दोनच वर्षांपूर्वी पुण्याला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये भारतात आज ज्युनिअर गटाच्या क्रमवारीत नंबर २ आणि महिलांच्या गटातील क्रमवारीत नंबर २१ वर असणाऱ्या नवी मुंबईच्या आकांशा नित्तुरेची गाठ पहिल्याच फेरीत यावर्षीची यूएस ओपनची विजेती एमा राडूकानू हिच्याशी पडली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर फार कमी अनुभव असणारी सोळा वर्षीय आकांशा हरली खरी पण तो अनुभव तिला फार काही शिकवून गेला.
प्रश्नाचे उत्तर मिळाल्यामुळे संपादित...
ह्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला एक पदक मिळाले आहे . मेरी कोम आज दुर्दैवाने हरली . ऑलिंपिक संदर्भात चर्चेसाठी हा धागा
तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची म्हणजे या आठ्वड्यात आमच्यापासुन ३ तासाच्या ड्राइव्हिंग अंतरावर ओमाहा, नेब्रास्का इथे यु एस ऑलिंपिक्स स्विम टिमची निवड चालु आहे ऑलिंपिक्स ट्रायल्स मधे. तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की या शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकीटे मिळवण्यात मी यशस्वी झालो आहे. त्या दिवशी संध्याकाळच्या सेशनमधे केलब ड्रेसल( ज्याच्याकडुन अमेरिका टोकियो ऑलिंपिक्स मधे ७ सुवर्णपदके मिळवायची आशा ठेवुन आहे!) ५० मिटर्स सेमि फायनल व १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल पोहणार आहे! माझा मुलगा आदित्य जो गेली ७ वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करतो त्याचा केलब ड्रेसल हा आयडल आहे.
चला मंडळी! आहात का तयार यंदाच्या फ्रेंच ओपन आवृत्तीसाठी?
सालाबादप्रमाणे याही वर्षी नदालच विजेतेपदाचा चषक उचलताना दिसणार की जोकोव्हिक/ झव्हेरोव्ह/ थिम/ सिट्सिपास पैकी एक नदालचा इथला जिंकण्याचा मक्ता संपवणार?
२ आठवड्यापुर्वी माद्रिद ओपनमधे झेव्हेरोव्हने नदालला उपांत्यपुर्व फेरीतच गारद करुन थोडी खळबळ माजवली पण गेल्या आठ्वड्यात नदालने इटालियन ओपनमधे झव्हेरोव्हला उपांत्यपुर्व फेरीत हरवुन त्या पराभवाचे उट्टे काढले. तेवढेच नाही तर इटालियन ओपनच्या फायनलमधे नदालने जोकोव्हिकला हरवले व त्याचे तिथले १० वे इटालियन ओपन विजेतेपद जिंकुन त्याच्या गोटात सगळे आलबेल आहे हे दाखवुन दिले.
काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत.
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
सर्वांना नमस्कार.
आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.
आयपील मालक इतके हजारो करोडो पैसे देऊन संघ विकत घेतात, त्यावर आणखी करोडो देऊन खेळाडू मिळवतात.
आता हे सगळे हॉबी म्हणून तर करत नसणार. त्यांना या गुंतवणुकीचा रिटर्न कसा मिळतो?