म्हणतात. "मदर" नसलेले व्हिनिगर पाण्यासारखे पारदर्शक असते.

मी स्वतः १० दिवस घेतले आहे. सकाळी उठल्यावर १ चमचा पाण्यातून. माझा सगळ्यात प्रकट दिसलेला अनुभव म्हणजे भूक कमी लागते आणि लवकर पोट भरल्यासारखे वाटते. पण काही दिवसानी त्याचा खूप कंटाळा यायला लागला आणि मानसिक दृष्ट्या ते नकोसे वाटायला लागले. मी त्या मानसिकतेवर मात करू शकलो नाही. त्यात मधेच आलेल्या प्रवासामुळे ते घेणे बंद होण्यासाठी एक कारण मिळाले.
त्यामुळे आता घेत नाही. मला त्यापेक्षा साखर सोडणे सोपे गेले. अ‍ॅपल सायडर व्हिनिगर घेणे परत सुरु करायला हवे असे बरेच दिवस ठरवतो आहे.

blood sugar साठी आणि एक सोपा supplementary उपाय म्हणजे सकाळी काही खायच्या आधी सफरचंद खाणे.

लहान मुलांना दिले तर चालेल का? मला मुलीचे वजन कमी करण्यासाठि वापरायचे आहे तीचे वय ८ आहे. चालेल का तीला दिले तर?

गुलबकावली,
८ वर्षाच्या मुलीला योग्य आहार आणि व्यायाम योग्य राहील. एवढ्या लहान मुलीबाबत नुसतं वजन कमी करणे हे ध्येय नसावे तर योग्य जीवनशैलीची सवय लावावी जी आयुष्यभर साथ देइल.

नवर्‍याच्या मित्राला किडनी स्टोनचा त्रास होता. महिनाभर रात्री झोपताना १ औस अ‍ॅपल सायडर पाण्यात घालून प्यायल्याने त्रास गेला.
नवर्‍याच्या फ्रेंड सर्कल मधे बरेचजण अ‍ॅपल सायडर विनेगर फॅन आहेत. वजन कमी करण्यासाठी यातील बरेच जण ब्रेड खात नाहित आणि जोडीला दालचिनी पावडर खातात.

मी डॉ. पाटकरांचे अ‍ॅपल सायडर विथ मदर वापरतो. मला डायबेटीस आहे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवयाला याचा चांगला उपयोग होतो आहे. वजन नियंत्रणात राखायला मदत होत आहे , इतर ही बरेच फायदे आहेत. डॉ. पाटकरांचे व्हिनेगर ईतरांच्या पेक्षा महाग (दुप्पट) असले तरी दर्जेदार आहे.

रोचिन , डॉ. पाटकरांचे व्हिनेगर आमेझॉन वर मिळेल. विथ मदर वाले व्हेनेगर रुपये ५५० (५०० मि.लि) , अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चे दोन प्रकार मिळतात , फिल्ट्र्ड (मदर विरहीत) आणि मदर सहीत. साधे (मदर विरहीत ) स्वस्त असते पण औषधी उपयोगा साठी मदर वाले व्हिनेगर्च हवे.

http://www.amazon.in/Dr-Patkars-Apple-Vinegar-Mother/dp/B019CLHFNC?ie=UT...

इतर ही बरेच ब्रॅन्डसआहेत , मी दोन -चार वापरुन बघितले पण पाटकरांचे सगळ्यात चांगले वाटले, महाग असले तरी तेच वापरत आहे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेतल्यामुळे जे काही फायदे आहेत, त्यांचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. संशोधकांना या व्हिनेगरामुळे आजार बरे होण्याचे योग्य पुरावे मिळालेले नाहीत. किंबहुना अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा मधुमेह, अर्थ्रायटीस या आजारांत उपयोग नाही, असे निष्कर्षही निघाले आहेत. (http://www.sciencedirect.com/science/article/pii/S0271531784800494). अ‍ॅपल सायडर व्हिनेगरामुळे मधुमेहात फायदा होतो, असं सांगणारे काही पेपर आहेत, पण ठाम निष्कर्षासाठी ते पुरेसे नाहीत. मधुमेहासाठी गोळ्या / इन्सुलिन घेत असाल, तर असे घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण या व्हिनेगरामुळे gastroparesisचा त्रास होऊ शकतो, असं काही संशोधकांना आढळलं आहे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरात साधारण १०%पर्यंत अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड असतं. तेव्हा वर्षानुवर्षं रोज हे पोटात घेऊ नये, असं सुचवेन. शिवाय पोटात घेताना दातांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्या. नंतर खळखळून चुळा भरा.

