क्रीडा

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

Submitted by मार्गी on 28 March, 2019 - 09:35

३: मंद गतीने पुढे जाताना

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे.

गगनात न मावणारा गगनातला आनंद - पॅराग्लायडिंगचा अनुभव

Submitted by सोनू. on 12 March, 2019 - 09:04

उडायची इच्छा कोणाची नसते? विमानातून गेल्यावर हेलिकॉप्टरमधे बसावसं वाटतं आणि मग तर वाटतं की आपणच उडावं मस्त पक्ष्यांसारखं. समुद्री खेळ खेळताना बोटीतून पॅराग्लायडिंग केलं होतं ज्यात ग्लायडर बोटीला बांधलेलं असतं नी आपण त्याबरोबर हवेत उडत असतो. तो छोटासा अनुभव आवडला होता आणि कधीतरी त्या दोरीचे बंधन तोडून आपले आपण हे पंख घेऊन उडायचं नक्की केलं होतं. पुण्या-मुंबईत कित्येक वर्षे राहत असूनही कामशेतला हे उडायचे धडे घ्यायचं सुचलं नाही. दूर गेल्यावर जाणवलं आणि सुट्टीत घरी आल्यावर उडायचं नक्की केलं. पण मला ते डबल सीट tandem पण नव्हतं उडायचं, एकटीने आपल्याआपण उडायचं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

Submitted by मार्गी on 25 January, 2019 - 06:04

२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

Submitted by मार्गी on 21 January, 2019 - 06:36

१: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

नमस्कार! काल २० जानेवारीला मुंबईत पहिली मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ किलोमीटर पूर्ण करण्यासाठी ५ तास १४ मिनिट लागले. फार अद्भुत अनुभव होता हा. अतिशय रोमांचक आणि विलक्षण! ह्या अनुभवासंदर्भात आणि माझ्या धावण्याविषयी- 'पलायनाविषयी’- कशी सुरुवात झाली ह्यावर सविस्तर लिहिणार आहे.

प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?

Submitted by पाटलीण बोवा on 19 January, 2019 - 22:40

प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?

१. जिम लावावी, बॉडी बिल्डींग करावे
२. कवी/ कवयित्री व्हावे
३. व्यसनी व्हावे
४. दुनियेला आग लावावी

कृपया नीट सल्ला द्या. विषय अत्यंत नाजूक व गंभीर आहे. पालतूगिरी करू नये.
( फालतू लोकांनी इकडे फिरकूच नये )

शब्दखुणा: 

मैत्रीण आणि प्रेयशी ( बायको पण)

Submitted by किरणुद्दीन on 11 October, 2018 - 06:36

मैत्रिण म्हणजे
लालूंच्या भाषणातल्या हेमाच्या गालांसारखी मलमल
धावपळीच्या दिवसांत अटलबिहारींच्या भाषणातल्या पॉजसमान अवखळ

प्रेयशी म्हणजे
चिंता ओळखून फसवं आश्वासन देणा-या शरद पवारांसारखी शुभ्रमेघ
कशावरूनही रूसून बसणा-या अण्णा हजारेंसारखी पाषाणावरची रेघ

मैत्रिण म्हणजे
अचानक प्रधानमंत्री बनलेल्या देवेगौडांसारखे अनपेक्षित जग
मोदींच्या जुमल्यांप्रमाणे कधीही न बरसणारा फसवा ढग

प्रेयशी म्हणजे
चिडली कि वंदना खरेंवर घसरलेल्या कणेकरांसारखी बोटाळ
हसली कि दवणिय कवितेतल्या डायबेटिक वर्णनांसारखी मधाळ

शब्दखुणा: 

STP - सिअ‍ॅटल टू पोर्टलँड सायकल राईड

Submitted by Adm on 6 August, 2018 - 01:53

शेकडो/हजारो मैल अंतराच्या अनेक सायकलास्वार्‍या करणारे मायबोलीकर असताना आपल्या एकदाच केलेल्या दोनशे मैलांबद्दल काय लिहायचं असं आधी वाटलं. पण शेवटी ममव असल्याने भविष्यातल्या स्मरणरंजनाची सोय करण्यासाठी आत्ता केलेलं हे 'डॉक्युमेंटेशन'.

-----

विषय: 
शब्दखुणा: 

डॉ. अमित समर्थ - अशक्य ते शक्य करिता सायास

Submitted by हर्पेन on 24 July, 2018 - 04:01

आज २४ जुलै २०१८ रोजी 'रेडबुल ट्रान्स-सैबेरियन अल्टीमेट स्टेज सायकल रेस', मॉस्को शहरातून चालू होत आहे. जगातील सर्वात जास्त लांबीच्या आणि सगळ्यात खडतर मानल्या जाणार्‍या ह्या स्पर्धेचे हे तिसरेच वर्ष आहे. एकूण ९२०० किमी, हो, नऊ हजार दोनशे किमी लांबीच्या ह्या रेस मधे १५ टप्पे असतील. सगळ्यात कमी अंतराचा टप्पा ३०० किमीचा तर सगळ्यात मोठा तब्बल १४०० किमी लांबी असलेला आहे. एकूण २५ दिवसांनंतर ही रेस, व्लादिवोस्तोक येथे संपेल. ही रेस टूर द फ्रान्स च्या तिप्पट आणि 'राम' अर्थात रेस अक्रॉस अमेरिकेच्या जवळजवळ दुप्पट लांबीची आहे.

विषय: 

तीन क्रीडारत्न

Submitted by भागवत on 22 July, 2018 - 01:26

मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्रीडा