चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास
भारताच्या पहिल्या पॅरालिंपिक्समधील सुवर्णपदक विजेत्याची कहाणी
✪ ९ गोळ्या लागूनही आणि अर्ध शरीर लुळं पडूनही केलेला जिद्दीचा प्रवास
✪ १९५२ मध्ये खाशाबा जाधवांकडून मिळालेल्या प्रेरणेची १९७२ मध्ये सुवर्ण झळाळी
✪ सांगली जिल्ह्यातल्या मुरलीकांत पेटकरांची अविश्वसनीय झेप
✪ “मुझे उस हर एक के लिए लड़ना है जो चँपियन बनना चाहता है!”
✪ "पैर तो मछली को भी नही होते हैं!”
✪ अतिशय उत्तम पटकथा, मांडणी व चित्रण
✪ इतका मोठा पराक्रम परंतु लोक विसरून गेले
एक तरी वारी अनुभवावी...
वारी...पंढरीची आणि वारी...विम्बल्डनची!
दोन्ही वाऱ्यांचा हंगाम एकच जून-जुलै... पुणेकर असल्यामुळे जन्मापासून एक वारी दरवर्षी प्रत्यक्ष अनुभवलेली, दुसरी मात्र आभासी... फक्त दूरदर्शनवर. याही वारीचा अनुभव प्रत्यक्ष घ्यायचं स्वप्न लहानपणापासून बघितलं होतं, ते सत्यात कधी उतरेल हे काही माहित नव्हतं
किती अन् काय काय बोलावं या सामन्यात बद्दल. पूर्ण टूर्नामेंट मध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराट कोहलीने अगदी योग्य वेळ साधून केलेले पुनरागमन. त्याची नियोजनपूर्वक, शानदार खेळी. दुसरीकडून मधल्या फळीची मिळालेली भक्कम साथ. ही झाली फलंदाजीची गोष्ट.
दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं
मागील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक सुरूवात झालं, आणि आता पाहता पाहता अंतिम सामना येऊन ठेपला आहे. मागच्या वेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताही सेमीफायनल सामन्यात हीच न्यूझीलंडची टीम समोर उभी ठाकली होती. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व के एल राहुल या पिचवर उतरलेल्या प्रत्येक बॅटरने आपापल्या निरनिराळ्या शैलीत उत्कृष्ट बॅटिंग करून ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता ; पण न्यूझीलंड बॅटिंगला उतरल्यानंतर मात्र सामन्यात अनिश्चितता निर्माण झाली होती.