चिनुक्स,

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर बद्दल (किंवा इतर कोणत्याही बाबतीत) इंटरनेट वर दोन्ही बाजू मांडल्या गेल्या आहेत फॉर आणि अगेंन्स्ट ,

तुम्ही इंटरनेट वरचे वाचून निष्कर्ष काढला आहे असे मला वाटते कारण तसे नसते तर .. मी वापरले पण फारसा उपयोग झाला नाही ... असे आपण लिहले असते!

शेवटी अनुभव हाच खरा मला तो आला आहे , माझी रक्तशर्करा नियंत्रणात आहे आणि त्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा हातभार लागत आहे हा माझा अनुभव आहे , गेल्या बारा वर्षात डायबेटीस साठी मी असंख्य नुस्के प्रयत्न करुन पाहीले आहेत , त्यातले जे मोजके परिंआमकारक ठरले आहेत त्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आहे.

हाच फरक आहे आपल्या आणि माझ्या लिहण्यातला !

कोणतीही गोष्ट मर्यादेतच असावी , अ‍ॅपल सायडर व्हिनेगर त्याला अपवाद कसे असेल ? एखादा चमचा रोज घेतल्यास दु:षपरिंणाम होणार नाहीत.

suhasg,

<हाच फरक आहे आपल्या आणि माझ्या लिहण्यातला>

नाही, फरक हा आहे की मी रसायनं हाताळतो आणि वापरतो. वरील माहिती 'इंटरनेट वरचे वाचून' लिहिलेली नाही.

मधुमेह हा 'असंख्य नुस्के' वापरून आटोक्यात आणण्याचा रोग नाही. आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल, अशी आशा आहे. Happy

चिनुक्सजी,

नका त्रास करून घेऊ.

फक्त ५५० रुपयांचीच तर बात आहे.

माझ्या मूर्ख डॉक्टरपेक्षा मला इंटरनेट वाचून जास्त कळतं, अन मी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पिऊन शुगर कंट्रोल करू शक्तो, हा खरा मुद्दा आहे.

तेव्हा चिल्ल.

"माझ्या मूर्ख डॉक्टरपेक्षा मला इंटरनेट वाचून जास्त कळतं"

या वाक्याची करोलरी का काय म्हणतात ती ही :

माझ्या मूर्ख डॉक्टरपेक्षा मला जास्त कळतं, हे इंटरनेट वाचल्यावर प्रूव्ह झालंय, अशी माझी खात्री आहे. "I bet my life on it!"

चिनूक्स यांचे म्हणणे बरोबर आहे. याबाबतीत वैद्यकीय पुरावा अजून नक्की मिळाला नाही.

मला स्वत:ला (प्र्त्यक्ष १० दिवस वापरल्यावर) असे वाटते की अ‍ॅपल सायडर व्हिनिगरचा, भूक कमी लागणे हा एक मुख्य परिणाम, इतर मधुमेह वगैरे आटोक्यात ठेवण्यासाठी उपयोगी पडत असावा. म्हणजे उद्या दुसर्‍या कुठल्याही उपायामुळे भूक आटोक्यात ठेवता आली तर त्यामुळे होणारा फायदा सारखाच असेल.

चिनूक्स, झाडू +१ ( एसिवि घेऊ नये ह्याबाबत).

अजय, बरोबर आहे. मी पण टिव्हीवर मध्यंतरी अ‍ॅपल सायडर विषयी माहिती एकली पण प्रयोग नाही केला. मी सकाळी उठल्यावर
सरळ गरम्/कोमट पाण्यात लिंबू पिळतो आणि ते पीतो. तेवढ्या पुरतं का होईना पण सकाळी उठल्यावर जी एक भूक लागल्याचे फीलिंग येतं, ते येत नाही. नंतर जेवायच्या वेळे पर्यंत अधून मधून पाणी पीत राहिलं तरीही भूक फारशी लागत नाही. एकदा सवय झाली की आणखिन सोपं पडतं.

सरळ गरम्/कोमट पाण्यात लिंबू पिळतो आणि ते पीतो. तेवढ्या पुरतं का होईना >>>>>>>> पण नेहमी लिंबूपाणी घेतले तर ते हाडांना वाईट असते ना?